AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 3 January 2025 : नवीन वर्षात सोन्याचा ग्राहकांना दणका, चांदीचा दिलासा, भाव काय आता?

Gold Silver Rate Today 3 January 2025 : सोन्याने नवीन वर्षात महागाईची मोहीम उघडली आहे. तर दुसरीकडे चांदीने ग्राहकांना दिलासा दिला आहे. सोन्याने दोन दिवसात मोठी झेप घेतली. तर चांदीची किंमत स्थिर आहे. आठवड्याच्या अखेरीस ग्राहकांचा खिशावर ताण आला आहे.

Gold Silver Rate Today 3 January 2025 : नवीन वर्षात सोन्याचा ग्राहकांना दणका, चांदीचा दिलासा, भाव काय आता?
2025 च्या अखेर पर्यंत सोन्याचे भाव 90 हजार रुपयांपर्यंत तर चांदीचे भाव एक लाखांपर्यंत जाण्याची शक्यता सुवर्ण व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.
| Updated on: Jan 03, 2025 | 8:33 AM
Share

सरत्या वर्षात सोन्याने ग्राहकांना दिलासा दिला होता. तर नवीन वर्षात या मौल्यवान धातुने महागाईची मोहीम उघडली आहे. गेल्या दोन दिवसात सोने 800 रुपयांच्या घरात वधारले आहे. तर चांदीच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. डिसेंबर महिन्याच्या अखेरीस चांदीत जवळपास दोन हजारांची घसरण झाली होती. त्यानंतर किंमती स्थिर आहेत. तर दोन दिवसात सोन्याने मोठी झेप घेतली आहे. या आठवड्याच्या अखेरीस सराफा बाजारात खरेदीसाठी जाणार असाल तर खिसा गरम ठेवा. तुम्हाला अधिक पैसे मोजावे लागणार आहे. मौल्यवान धातुची आताची किंमत जाणून घ्या. (Gold Silver Price Today 3 January 2025 )

सोन्याची मोठी झेप

31 डिसेंबर रोजी सोने 440 रुपयांनी सोने स्वस्त झाले होते. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी 1 जानेवारी 2025 रोजी 440 रुपयांनी तर 2 जानेवारी रोजी सोने 330 रूपयांनी वधारले. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,950 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,480 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आज सकाळच्या सत्रात सोन्यात घसरणीचे संकेत मिळत आहेत.

चांदीच्या किंमतीत बदल नाही

गेल्या आठवड्यात चांदी 1,100 हजार रुपयांनी महागली होती. तर 30 डिसेंबर रोजी किंमतीत बदल दिसला नाही. 31 डिसेंबर रोजी चांदी 1900 रुपयांनी स्वस्त झाली. 1 आणि 2 जानेवारी 2025 रोजी किंमतीत बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 90,500 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 77,079, 23 कॅरेट 76,770, 22 कॅरेट सोने 70,604 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 57,809 रुपये, 14 कॅरेट सोने 45,091 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 87,167 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक