AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : पुन्हा महागले सोने-चांदी; खरेदीला जाण्यापूर्वी पाहा किंमत

Gold Silver Rate Today : या वर्षाच्या शेवटच्या सत्रात सोने-चांदी दिलासा देण्याची शक्यता फारशी दिसत नाही. सोने-चांदी पुन्हा महाग झाले आहे. ऐन लग्नसराईत सोने-चांदीने उचल खाल्ली आहे. ग्राहकांना सराफा बाजारात जाताना जादा रक्कम सोबत ठेवावी लागेल. सोने-चांदी पुन्हा उच्चांकाकडे सरकले आहे. काय आहेत भाव?

Gold Silver Rate Today : पुन्हा महागले सोने-चांदी; खरेदीला जाण्यापूर्वी पाहा किंमत
| Updated on: Dec 23, 2023 | 8:32 AM
Share

नवी दिल्ली | 23 डिसेंबर 2023 : सोने-चांदीला या आठवड्यात मोठी झेप घेता आली नसली तरी किंमती वाढल्या आहेत. या आठवड्यात सोने-चांदीमुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसली. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीत घसरण नोंदवण्यात आली. या आठवड्यात सोने-चांदीत घसरण झाली नाही. उलट भावात वाढ झाली. आठवड्याच्या शेवटच्या सत्रात पण मौल्यवान धातूंनी चढाई केली. त्यामुळे ग्राहकांना सराफा पेठेत जाताना सोबत जादा रक्कम ठेवावी लागणार आहे. या आठवड्यात सोने 730 रुपयांनी तर चांदी 2000 रुपयांनी वधारली. असा आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 23 December 2023)

सोने महागले

या आठवड्यात सोने 730 रुपयांनी महागले. तर गेल्या आठवड्यात 1100 रुपयांची दरवाढ झाली होती. म्हणजे दहा दिवसांत सोन्यात 1830 रुपयांची वाढ झाली. आठवड्याच्या सुरुवातीला 18 डिसेंबर रोजी सोन्याचा भाव 100 रुपयांनी वधारला. 20 डिसेंबर सोन्याने रोजी 380 रुपयांची झेप घेतली. 22 डिसेंबर रोजी किंमती 230 रुपयांनी वधारल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 58,100 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 63,380 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी पण सूसाट

यापूर्वी चांदी 3500 रुपयांनी महागली होती. 18 डिसेंबर रोजी चांदी 300 रुपयांनी वधारली. 19 डिसेंबर रोजी चांदीत 500 रुपयांची घसरण झाली. तर 20 डिसेंबर रोजी चांदीने 1 हजार रुपयांची उसळी घेतली. 21 डिसेंबर रोजी चांदीत 700 रुपयांची वाढ झाली. 22 डिसेंबर रोजी चांदीत 300 रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 79,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 62,844 रुपये, 23 कॅरेट 62,592रुपये, 22 कॅरेट सोने 57,565 रुपये झाले. 18 कॅरेट 47,133 रुपये, 14 कॅरेट सोने 36,764 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,918 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.