AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोन्यासह चांदीची स्वस्ताईची वर्दी! सराफा बाजारात तुफान गर्दी

Gold Silver Rate Today : सराफा बाजारात सध्या गर्दीचा हंगाम आहे. सोने-चांदीतील स्वस्ताईने ही गर्दी खेचून आणली आहे. मे-जून नंतर ऑगस्ट महिन्याने पण ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. जागतिक बाजारात सोने स्वस्त तर चांदी महागली आहे.

Gold Silver Rate Today : सोन्यासह चांदीची स्वस्ताईची वर्दी! सराफा बाजारात तुफान गर्दी
| Updated on: Aug 20, 2023 | 9:33 AM
Share

नवी दिल्ली | 20 ऑगस्ट 2023 : जागतिक बाजारात सोन्याची कामगिरी या महिनाभरात निराशाजनक आहे. तर चांदीचे तळमळ्यात सुरु आहे. दोन्ही धातूंना ऑगस्ट महिन्यात मोठी झेप घेता आलेली नाही. घसरणीच्या सत्राला अजून विराम मिळालेला नाही. मे आणि जून महिन्यात अशीच घसरण झाली होती. 24 कॅरेट सोन्यात मोठी घसरण आली होती. जुलै महिन्याने या मंदीला रोखले. किंमती चांगल्याच वधारल्या. पण त्यांना या वर्षातील फेब्रुवारी आणि एप्रिल महिन्यातील दरवाढीची बरोबरी साधता आली नाही. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच तारखेला सोन्याने दरवाढीचा बिगूल वाजवला होता. पण सोन्यासोबत चांदीतही पडझड झाली. दोन्ही धातूंची चमक फिक्की पडली. डॉलरचा रुबाब अजूनही कायम आहे. अमेरिकन गंगाजळीत भर पडत आहे. सोने-चांदी (Gold-Silver Price Today 20 August 2023) या घडामोडींमुळे दबावाखाली आहे.

अमेरिकन बाजाराचा संदेश काय

अमेरिकन डॉलरच्या (Dollar) ताबडतोब चढाईने सोने-चांदीची चकाकी फिक्की पडली आहे. डॉलरचा रुबाब कायम राहिला आणि गंगाजळीत अजून वाढ झाली तर सोन्याला मोठी उसळी मारता तर येणारच नाही. पण सध्याच्या भाव टिकवणे पण अवघड होईल. सोन्यात मोठी घसरण येऊ शकते. अमेरिकन बाजारात एका महिन्यात सोन्याच्या भावात जवळपास 4.10 टक्क्यांची तर चांदीच्या किंमतीत 8.38 टक्क्यांची घसरण झाली आहे.

IBJAकडून भाव जाहीर नाही

भारतीय बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन ही देशातील 104 वर्षांची संस्था सोने-चांदीचे भाव सकाळीच जाहीर करते. शनिवार-रविवार आणि केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्यांच्या दिवशी संस्था भाव जाहीर करत नाही.

सोने झाले डाऊन

या आठवड्यात सोन्याला खासा कामगिरी करता आली नाही. सोन्यात पडझडीचे सत्र कायम आहे. आठवडाभरात सोने 550 रुपयांनी घसरले. 12,13,14 ऑगस्ट रोजी भावात मोठा बदल झाला नाही. 15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट रोजी प्रत्येकी 100 रुपयांची घसरण झाली.17 ऑगस्ट रोजी किंमती 350 रुपयांनी घसरल्या. 18,19 ऑगस्ट रोजी भावात बदल नाही. या महिन्यात सोन्यात जवळपास 1500 रुपयांची घसरण झाली. 22 कॅरेट सोने 54,250 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,170 रुपये प्रति 10 ग्रॅम असा भाव आहे. गुडरिटर्न्सने ही आकडेवारी दिली आहे.

चांदीत घसरण

ऑगस्ट महिन्यात चांदीची चमक फिक्की पडली. चांदी 6000 रुपयांनी स्वस्त झाली. 16 ऑगस्ट रोजी चांदीने घसरणीला ब्रेक लावला होता. भाव 200 रुपयांनी वाढले होते. 18 ऑगस्ट रोजी चांदीने 1000 रुपयांची चढाई केली. 19 ऑगस्ट रोजी चांदीत 200 रुपयांची घट झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 73,300 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 58,471 रुपये, 23 कॅरेट 58,237 रुपये, 22 कॅरेट सोने 53,559 रुपये, 18 कॅरेट 43,853 रुपये, 14 कॅरेट सोने 34,206 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 70,447रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?