Gold Silver Rate Today | दोन दिवसात सोन्याच्या किंमतीत 1500 रुपयांची घट, मुंबईसह चार शहरांचे दर काय?

फक्त दिल्लीतच नव्हे तर अनेक ठिकाणच्या सराफा बाजारात सोने चांदीची किंमतीत घट झाली आहे. (Gold Silver Rate Today Update)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:32 PM, 2 Feb 2021
Gold Silver Rate Today | दोन दिवसात सोन्याच्या किंमतीत 1500 रुपयांची घट, मुंबईसह चार शहरांचे दर काय?
सोन्याचे दर

मुंबई : सोने-चांदीच्या किंमतीत नेहमीच चढ-उतार पाहायला मिळतात. आज मंगळवारी (2 फेब्रुवारी) सोने-चांदीच्या किंमतीत घट झाली आहे. नवी दिल्लीत सोन्याचे दरात 480 रुपयांनी घट झाली. त्यामुळे सोन्याची किंमत प्रतितोळा 47 हजार 702 रुपये इतकी झाली आहे. फक्त दिल्लीतच नव्हे तर अनेक ठिकाणच्या सराफा बाजारात सोने चांदीची किंमतीत घट झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे मागील सत्रात सोन्याचे दर प्रतितोळा 48 हजार 182 रुपये इतके झाले आहेत. (Gold Silver Rate Today Update)

तर सराफा बाजारात चांदीच्या किंमतीतही घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. चांदीच्या किंमतीत 3 हजार 097 रुपयांनी घट झाली आहे. त्यामुळे चांदीची किंमत प्रतिकिलो 70 हजार 122 रुपये इतकी झाली आहे. तर गेल्या सत्रात चांदीचे सत्रात प्रतिकिलो 73 हजार 219 इतके झाले आहेत.

जागतिक बाजारातही सोने-चांदीच्या किंमतीत घट

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने चांदीच्या किंमतीत घट झाली आहे. मंगळवारी सोन्याच्या जागतिक बाजारपेठेतील किमतीत प्रति औंस 1847 डॉलरची घसरण झाली आहे. तर चांदीची किंमत जागतिक बाजारपेठेत प्रति औंस 27.50 डॉलरने घट झाली आहे.

🛑मुंबईतील सोने-चांदीचे दर

22 कॅरेट सोने : 47,590 रुपये
24 कॅरेट सोने : 48,590 रुपये
चांदीचे दर : 71,000 रुपये (प्रतिकिलो)

🛑 पुण्यातील सोने-चांदीचे दर

22 कॅरेट सोने : 47,590 रुपये
24 कॅरेट सोने : 48,590 रुपये
चांदीचे दर : 71,000 रुपये (प्रतिकिलो)

🛑 नाशिक सोने चांदीचे दर

22 कॅरेट सोने : 47,590 रुपये
24 कॅरेट सोने : 48,590 रुपये
चांदीचे दर : 71,000 रुपये (प्रतिकिलो)

🛑 नागपूर सोने चांदीचे दर

22 कॅरेट सोने : 47,590 रुपये
24 कॅरेट सोने : 48,590 रुपये
चांदीचे दर : 71,000 रुपये (प्रतिकिलो)

सोन्याच्या किंमतीत घट होणार का?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी काल (1 फेब्रुवारी) संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी सोने-चांदीवरील पाच टक्के कस्टम ड्युटी कमी करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केली. मात्र, त्यांनी सोने-चांदीवर अडीच टक्क्याचा सेस म्हणजेच अधिभार लावणार असल्याचंदेखील सांगितलं. अर्थमंत्र्यांनी एकीकडे कस्टम ड्युटी कमी करण्याची घोषणा केली तर दुसरीकडे सोन्यावर अडीच टक्क्याचा सेस लावणार असल्याचं सांगितलं.

“सोन्यावर आधी साडेबारा टक्के कस्टम ड्युटी होती. ती आता साडेसात टक्क्यांपर्यंत आणली आहे. पाच टक्के कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. पण दुसरीकडे सरकारने अडीच टक्क्याचा सेस म्हणजेच अधिभार लावलेला आहे. जी पूर्वी साडेबारा टक्के ड्युटी होती ती आता साडेसात अधिक अडीच म्हणजे दहा टक्के कर हा लागणारच आहे. त्यामुळे अडीच टक्क्याचा निश्चित फायदा हा सोनारांना होईल. किंवा सोनं स्वस्त होईल. आता तो फायदा सोनार ग्राहकांपर्यंत कसं पोहोचवतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे”, अशी भूमिका अर्थतज्ज्ञ निखिलेश सोमण यांनी मांडली. (Gold Silver Rate Today Update)

संबंधित बातम्या : 

Gold Silver Rate : खरंच सोने-चांदीचे दर घसरणार का?

Gold Silver Price Today : कस्टम ड्युटी कमी करुनही सोने एवढे कसे महागले? वाचा आजचे दर