Gold Silver Rate Today 17 April 2024 : सोने-चांदीचे महागाईचे भजन; सराफा बाजारात ग्राहकांचे रमेना मन

Gold Silver Rate Today 17 April 2024 : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीचा दरवाढीचा तोरा सोने आणि चांदीने कायम ठेवला. इराण-इस्त्राईलच्या वाढत्या तणावाचा परिणाम दिसून आला. दोनच दिवसांत मौल्यवान धातूंनी 1500 रुपयांची चढाई केली. सराफा बाजाराकडे त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी पाठ फिरवली.

Gold Silver Rate Today 17 April 2024 : सोने-चांदीचे महागाईचे भजन; सराफा बाजारात ग्राहकांचे रमेना मन
सोने आणि चांदीचा वाढला तोरा
Follow us
| Updated on: Apr 17, 2024 | 8:34 AM

जागतिक नकाशावर अजून एका युद्धाचे सावट दिसत आहेत. इराणच्या हल्ल्याला इस्त्राईल प्रत्युत्तर देणार हे जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांनी त्यांचा मोर्चा सोने-चांदीतील गुंतवणुकीकडे वळवला आहे. या सर्व परिस्थितीचे चटके ग्राहकांना सहन करावे लागत आहेत. एप्रिल महिन्यात सोने आणि चांदीने तुफान खेळी खेळली. त्यामुळे ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. पहिल्या पंधरवाड्यात दरवाढीचा आलेख उंचावला होता. दुसऱ्या पंधरवाड्यातही मौल्यवान धातूंची घौडदौड सुरुच आहे. या आठवड्यातील दोन दिवसांत बेशकिंमती धातूंमध्ये 1500 रुपयांची वाढ झाली. काय आहेत सोने आणि चांदीची किंमत? (Gold Silver Price Today 17 April 2024)

दोनच दिवसांत 1500 रुपयांची चढाई

गेल्या आठवड्यात सोने 1860 रुपयांनी महागले होते. तर या आठवड्याच्या पहिल्या दोन दिवसांत मौल्यवान धातूने 1500 रुपयांची चढाई केली. सोमवारी 15 एप्रिल रोजी सोने 600 रुपयांनी वधारले. मंगळवारी 16 एप्रिल रोजी जवळपास हजार रुपयांची हनुमान उ़डी घेतली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 68,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,280 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीची पण मुसंडी

एप्रिल महिन्यात चांदीने मोठा पल्ला गाठला. सुरुवातीच्या 15 दिवसांत चांदी 10,500 रुपयांनी वधारली. या आठवड्यात पण चांदीने मुसंडी मारली. 15 एप्रिल रोजी चांदी 500 रुपयांनी वधारली. तर 16 एप्रिल रोजी किलोमागे 1000 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 87,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोन्यासह चांदीत घसरण झाली. 24 कॅरेट सोने 73,302 रुपये, 23 कॅरेट 73,008 रुपये, 22 कॅरेट सोने 67,145 रुपये झाले. 18 कॅरेट 54,977 रुपये, 14 कॅरेट सोने 42,882 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 83,213 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

'संजय राऊतांची प्रतिक्रिया आश्चर्यकारक..', थेट पवार कुटुंबातूनच फटकारे
'संजय राऊतांची प्रतिक्रिया आश्चर्यकारक..', थेट पवार कुटुंबातूनच फटकारे.
शिंदे काय बोलले की एका वाक्यानं थेट 'आपत्ती व्यवस्थापन समिती'त एन्ट्री
शिंदे काय बोलले की एका वाक्यानं थेट 'आपत्ती व्यवस्थापन समिती'त एन्ट्री.
'आव्हाडांना फक्त रॉकेल टाकायचाच धंदा...', धस भडकले, कशावरून जुंपली?
'आव्हाडांना फक्त रॉकेल टाकायचाच धंदा...', धस भडकले, कशावरून जुंपली?.
बँकॉक फ्लाईट... एका फोननं गल्ली-दिल्लीपर्यंत सारी यंत्रणा टाईट?
बँकॉक फ्लाईट... एका फोननं गल्ली-दिल्लीपर्यंत सारी यंत्रणा टाईट?.
शिंदेंसारखा आतंरराष्ट्रीय दलाल पवारांसोबत, त्या सत्कारावरून राऊत भडकले
शिंदेंसारखा आतंरराष्ट्रीय दलाल पवारांसोबत, त्या सत्कारावरून राऊत भडकले.
स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी
स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी.
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता...
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता....
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय.
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली.
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?.