AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today 11 June 2024 : सोने आणि चांदीत मिशन शांतता; भावात नाही मोठा बदल, अशा आहेत किंमती

Gold Silver Rate Today 11 June 2024 : 8 जूनपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही. तीन दिवसांपूर्वी मौल्यवान धातूत मोठी घसरण नोंदविण्यात आली. आता देशात स्थिर सरकार आलेले असताना बेशकिंमती धातू काय रंग दाखवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Gold Silver Rate Today 11 June 2024 : सोने आणि चांदीत मिशन शांतता; भावात नाही मोठा बदल, अशा आहेत किंमती
सोने-चांदीची काय अपडेट
| Updated on: Jun 11, 2024 | 8:29 AM
Share

केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे स्थिर सरकार आले आहे. तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे सोने आणि चांदी कोणती भरारी घेतात, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. तर ग्राहकांना मौल्यवान धातू स्वस्त होण्याची आशा आहे. गेल्या दोन वर्षांत दोन्ही धातूंनी मोठी उसळी घेतली आहे. 8 जून रोजी बेशकिंमती धातूत घसरण नोंदविण्यात आली होती. गेल्या तीन दिवसांत किंमतीत मोठा बदल झालेला नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला पण भावात चढउतार दिसला नाही. असा आहे सोने-चांदीचा भाव (Gold Silver Price Today 11 June 2024 )

सोने जैसे थे

गेल्या आठवड्यात सोने 1700 रुपयांनी वधारले होते. 8 जून रोजी 200 रुपयांनी किंमती उतरल्या होत्या. तर मागील दोन दिवसांत किंमती स्थिर आहेत. आज किंमतीत घसरणीचे संकेत मिळत आहे. दुपारी याविषयीचे चित्र स्पष्ट होईल. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 65,840 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,810 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

चांदी किंचित वधारली

गेल्या आठवड्यात चांदीने 5500 रुपयांची मुसंडी मारली होती. भावात बरीच घसरण पण दिसली होती. 8 जून रोजी चांदीत 4500 रुपयांचा आपटी बार झाला. या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीत 200 रुपयांची वाढ नोंदविण्यात आली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 91,700 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव काय

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), सोने आणि चांदी घसरली. 24 कॅरेट सोने 71,176 रुपये, 23 कॅरेट 70,891 रुपये, 22 कॅरेट सोने 65,197 रुपये झाले. 18 कॅरेट 53,382 रुपये, 14 कॅरेट सोने 41,638 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. एक किलो चांदीचा भाव 88,928 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.

किंमती मिस्ड कॉलवर

22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदी करण्यापूर्वी त्याच्या किंमती एका मिस्ड कॉलवर कळतील. तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल करु शकता. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा