AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : वाढता वाढता वाढे, एका आठवड्यात इतके वधारले सोने-चांदी, किंमत काय

Gold Silver Rate Today : सोन्याने या आठवड्यात मोठी झेप घेतली तर चांदीने मोठा पल्ला गाठला. एका आठवड्यात मौल्यवान धातूंनी कमाल दाखवली. गेल्या आठवड्याच्या शेवटीच किंमती वाढल्या होत्या. या आठवड्यात सोने-चांदीने माघार घेतलीच नाही. दरवाढीला ब्रेक दिला नाही. किंमतीत मजल-दरमजल वाढ होत गेली. अशा वधारल्या किंमती

Gold Silver Rate Today : वाढता वाढता वाढे, एका आठवड्यात इतके वधारले सोने-चांदी, किंमत काय
| Updated on: Dec 24, 2023 | 8:25 AM
Share

नवी दिल्ली | 24 डिसेंबर 2023 : सोने-चांदीने या आठवड्यात दमदार कामगिरी दाखवली. सोने-चांदीत दरवाढ नोंदवण्यात आली. या आठवड्यात मौल्यवान धातूत पडझड झाली नाही. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला सलग तीन दिवस मौल्यवान धातूच्या किंमतीत घसरण झाली होती. या आठवड्यात दोन्ही धातूंनी माघार घेतली नाही. बाजाराने वर्षाच्या शेवटी कल दिला आहे. जागतिक बाजारातील मजबूत स्थितीमुळे सोने-चांदीचा भाव या आठवड्यात एक तर वाढला नाहीतर स्थिर राहीला. त्यात घसरण नोंदवण्यात आली नाही. या आठवड्यात सोने 880 रुपयांनी तर चांदी 2300 रुपयांनी वधारली. असा आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 23 December 2023)

सोन्याची भरारी

गेल्या आठवड्याच्या अखेरीस सोन्याने 1100 रुपयांची चढाई केली होती. या आठवड्यात हा मौल्यवान धातू 880 रुपयांनी वधारला. दोन आठवड्यांचा विचार करता सोन्यामध्ये जवळपास 2000 रुपयांची वाढ झाली आहे. आठवड्याच्या सुरुवातीला 18 डिसेंबर रोजी सोने 100 रुपयांनी वाढले. 20 डिसेंबर सोन्याने रोजी 380 रुपयांची उसळी घेतली. 22 डिसेंबर रोजी 230 रुपयांनी भावात वाढ झाली. 23 डिसेंबर रोजी सोने 250 रुपयांनी वाढले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची मोठी झेप

गेल्या आठवड्यात चांदी 3500 रुपयांनी महागली होती. या आठवड्यात चांदीच्या किंमतीत 2300 रुपयांची भर पडली. दोन आठवड्यात एकूण 5800 रुपयांनी भाव वाढला. 18 डिसेंबर रोजी चांदीत 300 रुपयांची वाढ झाली. 19 डिसेंबर रोजी चांदी 500 रुपयांनी घसरली. 20 डिसेंबर रोजी चांदीने 1 हजार रुपयांची उसळी घेतली. 21 डिसेंबर रोजी चांदीत 700 रुपयांची वाढ झाली. 22 डिसेंबर रोजी चांदीत 300 रुपयांची वाढ झाली. 23 डिसेंबर रोजी किंमती 500 रुपयांनी उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 79,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 62,844 रुपये, 23 कॅरेट 62,592रुपये, 22 कॅरेट सोने 57,565 रुपये झाले. 18 कॅरेट 47,133 रुपये, 14 कॅरेट सोने 36,764 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,918 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.