‘ITC’ला अच्छे दिन, जाणून घ्या भविष्यातील परताव्याचा कल

कंपनीची कामगिरी सर्वच क्षेत्रात चांगली असल्यानं गेल्या दहा वर्षांपासून गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची नुकसान भरपाईसुद्धा येत्या दोन ते तीन वर्षांत वसूल होईल, असे जाणकार म्हणतात. त्यासोबतच गेल्या दोन वर्षांपासून आयटीसीचा लाभांश पाच टक्क्यांहून अधिक मिळत आहे.

'ITC'ला अच्छे दिन, जाणून घ्या भविष्यातील परताव्याचा कल
'ITC'ला अच्छे दिन
Follow us
| Updated on: Apr 02, 2022 | 5:30 AM

काही दिवसांपूर्वी आयटीसीचा त्रैमासिक निकाल आला आणि नाशिकच्या राहणाऱ्या योगेशच्या चेहऱ्यावर हसू आलं, पण त्याचा मित्र संदेश तोंड पाडून बसलाय. कारण, दोघांनीही (ITC)च्या शेअरमध्ये (Stock)गुंतवणूक (Investment) केली होती. आता योगेशला वाटतंय की, आयटीसीचे अच्छे दिन आले आहेत, तर दुसरीकडे संदेशला भविष्यातही यातून पैसे मिळतील असं वाटत नाहीये. तर मग असं काय आहे, की एकाच कंपनीच्या म्हणजेच आयटीसीच्या शेअरबाबत दोघांचेही वेगवेगळे विचार आहेत. तसं पाहायला गेलं तर, योगेश आणि संदेशसारखे असंख्य लोक आहेत, ज्यांचे आयटीसीबद्दल वेगवेगळी मतं आहेत. खरंच आयटीसीचे अच्छे दिन आले आहेत? की इथं आतासुद्धा चांगले रिटर्न मिळवण्यासाठी युद्ध करावं लागेल? तर सगळ्यात आधी रिटर्नबद्दल बोलुयात, गेल्या काही वर्षात आयटीसीमध्ये ज्यांनी गुंतवणूक केली आहे, त्यांना नक्की काय मिळालंय. आयटीसीच्या रिटर्नचा आकडा निराश करणारा आहे, असं ग्राफमधून दिसतं. दुसऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूकदार बक्कळ पैसा कमावताहेत, तर आयटीसीमध्ये 5 वर्षांहून अधिक काळापासून पैसा लावलेल्या संदेशसारख्यांना राग तर येणारच. यातून रिटर्न देण्यात आयटीसी कमी पडलीय हे स्पष्ट होतं.

सिगारेटच्या व्यावसायात कायद्याची अडचण

सिगारेटच्या व्यावसायात कायद्याची मोठी अडचण आहे, सरकार कधीही टॅक्स वाढवते, त्यामुळे कंपनीही इथं जास्त पैसा लावण्याची रिस्क घेत नाही. आयटीसीच्या अच्छे दिन येण्याची आशा सरकारच्या एका मोठ्या निर्णयामुळे तयार झाली आहे. सलग दुसऱ्या वर्षी सरकारने सिगारेटवर कुठलाही नवा कर लावलेला नाही. म्हणजे, सिगारेटच्या व्यवसायात कंपनीची कमाई ठिकठाक असल्यामुळे कंपनीचा नफा वाढेल, आणि आयटीसीच्या शेअर्सच्या किंमतीही वाढतील. म्हणजेच, कमी रिटर्न मिळण्याचा काळ आता धुरात उडून जाण्याची शक्यता आहे. आयटीसीचं सगळं साम्राज्य त्यांच्या सिगारेट व्यवसायावर उभारलेलं आहे.

आयटीसीचा कारभार पूर्वपदावर

सिगरेटचा धंदा चालतो कसा आता याचा विचार करा . ITC परताव्याचा मार्ग सिगरेटच्या धुरातूनच जातो. भले ही गोष्ट वाईट वाटेल पण सत्य हेच आहे . अनेक लोकांना सिगरेटचं व्यसन आहे. ITC च्या गुंतवणुकदारांना आणखी काय हवं ? कोरोनाकाळात शेअर्सचे भाव पडले होते मात्र आता ITC चा सिगरेटचा कारभार चमकू लागलाय. गेल्य आर्थिक वर्षाच्या डिसेंबर त्रैमासिकात EBIT म्हणजेच सिगारेट विभागाचा नफा 14% ने वाढून विक्रमी पातळीवर पोहोचलाय. इथपर्यंत तर हे सगळं भारी वाटत असेल. दुसऱ्या कारभारात काय परिस्थिती आहे? ITC ची इतर कामं कशी चालत आहेत ? कंपनीचा इतर व्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. डिसेंबर महिन्यात आलेल्या त्रैमासिक आकडेवारीनुसार कंपनीच्या विक्रीत 30 टक्क्यांची वाढ झालीये. विक्रीत सर्वाधिक वाटा हा कृषी व्यवसायाचा आहे. कोरोनाच्या नियमात शिथिलता आल्यानं हॉटेलचा व्यवसायही पुन्हा बहरलाय. FMCG क्षेत्रामुळे कंपनीची जवळपास 27 टक्के कमाई होते. कंपनीने सॅव्हलॉननंतर मास्क, सॅनिटायझर, हॅण्डवॉश सारखे नवे प्रोडक्ट बाजारात आणले आहेत. ITC चा कारभार पुन्हा पूर्व पदावर येत असल्यानं चांगल्या प्रगतीची अपेक्षा आहे.

शेअरमध्ये तेजी राहण्याची शक्यता

कंपनीची कामगिरी सुधारत आहे. मात्र गुंतवणूकदारांना लाभ कधी मिळणार हाच मोठा प्रश्न आहे. कंपनीची कामगिरी सर्वच क्षेत्रात चांगली असल्यानं गेल्या दहा वर्षांपासून गुंतवणूक केलेल्य गुंतवणुकदारांची नुकसान भरपाईसुद्धा येत्या दोन ते तीन वर्षात पूर्ण होईल, असे जाणकार म्हणतात. त्यासोबतच गेल्या दोन वर्षांपासून आयटीसीचा लाभांश पाच टक्क्यांहून अधिक मिळत आहे. म्हणजेच गुंतवणूकदार मालामाल होतील. आयटीसीच्या शेअर्सच्या किंमतीत तेजी कायम राहील असं दलालाचंही म्हणणं आहे.

संबंधित बातम्या

CNG आजपासून 6 रुपयांनी स्वस्त! नेमकी आता किती झाली CNGची किंमत? जाणून घ्या

अरे देवा, Crypto कमाईचे नव्हे फसवणुकीचे मायाजाल, काही क्षणातच गायब संपूर्ण माल

…तर भारतात पेट्रोल, डिझेल स्वस्त होणार; रशियाकडून कच्च्या तेलाच्या खरेदीवर घसघशीत सूट

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.