AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : खरेदीचा साधा मुहूर्त, सोने-चांदी झाले की स्वस्त!

Gold Silver Rate Today : डॉलरने कमाल दाखविल्याने सोने-चांदीचा विरोध मोडून निघाला. डॉलर मध्यंतरी कमकुवत झाला. त्यामुळे सोने-चांदीने ऑगस्टच्या 21 तारखेपासून दरवाढीचे सीमोल्लंघन केले. पण आता डॉलरने पुन्हा शड्डू ठोकले आहेत.

Gold Silver Rate Today : खरेदीचा साधा मुहूर्त, सोने-चांदी झाले की स्वस्त!
Image Credit source: गुगल
| Updated on: Sep 07, 2023 | 9:16 AM
Share

नवी दिल्ली | 7 सप्टेंबर 2023 : डॉलरपुढे सोने-चांदीला अखरे लोटांगण घ्यावे लागले. 21 ऑगस्टपासून सोने-चांदीने जोरदार घौडदौड केली होती. दहा दिवसांतच सोन्याने 800 रुपयांचा तर चांदीने 4000 हून अधिकची उसळी घेतली होती. सप्टेंबर महिन्यात दोन्ही धातू यापेक्षा उंच उडी घेतील, असा काही तज्ज्ञांचा दावा होता. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात 2 आणि 4 तारखेला सोने वधारले होते. पण चांदीला विशेष कामगिरी बजावता आली नाही. या आठवड्यात सोने-चांदीला मोठी झेप घेता आली नाही. दोन दिवसांपासून दोन्ही धातूंमध्ये पडझड सुरु आहे. जागतिक बाजारात डॉलरने आगेकूच सुरु ठेवली आहे. त्यामुळे सोने-चांदी दबावाखाली आले आहेत. आता दरवाढीचे सीम्मोलंघन कधी होते, याकडे जागतिक गुंतवणूकदारांचे लक्ष लागेल आहे. तर स्थानिक खरेदीदारांना सोने-चांदी (Gold Silver Rate Today 7 September 2023) खरेदीची चांगली संधी चालून आली आहे.

सोने दबावाखाली

गुडरिटर्न्सनुसार, सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोन्यात दोन दिवस तेजीचे होते. 1 सप्टेंबरला भाव घसरले. तर 2 सप्टेंबरला 150 रुपयांची वाढ झाली. 3 तारखेला भाव जैसे थे होते. 4 सप्टेंबर भाव 100 रुपयांनी वाढले. 5 आणि 6 सप्टेंबर रोजी भाव घसरले. एकूण 300 रुपयांची घसरण झाली. 22 कॅरेट सोने 55,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 60,200 रुपये प्रति 10 ग्रॅम असा होता.

चांदीत 3000 रुपयांची घसरण

सप्टेंबर महिन्यात चांदीला सूर गवसला नाही. पहिल्या आठवड्याची सुरुवातच घसरणीने झाली. 1 सप्टेंबर रोजी 500 रुपयांची, 2 सप्टेंबरला 200 रुपयांची घसरण झाली. 4 सप्टेंबर रोजी चांदी किलोमागे 700 रुपयांनी स्वस्त झाली. 5 सप्टेंबर रोजी चांदीत 1000 रुपयांची घसरण झाली. आता 6 सप्टेंबर रोजी पुन्हा 500 रुपयांनी किंमती कमी झाल्या. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा भाव 74,700 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव

24 कॅरेट सोने 59,329 रुपये, 23 कॅरेट 59,091 रुपये, 22 कॅरेट सोने 54,345 रुपये, 18 कॅरेट 44497 रुपये, 14 कॅरेट सोने 34,708 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. चांदीचा भाव 72,065 रुपये होता. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशनने हा भाव जाहीर केला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

BIS Care APP

सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते समोर येईल.

Follow Us
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा
अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई! मुंबई महापालिका कचाट्यात, अचानक छापा टाकताच...
माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यू..
Video | माहाराष्ट्रातील पर्यटक गुजरातमधील पूरात अडकले, हेलिकॉप्टरने रेस्क्यूचा थरार! पहा व्हिडीओ
नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
CJP Protest | नुसता गोंधळ, धावपळ अखेर... जंतर-मंतर नाही नागपूरातील व्हिडीओ आला समोर
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
पावसाचा हाहाकार! पवित्र नदीचं रौद्र रूप, पाण्याची पातळी अचानक वाढली
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
Viral Video | व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
संध्याकाळी 6 वाजता बैठक, पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेरील आंदोलनानंतर कॉंग्रेसची पुढील रणनीती काय?
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
Suvrat Joshi | मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला समर्थन
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा घेणार लोकसभा अध्यक्षांची भेट
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
Assam Flood | आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल