AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 26 December 2024 : वर्षाअखेरीस सोने-चांदी किती झाले महाग, किंमती काय?

Gold Silver Rate Today 26 December 2024 : वर्षाअखेरीस काय आहेत सोने आणि चांदीचा भाव? गेल्या 15 दिवसांत सोने -चांदीच्या दरात जितकी वाढ झाली त्यापेक्षा किंमती अधिक उतरल्या. दोन्ही धातुत मोठी पडझड झाली. आता अशा आहेत या मौल्यवान धातुच्या किंमती?

Gold Silver Rate Today 26 December 2024 : वर्षाअखेरीस सोने-चांदी किती झाले महाग, किंमती काय?
वस्तू आणि सेवा करात कपात करण्याची प्रमुख मागणी आहे. त्यानुसार, सोन्यावरील 3 टक्क्यांचा जीएसटी कमी करून 1 टक्के करण्याची मागणी करण्यात येत आहे.
| Updated on: Dec 26, 2024 | 8:37 AM
Share

मागील दोन आठवड्यात सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी पडझड झाली. या 15 दिवसात जितक्या किंमती वाढल्या. त्यापेक्षा त्यात अधिक घसरण दिसून आली. वर्षाअखेरीस या मौल्यवान धातुत अजून घसरण होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन आठवड्यात सोने तीन हजारांहून अधिक स्वस्त झाले. तर चांदी 7 हजारांहून अधिक उतरली. आता अशा आहेत या बेशकिंमती धातुच्या किंमती (Gold Silver Price Today 26 December 2024 )

या आठवड्यात सोन्यात नाही मोठा बदल

गेल्या आठवड्यात सोने 2500 रुपयांनी वधारले होते. गेल्या शनिवारी भाव 650 रुपयांनी झपकन वाढले. त्यानंतर या आठवड्यात त्यात 25 डिसेंबर रोजी 100 रुपयांची दरवाढ नोंदवण्यात आली. तर 24 डिसेंबर रोजी किंमती 100 रुपयांनी उतरल्या. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी किंचित वधारली

मागील आठवड्यात चांदी 6,500 रुपयांनी वधारली तर 5 हजारांनी स्वस्त झाली होती. गेल्या शनिवारी 21 डिसेंबर रोजी किंमती 1000 रुपयांनी वाढल्या होत्या. या आठवड्याच्या सुरुवातीला किंमतीत बदल झाला नाही. तर 23 डिसेंबर रोजी चांदी 100 रुपयांनी स्वस्त तर 25 डिसेंबर रोजी 100 रुपयांनी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,874, 23 कॅरेट 75,570, 22 कॅरेट सोने 69,501 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 56,906 रुपये, 14 कॅरेट सोने 44,386 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 87,511 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष...
ब्रिक्स परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत भारत आणि चीनमध्ये सात महत्त्वाचे करार झाले. हे करार दोन्ही देशांमधील संबंधांना रणनीतिक आणि दीर्घकालीन स्वरूप देतील, सीमावादावर तोडगा काढतील, आर्थिक संबंध वाढवतील आणि जागतिक आव्हानांवर सहकार्य करतील.
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार