AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 6 August 2024 : सोने-चांदीचा भाव काय, किती झाली पडझड, किती वाढला दर, जाणून घ्या…

Gold Silver Rate Today 6 August 2024 : मागील आठवड्यात सोने आणि चांदीने भरारी घेतली होती. किंमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली. आठवड्याच्या अखेरीस दोन्ही धातूत पडझड झाली. तर या आठवड्यात किंमतींची अशी आहे अपडेट

Gold Silver Rate Today 6 August 2024 : सोने-चांदीचा भाव काय, किती झाली पडझड, किती वाढला दर, जाणून घ्या...
सोने आणि चांदीचा भाव काय
| Updated on: Aug 06, 2024 | 8:29 AM
Share

श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीत मोठी उलाढाल दिसली नाही. या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्यात किंचित घसरण तर चांदीत दरवाढ दिसली. गेल्या आठवड्यात सोन्याने दोन हजारांची भरारी घेतली तर चांदीत 3200 रुपयांची दरवाढ झाली. मौल्यवान धातूंनी जोरदार फटकेबाजी केली. आठवड्याच्या अखेरीस दरवाढीला ब्रेक लागला. किंमतीत घसरण दिसली. बेशकिंमतीत धातूंच्या अशा आहेत किंमती… (Gold Silver Price Today 5 August 2024 )

सोने किंचित उतरले

या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्यात किंचित घसरण दिसली. गेल्या आठवड्यात सोने 1900 रुपयांनी वधारले. तर आठवड्याच्या अखेरीस किंमतीत घसरण दिसली. 5 ऑगस्ट रोजी 10 रुपयांची घसरण झाली. घसरणीचा हा एक निच्चांकी रेकॉर्डच म्हणावा लागेल. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 64,840 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 70,720 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी 200 रुपयांनी वधारली

गेल्या आठवड्यात चांदी 3200 रुपयांनी महागली होती. त्याअगोदर पण चांदीने मुसंडी मारली होती. तर बजेटच्या दिवशी आणि नंतर चांदीच चमक फिक्की पडली होती. या आठवड्याच्या सुरुवातीला 5 ऑगस्ट रोजी चांदीत 200 रुपयांची वाढ दिसली. तर आज सकाळच्या सत्रात चांदीत दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 85,700 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 69,117, 23 कॅरेट 68,840, 22 कॅरेट सोने 63,311 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 51,838 रुपये, 14 कॅरेट सोने 40,433 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे. एक किलो चांदीचा भाव 78,950 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते. सुट्टी असल्याने भाव अपडेट झाले नाही.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना