AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 8 November 2024 : लग्न सराईपूर्वीच सोने-चांदीचा स्वस्ताचा बार, दणकावून आपटल्या किंमती, आता असा आहे भाव

Gold Silver Rate Today 8 November 2024 : दिवाळीत सोने आणि चांदीचा भाव कमी-जास्त झाला. तर आता तुळशी विवाह होण्यापूर्वी दोन्ही धातुत मोठी पडझड दिसून आली. अमेरिकेतील राजकीय घडामोडींचा जगभरातील व्यापारावर मोठा परिणाम दिसून येत आहे. जगातील दोन युद्ध थांबल्यास सोने आणि चांदीचा तोरा कमी होण्याची दाट शक्यता आहे.

Gold Silver Rate Today 8 November 2024 : लग्न सराईपूर्वीच सोने-चांदीचा स्वस्ताचा बार, दणकावून आपटल्या किंमती, आता असा आहे भाव
सोने चांदीत स्वस्ताई
| Updated on: Nov 08, 2024 | 8:26 AM
Share

अमेरिकेत मोठी राजकीय उलथापालथ झाली. एका विचाराचे सरकार जाऊन दुसरे सरकार आले. वैचारिक बदलाचा जगाच्या राजकारणावर आणि धोरणावर मोठा परिणाम दिसून येईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी तिथल्या जनतेला दिलेल्या आश्वासनानुसार दोन्ही युद्ध थांबविण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष होताच जागतिक व्यापार आणि उद्योगावर परिणाम दिसून आला. शेअर बाजारात तेजीचे सत्र आहे. तर सोने आणि चांदीत पडझड सुरू झाली आहे. जगातील दोन युद्ध थांबल्यास या दोन्ही धातुचा तोरा उतरण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. भारतीय सराफा बाजारात दोन्ही धातुत पडझड दिसून आली. आता असा आहे सोने आणि चांदीचा भाव (Gold Silver Price Today 8 November 2024 )

दरवाढीनंतर भाव उतरले

या आठवड्यात सोन्यात चढउतार दिसून आला. पहिल्या दिवशी किंमत स्थिर होती. तर या मंगळवारी सोने 150 रुपयांनी उतरले होते. तर बुधवारी भाव 150 रुपयांनी वाढले. 7 नोव्हेंबर रोजी दर घसरले. 180 रुपयांनी किंमती घसरल्या. आज सकाळच्या सत्रात सोन्याने नरमाईचे संकेत दिले आहे. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 72,150 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,710 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदीत आपटी बार

या आठवड्यात चांदीला जलवा दाखवता आला नाही. मंगळवारी 5 नोव्हेंबर रोजी चांदी हजार रुपयांनी उतरली. तर 7 नोव्हेंबर रोजी चांदीत 3,000 रुपयांची मोठी घसरण झाली. आज सकाळच्या सत्रात चांदीने नरमाईचा सूर आळवला आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 93,000 रुपये इतका आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

आज सकाळच्या सत्रात इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) 24 कॅरेट सोने 76,780, 23 कॅरेट 76,473, 22 कॅरेट सोने 70,331 रुपयांवर घसरले. 18 कॅरेट आता 57,585 रुपये, 14 कॅरेट सोने 44,916 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 90,369 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला घरबसल्या पण जाणून घेता येईल. सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येईल. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत तफावत दिसून येते. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करेल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. ग्राहक 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय
अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार राजकारणात पुन्हा सक्रिय.
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?
उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांच्या नावाची चर्चा; उद्या शपथविधी?.
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन
Ajit Pawar Death Update : बारामतीत अजित पवारांच्या अस्थींचं विसर्जन.
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार
राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना उद्या मुंबईत बोलावणार.
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल
KDMC मध्ये महायुतीकडून महापौर-उपमहापौर पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट
पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली शरद पवारांची सांत्वनपर भेट.
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले
दादांच्या खात्याबाबत लवकर निर्णय? प्रफुल्ल पटेल काय म्हणाले.
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना...
अजितदादांना अखेरची सलामी देताना घडली अघटीत घटना....
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला
राष्ट्रवादी नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला.
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार
पुढील रणनीती ठरवण्यासाठी नरेश अरोरा बारामतीत; पवार कुटुंबाची भेट घेणार.