AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 6 October 2024 : सोन्याचा विषय लय हार्ड आहे, चांदीकडं क्रेडिटचं कार्ड आहे, ग्राहकांच्या खिशावर दरवाढीचा भार आहे

Gold Silver Rate Today 6 October 2024 : या महिन्याच्या अखेरीस दिवाळी आहे. त्यापूर्वी सोने आणि चांदीने दरवाढीचा ठेका धरला. मौल्यवान धातुत मोठी वाढ दिसत आहे. गुडरिटर्न्सनुसार सोन्याने या आठवड्यात चांगलीच झेप घेतली आहे. तर चांदीचा भाव अपडेट झालेला नाही. चांदी 1 लाखांचा तर सोने 80 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे.

Gold Silver Rate Today 6 October 2024 : सोन्याचा विषय लय हार्ड आहे, चांदीकडं क्रेडिटचं कार्ड आहे, ग्राहकांच्या खिशावर दरवाढीचा भार आहे
सोने आणि चांदीचा भाव
| Updated on: Oct 06, 2024 | 8:37 AM
Share

गेल्या दोन वर्षांपासून जगाला काही देशांनी वेठीला धरले आहे. यु्क्रेन-रशिया युद्ध, हमास, हिजबुल्लाह, इराण या तिकडीविरोधात इस्त्रायल असा सामना रंगला आहे. या युद्धामुळे अनेक वस्तू महागल्या आहेत. जगाला सोयाबीन, सूर्यफूल, गव्हापासून इतर अन्नधान्य पुरवठा करणारा युक्रेन युद्धग्रस्त आहे. तर आता इराणच्या तेल विहिरींना इस्त्रायल टार्गेट करण्याची भीती आहे. कच्चा तेलाचे भाव कधी नव्हे ते कमालीचे घसरले होते. या नव्या धोक्यामुळे ते वाढण्याची भीती आहे. गुडरिटर्न्सनुसार सोन्याने या आठवड्यात चांगलीच झेप घेतली आहे. तर चांदीचा भाव अपडेट झालेला नाही. चांदी 1 लाखांचा तर सोने 80 हजारांचा टप्पा गाठण्याची शक्यता आहे. आता अशा आहेत मौल्यवान धातुच्या किंमती (Gold Silver Price Today 6 October 2024 )

सोन्याची मोठी मुलूखगिरी

मागील आठवड्यात सोने 1500 रुपयाने वधारले होते. तर या आठवड्यात सोने 760 रुपयांनी महागले. म्हणजे दोन आठवड्यात सोन्याने जवळपास 2300 रुपयांची दरवाढ नोंदवली. सुरुवातीला 30 सप्टेंबरला 160 तर 1 ऑक्टोबरला 330 रुपयांनी सोने स्वस्त झाले. 2 ऑक्टोबरला 540 रुपयांनी ते महागले. त्यानंतर सलग दोन दिवस सोने 110 रुपयांनी वाढले. एकूण 760 रुपयांची वृद्धी नोंदवली. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 71,350 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 77,820 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीचा भाव अपडेट नाही

29 सप्टेंबरपासून चांदीचा भाव गुडरिटर्न्सवर अपडेट झालेला नाही. चांदीची कोणतीही खबरबात या संकेतस्थळावर उपलब्ध नाही. 28 सप्टेंबर रोजी शेवटचे 1 हजार रुपयांनी स्वस्ताईची नोंद आहे. त्यानंतर सलग सात दिवसांत भावात कोणताही बदल झालेला नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 95,000 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 75,964, 23 कॅरेट 75,660, 22 कॅरेट सोने 69,583 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 56,973 रुपये, 14 कॅरेट सोने 44,439 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 92,200 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे