Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या किंमतीत मोठी उसळी, केला नवीन रेकॉर्ड

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने जोरदार मुसंडी मारली. ऑक्टोबर महिन्यात मौल्यवान धातूंनी दरवाढीची मोठी आघाडी उघडली होती. दिवाळीपासून किंमती वधारल्या. गेल्या आठवड्यापासून सोने-चांदी मोठी उसळी घेण्याच्या तयारीत होते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 4 मे 2023 रोजी सोने 61,646 रुपयांच्या विक्रमीस्तरावर पोहचले होते. हा रेकॉर्ड आता इतिहासजमा झाला आहे.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीच्या किंमतीत मोठी उसळी, केला नवीन रेकॉर्ड
Follow us
| Updated on: Nov 29, 2023 | 8:35 AM

नवी दिल्ली | 29 नोव्हेंबर 2023 : सोने-चांदीने मोठी उसळी घेतली. सोने-चांदी दिवसागणिक सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर जात आहे. दहा वर्षांत दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत मोठी उलथापालथ झाली आहे. या ऑक्टोबर महिन्यात हमास-इस्त्राईल युद्धानंतर मौल्यवान धातू चमकले. या दिवाळीपासून सोने-चांदीने जोरदार मुसंडी मारली. सोने-चांदीने किंमतीत नवीन रेकॉर्ड केला. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 4 मे 2023 रोजी सोने 61,646 रुपयांच्या विक्रमीस्तरावर पोहचले होते. हा रेकॉर्ड आता इतिहासजमा झाला आहे. चांदी पण या शर्यतीत मागे नाही. चांदी पण चमकली आहे. दोन्ही धातूंनी (Gold Silver Price Today 29 November 2023) विक्रमी झेप घेतल्याने ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

काय आहेत भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) नुसार, सोन्याने मुसंडी मारली. 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,913 रुपये प्रति 10 ग्रॅम अशी आहे. 4 मे 2023 रोजी 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 61,646 रुपये असे होते. हा उच्चांक आता मोडीत निघाला. सोन्याने जवळपास 300 रुपयांची झेप घेतली. चांदी पण या शर्यतीत पुढे आहे. चांदी आता 75,000 रुपयांच्या घरात पोहचली आहे.

हे सुद्धा वाचा

गुडरिटर्न्सनुसार, 62,710 रुपये किंमत

दिवाळीपासून सोन्यात मोठी दरवाढ झाली. आतापर्यंत सोन्यात 1500 रुपयांची उसळी आली. मागील आठवड्यात सोन्यात 700 रुपयांची वाढ झाली. सोमवारी 27 नोव्हेंबर रोजी सोने 250 रुपयांनी महागले. 28 नोव्हेंबर रोजीचा भाव अपडेट झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 57,500 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 62,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीची 1000 रुपयांची वाढ

चांदीची गेल्या दोन आठवड्यापासून आगेकूच सुरु आहे . 13 नोव्हेंबरपासून आजपर्यंत चांदीत 6600 रुपयांची दरवाढ झाली. गेल्या आठवड्यात 1400 रुपयांनी किंमती वधारल्या होत्या. 27 नोव्हेंबर रोजी किंमती 1000 रुपयांनी वाढल्या. 28 नोव्हेंबर रोजी किंमती अपडेट झाल्या नाहीत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 78,500 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 61,913 रुपये, 23 कॅरेट 61,665 रुपये, 22 कॅरेट सोने 56,712 रुपये झाले. 18 कॅरेट 46,435 रुपये, 14 कॅरेट सोने 36,219 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 74,889 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Non Stop LIVE Update
अमित ठाकरे पुणे लोकसभा लढवणार? म्हणाले, माझी निवडणूक लढण्याची इच्छा...
अमित ठाकरे पुणे लोकसभा लढवणार? म्हणाले, माझी निवडणूक लढण्याची इच्छा....
मराठा आंदोलनाविरोधात सदावर्तेंची याचिका,हायकोर्टात काय झाला युक्तिवाद?
मराठा आंदोलनाविरोधात सदावर्तेंची याचिका,हायकोर्टात काय झाला युक्तिवाद?.
जरांगेंच्या भाषेत गुरमी, वडेट्टीवारांच्या टीकेवर एकेरी भाषेत पलटवार
जरांगेंच्या भाषेत गुरमी, वडेट्टीवारांच्या टीकेवर एकेरी भाषेत पलटवार.
सूनेच्या पक्षात सासरे येणार? रक्षा खडसेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण
सूनेच्या पक्षात सासरे येणार? रक्षा खडसेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण.
मारूतीच्या शेपटीवरून जुंपली, भुजबळांच्या टीकेवर जरांगेंचं प्रत्युत्तर
मारूतीच्या शेपटीवरून जुंपली, भुजबळांच्या टीकेवर जरांगेंचं प्रत्युत्तर.
लग्नात लग्नासारखं, मौतीत गेलं तर मौतीसारख, गुलाबराव पाटील काय म्हणाले?
लग्नात लग्नासारखं, मौतीत गेलं तर मौतीसारख, गुलाबराव पाटील काय म्हणाले?.
शंभुराज देसाईंनी स्पष्टच म्हटलं... आता हे थांबवा; जरांगेंना आवाहन काय?
शंभुराज देसाईंनी स्पष्टच म्हटलं... आता हे थांबवा; जरांगेंना आवाहन काय?.
उमेदवारी मिळाली तर... लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपती यांच सूचक वक्तव्य
उमेदवारी मिळाली तर... लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपती यांच सूचक वक्तव्य.
पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, मुलाला आईची साथ; मागण्या नेमक्या काय?
पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, मुलाला आईची साथ; मागण्या नेमक्या काय?.
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास.