Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या किंमतीत तेजी, इतके वधारले भाव

Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या किंमतीत तेजीचे सत्र कायम आहे. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने-चांदीच्या किंमती वधारल्या आहेत. दिवाळीपासून किंमतींनी ग्राहकांना निराश केले आहे. दरवाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकाने खरेदीचा पुढला मुहूर्त गाठायचे ठरवले आहे. असा आहे सोने-चांदीचा भाव?

Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या किंमतीत तेजी, इतके वधारले भाव
Follow us
| Updated on: Nov 28, 2023 | 8:46 AM

नवी दिल्ली | 28 नोव्हेंबर 2023 : सोने-चांदीच्या किंमतींनी सध्या कहर केला आहे. भाव वधारले आहेत. त्यामुळे ग्राहकांचा हिरमोड झाला आहे. दिवाळीपासून मौल्यवान धातूंची आगेकूच सुरु आहे. धनत्रयोदशी आणि पाडव्याला मोठी दरवाढ झाली होती. त्यानंतरच्या प्रत्येक आठवड्यात सोने-चांदीने आलेख चढताच ठेवला. ऑक्टोबर महिन्यातील हमास-इस्त्राईल युद्धामुळे दोन्ही धातूंच्या किंमती भडकल्या. आता या मे महिन्यातील सोने-चांदीचा उच्चांकी विक्रम मोडण्याच्या तयारीत आहे. दोन्ही धातू लवकरच हा रेकॉर्ड इतिहासजमा करु शकतात. दरवाढीने ग्राहक हिरमुसला आहे. सोने-चांदीच्या किंमती (Gold Silver Price Today 28 November 2023) इतक्या वधारल्या आहेत.

सोन्यात उसळी

दिवाळीपासून सोन्याने मोठी उसळी घेतली. आतापर्यंत सोन्यात 1500 रुपयांची वाढ झाली. गेल्या आठवड्यात सोन्यात 700 रुपयांची वाढ झाली. या आठवड्याची सुरुवात पण दरवाढीनेच झाली. सोमवारी 27 नोव्हेंबर रोजी सोने 250 रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हे सुद्धा वाचा

चांदीची 1000 रुपयांची झेप

चांदीने गेल्या दोन आठवड्यात मोठी भरारी घेतली. 13 नोव्हेंबरपासून आजपर्यंत चांदीत 6600 रुपयांची दरवाढ झाली. गेल्या आठवड्यात 1400 रुपयांनी किंमती वधारल्या होत्या. 27 नोव्हेंबर रोजी किंमती 1000 रुपयांनी वाढल्या. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 78,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 61,437 रुपये, 23 कॅरेट 61,191 रुपये, 22 कॅरेट सोने 56,276 रुपये झाले. 18 कॅरेट 46,078 रुपये, 14 कॅरेट सोने 35,941 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 73,046 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सोमवारच्या सुट्टीमुळे भाव अपडेट झाले नाहीत.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Non Stop LIVE Update
आमदार नीट वागत नाही, कारवाई करा; नार्वेकरांचा थेट राज्यपालांना मेल?
आमदार नीट वागत नाही, कारवाई करा; नार्वेकरांचा थेट राज्यपालांना मेल?.
मानेंच्या बॅनरवर विकासकामांची माहिती देणारं QR कोड, पण स्कॅन केलं अन..
मानेंच्या बॅनरवर विकासकामांची माहिती देणारं QR कोड, पण स्कॅन केलं अन...
'तू बदनाम कर, तेरी औकात...', कुठे झळकले भावना गवळी यांचे बॅनर्स?
'तू बदनाम कर, तेरी औकात...', कुठे झळकले भावना गवळी यांचे बॅनर्स?.
... अन् बिबट्यानं ठोकली धूम, वनविभागाकडून शोधमोहीम सुरू
... अन् बिबट्यानं ठोकली धूम, वनविभागाकडून शोधमोहीम सुरू.
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, राज्यभरात आजपासून...
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, राज्यभरात आजपासून....
पवार काका-पुतणे भविष्यात एकत्र येणार? अजितदादा स्पष्टच म्हणाले, आमचं..
पवार काका-पुतणे भविष्यात एकत्र येणार? अजितदादा स्पष्टच म्हणाले, आमचं...
कोल्हे Vs दादा; पवारांच्या टीकेवर लाव रे तो व्हिडीओनं कोल्हेंचं उत्तर
कोल्हे Vs दादा; पवारांच्या टीकेवर लाव रे तो व्हिडीओनं कोल्हेंचं उत्तर.
महायुतीच्या जागेचा फॉर्म्युला, शाहांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब होणार
महायुतीच्या जागेचा फॉर्म्युला, शाहांच्या उपस्थितीत शिक्कामोर्तब होणार.
वेळीच गुंडांना आवर घाला... हर्षवर्धन पाटलांचं गृहमंत्र्यांकडे गाऱ्हाणं
वेळीच गुंडांना आवर घाला... हर्षवर्धन पाटलांचं गृहमंत्र्यांकडे गाऱ्हाणं.
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार.