AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate: सोन्याच्या किंमतीने मोडला रेकॉर्ड, 5547 रुपयांनी झालं स्वस्त; वाचा आजचे दर

आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकी डॉलर वधारले तर घरेलू बाजारातही सोन्याचे किंमती आणखी कमी होऊ शकतात.

Gold Rate: सोन्याच्या किंमतीने मोडला रेकॉर्ड, 5547 रुपयांनी झालं स्वस्त; वाचा आजचे दर
| Edited By: | Updated on: Oct 16, 2020 | 3:17 PM
Share

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारानंतर आता घरेलू बाजारातही सोन्याचे भाव सातत्याने कमी होत आहे. भारतात आज पुन्हा एकदा वायदा भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. घरेलू बजारात सोन्याची किंमत 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवरून 50,653 रुपये प्रति 10 ग्रामवर आली आहेत. त्यामुळे तब्बल 5547 रुपयांनी सोनं स्वस्त झालं आहे. तर चांदीचा वायदा भाव 61,512 रुपये प्रति किलोग्रॅमवर घसरला आहे. त्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, भारतात 17 ऑक्टोबरपासून नवरात्रीचा उत्सव सुरू होणार आहे. त्यामुळे सोन्याची किंमत वाढण्याची शक्यता आहे. (gold sliver prices today 16 October drop down rs 5500 record highs)

पण जर आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकी डॉलर वधारले तर घरेलू बाजारातही सोन्याचे किंमती आणखी कमी होऊ शकतात. खरंतर, या आठवड्यामध्ये सोन्या-चांदीच्या भावांमध्ये अस्थिरता पाहायला मिळाली. मागच्या सत्रामध्ये सोनं आणि चांदीची किंमत 0.3 टक्क्यांनी वाढली होती. ऑगस्ट महिन्यात तर सोन्याचे किंमतीने सर्व रेकॉर्ड मोडत प्रति 10 ग्रॅम 56,200 रुपये गाठले होते. यावेळी चांदीही उच्च पातळीवर 80,000 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचली होती.

जागतिक बाजारात काय आहेत सोन्याचे दर? जागतिक बाजारात अमेरिकन डॉलर आणि अनुदानपर पॅकेज यांच्यामधील अनिश्चिततेमुळे आज सोन्याचे दर 0.1 टक्क्यांनी घसरून 1,906.39 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. या आठवड्यात आतापर्यंत भाव एका टक्क्यापेक्षा जास्त घसरले आहेत. इतर मौल्यवान धातूंमध्ये चांदी 0.2 टक्क्यांनी घसरून 24.26 डॉलर प्रति औंसवर तर प्लॅटिनम 0.2 टक्क्यांनी वधारून 866.05 डॉलरवर पोहोचला आहे.

अमेरिकेत पुढच्या महिन्यात होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांआधी काही अनुदानपर घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमती घसरल्या आहेत. जेव्हा अर्थव्यवस्था कमकुवत होते तेव्हा सोन्याचे भाव वाढतात आणि जेव्हा अर्थव्यवस्था चांगली असते तेव्हा सोन्याच्या किंमतींमध्ये घसरण होते.

दिवाळीपर्यंत वाढतील सोन्याच्या किंमती येणाऱ्या काही दिवसांमध्ये किंमती आणखी घसरू शकतात. पण दिवाळीपर्यंत सोन्याच्या किंमती मोठ्या झपाट्याने वाढतील. दिवाळीपर्यंत सोनं 50000-52000 रुपये प्रति 10 ग्रॅम होण्याची शक्यता आहे.

इतर बातम्या –

महाराष्ट्र हादरला! 7 वर्षाच्या चिमुकलीवर बलात्काराचा प्रयत्न, मुलीचा ओठ तुटला

मुसळधार पावसानं वाहून गेला पूल, पावसाचं रौद्र रुप दाखवणारे भीषण PHOTOS

(gold sliver prices today 16 october drop down rs 5500 record highs)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.