AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today | सराफा बाजारात चढउताराचे सत्र, सोने आणि चांदीची अशी आहे किंमत

Gold Silver Rate Today 21 March 2024 | सुरुवातीच्या दहा दिवसांत सोने आणि चांदीने चौकार आणि षटकार ठोकले. पण नंतरच्या या दहा दिवसांत मौल्यवान धातूत सातत्याने चढउताराचे सत्र दिसून येत आहे. दोन्ही धातूंना 10 मार्चनंतर मोठी मजल मारता आलेली नाही.

Gold Silver Rate Today | सराफा बाजारात चढउताराचे सत्र, सोने आणि चांदीची अशी आहे किंमत
सोने आणि चांदीची काय किंमत
| Updated on: Mar 21, 2024 | 8:28 AM
Share

नवी दिल्ली | 21 March 2024 : 1 ते 10 मार्च दरम्यान सोने आणि चांदीने किंमतीत मोठी उसळी घेतली. दोन्ही धातूंच्या किंमती आकाशाला भिडल्या. ऐन लग्नसराईत ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले. पण 10 मार्चनंतर आतापर्यंत दोन्ही धातूंना विक्रमी कामगिरी करता आली नाही. भावात मोठी वाढ झाली तरी तितकीच घसरण पण दिसून आली. सोने आणि चांदीत चढउताराचे सत्र आहे. दरवाढीला या काळात ब्रेक लागला. तरीही किंमती अजून चढ्याच आहेत. काय आहे सोने आणि चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 21 March 2024)…

सोन्याचे दोन पाऊल पुढे, दोन पाऊल मागे

या महिन्याच्या सुरुवातीला सोने 3,430 रुपयांनी महागले. त्यानंतर दरवाढीला ब्रेक लागला. गेल्या आठवड्यात सोने 620 रुपयांनी उतरले. तर या आठवड्यात, 18 मार्च रोजी सोने 210 रुपयांनी उतरले. 9 मार्च रोजी सोन्याच्या किंमती 460 रुपयांनी वधारली. काल कोणतीच अपडेट दिसली नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 60,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,480 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी उतरली

चांदीने या महिन्याच्या सुरुवातीच्या दहा दिवसांत 3 हजारांची झेप घेतली. गेल्या आठवड्यात 2600 रुपयांची दरवाढ झाली. तर 900 रुपयांची घसरण झाली. .या आठवड्यात 18 मार्च रोजी 300 रुपयांनी चांदी स्वस्त झाली. 19 मार्च रोजी तितकीच वाढ झाली. 20 मार्च रोजी 300 रुपयांनी किंमती उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 77,000 रुपये आहे.

  1. 14 ते 24 कॅरेटचा भाव काय – इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी वधारली. 24 कॅरेट सोने 65,689 रुपये, 23 कॅरेट 65,426 रुपये, 22 कॅरेट सोने 60,171 रुपये झाले.18 कॅरेट 49,267 रुपये, 14 कॅरेट सोने 38,428 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,886 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
  2. घरबसल्या जाणून घ्या भाव – सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर...
मोठी खळबळ! गरब्याच्या नावाखाली चक्क वेगवेगळे पार्टनर... महाराष्ट्रात नेमकं काय घडतंय?
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना भावनिक पत्र, पार्थ सावध...
सोमेश्वर कारखाना निवडणुकीआधी अजित पवारांना लिहिलेलं भावनिक पत्र, पार्थ सावध...
महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीस
Girish Mahajan | महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये दुष्काळाची गंभीर परिस्थिती, CM फडणवीसांचे तातडीचे आदेश
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय...
रवींद्र धंगेकरांकडून संतोष पंडितांचा सत्कार, जामिनानंतर राजकीय चर्चांना उधाण
विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
Praful Patel | विरोध करणे सोपं, मात्र काम करून दाखवणं महत्त्वाचं - प्रफुल पटेल
माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... शेतकरी संतप्त
Viral Video : माझ्या शेतातून एक किलो सोयाबीन काढून दाखवा, नाहीतर... संतप्त शेतकऱ्याचं सरकारला आव्हान
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस...अहिल्यानगरच्या शेवगाव...
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात राडा; थेट पोलिस... अहिल्यानगरच्या शेवगावात नेमकं काय घडलं?
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह...
दिल्लीत SIR नोटिसांचा धडाका; आडवाणी, जयशंकर, केजरीवालांसह दिग्गजांच्या नावांची पडताळणी, नेमकं प्रकरण काय?
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची जैन...
आठ महिन्यांपूर्वीचं आश्वासन पुन्हा चर्चेत; राहुल नार्वेकरांची निलेशचंद्र मुनींशी भेट
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक...
गणपती विसर्जनावेळी दोन गटांमध्ये तुफान राडा; वादानंतर दगडफेक... व्हिडीओ व्हयरल