AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 3 September 2024 : महिन्याच्या सुरुवातीला स्वस्ताईची वार्ता, सोने-चांदीत मोठी घसरण, ग्राहकांना मोठा दिलासा

Gold Silver Rate Today 3 September 2024 : ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या सत्रात आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सोने आणि चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. गेल्या पाच दिवसांत मौल्यवान धातूंमध्ये घसरणीचे सत्र सुरु आहे. तर गेल्या 20 दिवसांपासून नरमाईचे सत्र सुरु आहे.

Gold Silver Rate Today 3 September 2024 : महिन्याच्या सुरुवातीला स्वस्ताईची वार्ता, सोने-चांदीत मोठी घसरण, ग्राहकांना मोठा दिलासा
सोने आणि चांदीचा भाव
| Updated on: Sep 03, 2024 | 8:37 AM
Share

ग्राहकांच्या कानी सोने आणि चांदीच्या स्वस्ताईची सुवार्ता आली की नाही? ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आणि या सप्टेंबरच्या पहिल्या सत्रात मौल्यवान धातूत मोठी घसरण सुरु आहे. त्यापूर्वी पण या धातूंना मोठा पल्ला गाठता आलेला नाही. पण अमेरिकन फेडरल बँकेने व्याजदर कपातीचे संकेत दिले आहे. त्यातच जगात दोन-तीन आघाड्यांवर युद्ध सुरु आहे. देशात आता सणासुदीचा काळ सुरु झाला आहे. त्यामुळे बेशकिंमती धातूत उसळीची शक्यता नाकारता येत नाही. पण सध्या किंमती उतरल्या आहेत. काय आहेत आता सोने आणि चांदीचा भाव? (Gold Silver Price Today 3 September 2024 )

सोन्यात नरमाईचे सत्र

गेल्या आठवड्यापासून सोन्याच्या किंमतीत घसरणीचे संकेत आहेत. दोन आठवड्यापासून किंमतीत मोठी उलाढाल दिसली नाही. 30, 31 सप्टेंबर रोजी किंमतीत अनुक्रमे 100,110 रुपयांची घसरण झाली होती. 1 सप्टेंबर रोजी भाव स्थिर होता. 2 सप्टेंबर रोजी किंमती 270 रुपयांनी उतरल्या. तर 3 सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 66,850 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,920 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत 2500 रुपयांची घसरण

चांदीत 30 आणि 31 ऑगस्ट रोजी मिळून 1500 रुपयांची घसरण दिसली. तर या आठवड्याच्या सुरुवातीला सोमवारी भाव स्थिर होता. 2 सप्टेंबर रोजी चांदीत 1 हजारांची घसरण झाली. तर आज सकाळच्या सत्रात घसरणीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 85,900 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 71,511, 23 कॅरेट 71,225, 22 कॅरेट सोने 65,504 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 53,633 रुपये, 14 कॅरेट सोने 41,834 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 82,780 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी अखेर परवानगी
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा