AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीचे पानिपत, दरवाढीला वेसण, किंमती तर आल्या जमिनीवर

Gold Silver Rate Today : सोने-चांदीने फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात कहर केला होता. किंमती गगनाला भिडल्या होत्या. सोने आता लागलीच 70 हजारांच्या घरात पोहचतील असे वाटत असताना मे आणि जून महिन्याने सोन्याचे  पानिपत केले.

Gold Silver Rate Today : सोने-चांदीचे पानिपत, दरवाढीला वेसण, किंमती तर आल्या जमिनीवर
नरमाईचे सत्र
| Updated on: Jun 22, 2023 | 9:13 AM
Share

नवी दिल्ली : सोने-चांदीला (Gold Silver Rate Today) मोठा झटका बसला. सोने-चांदीचे पानिपत झाले. दरवाढीला ब्रेक लागला. सोने-चांदीने फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात कहर केला होता. किंमती गगनाला भिडल्या होत्या. सोने आता लागलीच 70 हजारांच्या घरात पोहचतील असे वाटत असताना मे आणि जून महिन्यात दोन्ही मौल्यवान धातूच्या किंमती पार जमिनीला टेकल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर वायदे बाजारातही सोने -चांदी दबावाखाली आले आहेत. वाढत्या किंमतींमुळे बऱ्याच खरेदीदारांनी सोने-चांदीतील गुंतवणूक दुसरीकडे वळवली होती. आज किंमती इतक्या दणक आपटतील असा कोणी दोन महिन्यांपूर्वी विचार सुद्धा केला नव्हता.

सोने दणकावून आपटले 21 जून रोजी सोने दणकावून आपटले. मंगळवारी, एक दिवस अगोदर 24 कॅरेट सोने 59345 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. 243 रुपये घसरण होऊन बुधवारी सोने 58,864 रुपयांवर येऊन ठेपले. गुडरिटर्न्सनुसार, 21 जून रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव 300 रुपयांनी घसरुन 54,850 रुपये तर 24 कॅरेट सोने 330 रुपयांनी घसरुन 59,820 रुपयांवर येऊन धडकल्या. सकाळच्या सत्रातील भाव अद्याप अपडेट केलेले नाही. किंमतीत चढउतार होऊ शकतो.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा भाव बुधवारी, 21 जून रोजी 24 कॅरेट सोने 58,864 रुपये, 23 कॅरेट 58,628 रुपये, 22 कॅरेट सोने 53,919 रुपये, 18 कॅरेट 44148 रुपये आणि 14 कॅरेट सोने 34435 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.चांदीत प्रति किलो 9 रुपयांची वाढ होऊन एक किलोचा दर 70,133 रुपये झाला.  ibjarates च्या भावानुसार हे दर आहेत.

मेकिंग चार्ज कसा होतो निश्चित ज्वेलरी डिझाईन तायर करण्यासाठी जितका वेळ लागतो, त्या हिशोबाने मेकिंग चार्ज लागतो. सोने किलोच्या मात्रेने बाहेर येते. त्यानंतर दुकानदार, कारागिर, या सोन्यापासून विविध दागिन्यांच्या डिझाईन तयार करतात. ज्यामध्ये 10 ते 30 टक्क्यांपर्यंत मेकिंग चार्ज, घडवणीचे शुल्क आकारण्यात येते. दागिने तयार करताना त्यावर किती सुबकपणे डिझाईन तयार करण्यात आली आहे. किती खुबीने दागिने तयार करण्यात आले आहे. त्यावर हे शुल्क आाकारण्यात येते. जितके आकर्षक, चित्तवेधक आणि बाराकाईने डिझाईन तयार करण्यात येते. तेवढाच त्यावरील मेकिंग चार्ज जास्त असतो. साधारण डिझाईन असेल तर कमी शुल्क आकारण्यात येते

मिस्ड कॉलवर जाणून घ्या भाव 22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोने खरेदीपूर्वी तुम्हाला त्याची किंमत एका मिस कॉलवर कळू शकते. त्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. त्यानंतर थोड्याचवेळात एसएमएस (SMS) येईल. त्याआधारे तुम्हाला किंमती कळतील. तसेच भाव जाणून घेण्यासाठी तुम्ही www.ibja.co वा ibjarates.com या ठिकाणी माहिती घेऊ शकता.

BIS Care APP सोनार तुम्हाला गंडवत असल्याची शंका असल्यास, अथवा तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास तुमच्या मोबाईलमध्ये BIS Care APP डाऊनलोड करा. प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही हे बीआयएस ॲप घेऊ शकता. तुम्ही खरेदी केलेल्या सोन्यावर त्याचा हॉलमार्क क्रमांक (HUID) अंकित असतो. हा क्रमांक टाकल्यास हॉलमार्किंगची संपूर्ण माहिती समोर येईल आणि सर्वात शेवटी हे सोने किती कॅरेटचे आहे ते दिसेल.

Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर