AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 28 August 2024 : सोने-चांदी झाले महाग, 10 ग्रॅमचा भाव काय, इतकी झाली दरवाढ

Gold Silver Rate Today 28 August 2024 : या आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीत चढउताराचे सत्र दिसून आले. सोमवारी दोन्ही धातूंचा भाव स्थिर होता. तर मंगळवारी दोन्ही धातूंनी किंमतीत घसरण दिसली. आता काय आहेत या मौल्यवान धातूच्या किंमती?

Gold Silver Rate Today 28 August 2024 : सोने-चांदी झाले महाग, 10 ग्रॅमचा भाव काय, इतकी झाली दरवाढ
सोने चांदी भाव
| Updated on: Aug 28, 2024 | 2:36 PM
Share

या आठवड्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीच्या किंमतीत चढउताराचे सत्र दिसले. सोमवारी मौल्यवान धातूंना कमाल दाखवता आली नाही. गेल्या आठवड्यातील घसरणीचे सत्र कायम राहिले. तर मंगळवारी दोन्ही धातूंच्या किंमतीत घसरण दिसली. गेल्या आठवड्यात एकच दिवस दरवाढ दिसली होती. इतर दिवशी दरवाढ झाली नाही. तर आठवड्याच्या अखेरीस घसरण झाली होती. आज बुधवारी सोन्यात दरवाढ दिसली. अशा आहेत मौल्यवान धातूच्या किंमती… (Gold Silver Price Today 28 August 2024 )

सोन्यात मोठी दरवाढ

गेल्या आठवड्यात सोने एकदाच वधारले होते. या आठवड्यात सुरुवातीला भाव स्थिर होता. त्यानंतर त्यात घसरण दिसली. मंगळवारी सोने घसरले. तर आज 28 ऑगस्ट रोजी सोने 220 रुपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 67,300 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत 600 रुपयांची उसळी

गेल्या आठवड्यात 20 ऑगस्ट रोजी चांदी 1 हजार रुपयांनी वधारली होती. या आठवड्यात 26 ऑगस्ट रोजी चांदी 100 रुपयांनी स्वस्त झाली. तर मंगळवारी चांदीत 600 रुपयांची वाढ झाली. आज 28 ऑगस्ट रोजी चांदीचा भाव स्थिर असल्याचे दिसून आले. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 88,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार(IBJA) सोने आणि चांदीत मोठी घसरण झाली. 24 कॅरेट सोने 71,694, 23 कॅरेट 71,407, 22 कॅरेट सोने 65,672 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,771 रुपये, 14 कॅरेट सोने 41,941रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 84,720 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक