Gold Silver Rate Today 21 July 2024 : गुरु पौर्णिमेला आनंदवार्ता, सोने-चांदी खरेदीची संधी चुकवू नका, मौल्यवान धातूत आली स्वस्ताई

Gold Silver Rate Today 21 July 2024 : गेल्या तीन दिवसांपासून ग्राहकांना सराफा बाजारातून दिलासा मिळाला आहे. सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाल्याने त्यांना खरेदीची संधी मिळाली आहे. गुरु पौर्णिमेला त्यांना खरेदीचा योग साधता येणार आहे.

Gold Silver Rate Today 21 July 2024 : गुरु पौर्णिमेला आनंदवार्ता, सोने-चांदी खरेदीची संधी चुकवू नका, मौल्यवान धातूत आली स्वस्ताई
मलावीमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या एका ग्रॅमची किमत 6,346.63 रुपये, ऑस्ट्रेलियामध्ये 6,347.32 रुपये, कोलंबियामध्ये 6,351.73 रुपये तर इंडोनेशियामध्ये 6,359.47 रुपये आहे. स्विस, ऑस्ट्रेलिया, सौदी अरब आणि हांगकाँग बँकही सोने विकतात.
Follow us
| Updated on: Jul 21, 2024 | 8:26 AM

केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी सोने आणि चांदीत हाराकिरी दिसली. भावात मोठी घसरण झाली. अर्थसंकल्प अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर होईल. त्यापूर्वी गेल्या तीन दिवसांत मौल्यवान धातूत घसरण दिसली. चांदीत तर मोठी पडझड झाली. सोन्याचा तोरा पण उतरला. गुरु पौर्णिमेला ग्राहकांना खरेदीचा आनंद लुटता येणार आहे. त्यांना त्यांच्या गुरुंना महागडी भेट वस्तू घेऊन देता येईल. काय आहेत मौल्यवान धातूची किंमत (Gold Silver Price Today 21 July 2024 )

सोन्याचा तोरा उतरला

सोन्याने आठवड्याच्या सुरुवातीला पांढरे निशाण फडकवले. त्यानंतर जोरदार मुसंडी मारली. सोने 380 आणि 980 रुपयांची महागाई झाली. 18 जुलै रोजी 160, 19 जुलैला 490 आणि शनिवारी 380 रुपयांनी सोने स्वस्त झाले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 74,120 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीत मोठी पडझड

या महिन्यात चांदीने मोठी मुसंडी मारली. गेल्या आठवड्यासह या आठवड्यात चांदीला चमकदार कामगिरी बजावता आली नाही. आठवड्याच्या सुरुवातीला दोन दिवसात चांदी 500 रुपयांनी उतरली. तर 17 जुलै रोजी 1 हजारांची मुसंडी मारली. त्यानंतर घसरणीचे सत्र सुरु झाले. 18 जुलै रोजी 1,300 रुपये तर 19 जुलै रोजी 1,450 रुपये आणि शनिवारी 1,750 रुपयांनी चांदी आपटली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 73,240 रुपये, 23 कॅरेट 72,947 रुपये, 22 कॅरेट सोने 67,088 रुपये झाले. 18 कॅरेट 54,930 रुपये, 14 कॅरेट सोने 42,845 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 88,983 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.