AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करदात्यांसाठी आनंदाची बातमी : ऑनलाईन इन्कम टॅक्स रिटर्नसाठी मुदत पुन्हा वाढवली, जाणून घ्या

इलेक्ट्रॉनिक फायलिंगमध्ये येणाऱ्या अनेक समस्या लक्षात घेता सीबीडीटीने हा निर्णय घेतलाय. आयकर विभागाची नवीन वेबसाईट तयार झाल्यापासून करदात्यांना तांत्रिक अडचणी येत होत्या आणि ते त्याबद्दल वारंवार तक्रार करत होते.

करदात्यांसाठी आनंदाची बातमी : ऑनलाईन इन्कम टॅक्स रिटर्नसाठी मुदत पुन्हा वाढवली, जाणून घ्या
income tax
| Edited By: | Updated on: Aug 31, 2021 | 7:09 AM
Share

नवी दिल्लीः Online Income Tax Return Filing Last Date Extended: करदाते आणि इतर भागधारकांसाठी एक मोठी दिलासादायक बातमी आहे. सीबीडीटी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) प्राप्तिकर कायद्याअंतर्गत अनेक महत्त्वाचे फॉर्म भरण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली. इलेक्ट्रॉनिक फायलिंगसाठी ही मुदत वाढवण्यात आलीय.

इलेक्ट्रॉनिक फायलिंगमध्ये येणाऱ्या अनेक समस्या लक्षात घेता सीबीडीटीने हा निर्णय घेतलाय. आयकर विभागाची नवीन वेबसाईट तयार झाल्यापासून करदात्यांना तांत्रिक अडचणी येत होत्या आणि ते त्याबद्दल वारंवार तक्रार करत होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी इन्फोसिसला वेबसाईट पूर्णपणे दुरुस्त करण्यासाठी 15 सप्टेंबरपर्यंत वेळ दिलाय.

सीबीडीटीने आयकर कायदा 1961 अंतर्गत अनेक फॉर्म इलेक्ट्रॉनिक भरण्याची अंतिम मुदत वाढवल्याने लाखो लोकांना दिलासा मिळेल. या संदर्भात सीबीडीटीने एक परिपत्रक जारी केले आणि अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करून माहिती दिली.

या फॉर्मसाठी मुदत वाढवली

फॉर्म क्रमांक सेक्शन 10 (23C), 12A, 35 (1) (ii)/(iia)/(iii) किंवा आयकर 80G 10 एमध्ये नोंदणी किंवा सूचना देण्याची शेवटची तारीख 30 जून 2021 होती, ती 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली. आयकर कायद्याचे कलम 10 (23C), 12A किंवा 80G अंतर्गत फॉर्म 10AB मध्ये नोंदणी किंवा मंजुरीची अंतिम मुदत, जी आधी 28 फेब्रुवारी 2022 होती, ती 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत प्राप्तकर्त्यांकडून 15G/15H फॉर्ममध्ये घोषणा अपलोड करण्याची अंतिम मुदत 15 जुलै 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली. त्याचबरोबर 2021-22 या आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत फॉर्म क्रमांक 15G/15H मध्ये प्राप्तकर्त्यांकडून प्राप्त केलेली घोषणा अपलोड करण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली. आर्थिक वर्ष 2020-21 साठी फॉर्म क्रमांक 1 मध्ये इक्वलायझेशन लेव्ही स्टेटमेंट दाखल करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली. FY 2021-22 च्या पहिल्या तिमाहीसाठी रेमिटन्सच्या संदर्भात अधिकृत डीलरने सादर केलेल्या फॉर्म क्रमांक 15CC क्वार्टरच्या तपशीलाची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली. आर्थिक वर्ष 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी रेमिटन्सच्या संदर्भात अधिकृत डीलरने सादर केलेल्या फॉर्म क्रमांक 15 सीसी क्वार्टरचा तपशील दाखल करण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर 2021 ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली. 30 जून 2021 रोजी संपलेल्या तिमाहीसाठी फॉर्म क्रमांक 10BBB मध्ये देशात केलेल्या गुंतवणुकीत पेन्शन फंडांद्वारे अहवाल देण्याची अंतिम मुदत आता 31 जुलै 2021 ते 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

सॉवरेन वेल्थ फंडाबाबत

सॉवरेन वेल्थ फंडांद्वारे देशात केलेल्या गुंतवणुकीसंदर्भात आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीसाठी फॉर्म II SWF माहिती सादर करण्याची अंतिम मुदत 30 जुलै 2021 पर्यंत वाढवण्यात आली. त्याचप्रमाणे सार्वभौम संपत्ती निधीद्वारे देशात केलेल्या गुंतवणुकीच्या संदर्भात, आर्थिक वर्ष 2021-22 च्या दुसऱ्या तिमाहीसाठी फॉर्म II SWF माहिती सादर करण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2021 होती, जी 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

आयकर विभागाने करदात्यांना 51531 कोटी केले परत; तुमच्या खात्यात पैसे आले की नाही?

Gold Rate Today : सोने स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी, वाचा सोन्याचे ताजे दर

Good news for taxpayers: Deadline for online income tax returns extended, find out

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.