Today Gold Price : सोने घेणार उंच भरारी, डॉलर झाला कमकुवत,आजचा भाव काय

Today Gold Price : या 2 फेब्रुवारी रोजी सोन्याने विक्रम नोंदविला होता. सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. सोन्याने 58,000 हजारांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर सोन्यात सातत्याने घसरण होत आहे. पण सोने लवकरच भरारी घेण्याची शक्यता आहे.

Today Gold Price : सोने घेणार उंच भरारी, डॉलर झाला कमकुवत,आजचा भाव काय
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 9:27 AM

नवी दिल्ली : सोने (Gold Price Today) पुन्हा भरारी घेण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकेत डॉलरवर प्रचंड दबाव आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने (Federal Reserve) कडक उपाय योजना आखल्या आहेत. त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल. त्यामुळे डॉलरमध्ये (Dollar) गुंतवणूक करणारे परत सोन्याकडे वळण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किंमती लवकरच वाढण्याची शक्यता आहे. या 2 फेब्रुवारी रोजी सोन्याने विक्रम नोंदविला होता. सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. सोन्याने 58,000 हजारांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर सोन्यात सातत्याने घसरण होत आहे. पण सोने लवकरच भरारी घेण्याची शक्यता आहे. तर चांदीच्या किंमतीतही (Silver Price) वाढ होईल. स्पॉट गोल्ड 0105 GMT नुसार 0.1% वाढले आहे. काल हा भाव $1,856.47 प्रति औंस वर होता. US सोने फ्युचर्स $1,865.80 इतके आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला आरबीआयने रेपो दरात (Repo Rate) 25 बेसिस पॉईंटची वाढ करण्यात आली आहे. आरबीआयच्या निर्णयानंतर आता रेपो दर 6.25 टक्क्यांहून 6.50 टक्के इतका झाला आहे.आरबीआयच्या पतधोरण समितीने (MPC) हा निर्णय घेतला. त्यामुळे कर्जावरील व्याजदर वाढला. तर गुंतवणूक योजनावरील व्याज दरातही वाढ झाली आहे. त्याचा फटका सोन्याच्या गुंतवणुकीवर होण्याची शक्यता बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करत आहे. व्याजदर वाढल्यास गुंतवणूकदार सोन्यासोबतच इतर योजनातही रक्कम गुंतवतील.

इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएशन्सनुसार,(Indian Bullion Jewellers Association) मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 57020 रुपये होता. तर 22 कॅरेट सोने 55650 रुपये, 20 कॅरेट सोने 50750, 18 कॅरेट सोने 46180, 14 कॅरेट सोने 36780 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

हे सुद्धा वाचा

गुडरिटर्न्सनुसार, आज 22 कॅरेट सोन्याच्या भावात 100 रुपयांची प्रती 10 ग्रॅम घसरण झाली. आज सोन्याचा भाव 52,550 रुपये प्रती 10 ग्रॅम होता. तर 24 कॅरेट सोने 70 रुपये प्रति 10 ग्रॅमने घसरले. बुधवारी, 15 फेब्रुवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 57,310 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

  1. भारतीय मानके संस्थेद्वारे शुद्ध सोन्यासाठी हॉलमार्क देण्यात येतो
  2. 24 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर 999,  23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916
  3. तर 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 अंकीत असते
  4. अनेक ठिकाणी ग्राहक 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची आग्रहाने मागणी करतात
  5. काही लोक 18 कॅरेट सोन्याचा वापर करतात. जेवढा कॅरेट सोने असेल, तेवढे सोने शुद्ध ठरते
  6. 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध असते. 22 कॅरेट सोने जवळपास 91 टक्के शुद्ध होते
  7. 22 कॅरेट सोन्यात 9% इतर धातू असतात. दागिने तयार करण्यासाठी याचा वापर होतो
  8. त्यात तांबे, चांदी, झिंक यांचा वापर करुन दागिने तयार करण्यात येतात
  9. 24 कॅरेट सोने दमदार असते. पण त्याचा दागिने तयार करण्यासाठी वापर होत नाही

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.