AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना संकटात ईपीएफओकडून खूशखबर; सदस्यांना 7 लाख रुपयांचे कोरोना विमा कवच

ईपीएफओने ईडीएलआय म्हणजेच एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीमअंतर्गत विमा कवच वाढवून सात लाख रुपये केले आहे. (Good news from EPFO in the Corona crisis; Corona insurance cover of Rs 7 lakh to members)

कोरोना संकटात ईपीएफओकडून खूशखबर; सदस्यांना 7 लाख रुपयांचे कोरोना विमा कवच
हा 12 अंकी खास नंबर गमावल्यास थांबू शकते पेन्शन
| Edited By: | Updated on: May 10, 2021 | 9:01 AM
Share

नवी दिल्ली : देशात सध्या सर्वांनाच कोरोनाची धास्ती आहे. आपल्याला कोरोना संसर्ग झाला तर काय करायचे? अधिक उपचारांसाठी जास्त पैसे लागले तर आणायचे कोठून? आधीच नोकरीची सुरक्षा नाही, त्यात अनेकांच्या हातची नोकरी गेली आहे. मग वैद्यकीय खर्च कसा उभा करायचा, असे अनेक प्रश्न नागरिकांना भंडावून सोडत आहेत. याचदरम्यान नागरिकांना आपल्या भविष्य निर्वाह निधीची अर्थात पीएफची मोठी मदत होणार आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओ आपल्या सदस्यांना सात लाख रुपयांपर्यंत कोरोना जीवन विमाची सुविधा देत आहे. याबाबत अधिकाधिक नागरिकांना जागरुक करण्याची सध्या गरज आहे. जेणेकरून नागरिकांना दावेदारी सादर करतानाच विम्याची रक्कम प्राप्त करता येईल. ईपीएफओने ईडीएलआय म्हणजेच एम्प्लॉईज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीमअंतर्गत विमा कवच वाढवून सात लाख रुपये केले आहे. (Good news from EPFO in the Corona crisis; Corona insurance cover of Rs 7 lakh to members)

याआधी अडीच लाखापर्यंत मिळत होता विमा

विशेष म्हणजे हे विमा कवच त्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे, त्यांनी वर्षभरात एकाहून अधिक कंपन्यांमध्ये काम केले आहे. हा दावा कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांचे आजारपण, दुर्घटना आणि नैसर्गिक मृत्यूवरही केला जाऊ शकतो. आतापर्यंत या विमा कवचची रक्कम अडीच लाख रुपयांपर्यंत होती. या योजनेखाली दावा करणारा सदस्य कर्मचाऱ्याचा वारसदार असला पाहिजे. वारसदार व्यक्ती कर्मचाऱ्याचे आजारपण, दुर्घटना, अपघाती आणि नैसर्गिक मृत्यूच्या वेळी दावा करू शकते.

ईपीएफओने सध्याच्या कोरोना संकटात आपल्या सदस्यांना दिलासा देण्यासाठी ही योजना आणली आहे. कोणात्याही ऑर्गनाईज्ड समूहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरी आणि डीएची 12 टक्के रक्कम ईपीएफमध्ये अर्थात एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंडामध्ये जाते. त्याचबरोबर 12 टक्के योगदान कंपनीकडून दिले जाते. कंपनीच्या 12 टक्के योगदानापैकी 8.33 टक्के रक्कम एम्प्लॉई पेन्शन स्कीम अर्थात ईपीएसमध्ये जमा होते. अशा प्रकारे ईडीएलआय योजनेत केवळ कंपनीकडून प्रिमियम जमा होतो.

अशाप्रकारे होते दाव्याची गणना

ईडीएलआय स्कीममध्ये दाव्याची गणना कर्मचाऱ्याला मिळालेल्या मागील 12 महिन्यांतील बेसिक सॅलरी आणि डीएच्या आधारे केली जाते. या विम्याचे क्लेम कव्हर शेवटची बेसिक सॅलरी आणि डीएच्या 35 पट असते. जर तुम्हाला शेवटच्या 12 महिन्यांत बेसिक सॅलरी आणि डीए 15 हजार रुपये आहे, तर इन्शुरन्स क्लेम 35 पट म्हणजेच 7 लाख रुपये असेल.

जर ईपीएफ सदस्याचा अकाली मृत्यू झाला तर त्या सदस्याची वारसदार व्यक्ती इन्शुरन्स कव्हरसाठी क्लेम करू शकेल. क्लेम करणारी व्यक्ती 18 वर्षांपेक्षा कमी वयाची असेल तर त्याच्या वतीने त्याचा पालक क्लेम करू शकतो. यासाठी इन्शुरन्स कंपनीला कर्मचाऱ्याच्या मृत्यूचे प्रमाणपत्र, सक्सेशन सर्टिफिकेट, अल्पवयीन वारसदारच्या वतीने अर्ज करणाऱ्या पालकाचे प्रमाणपत्र आणि बँक तपशील द्यावा लागेल. ईपीएफओने आपल्या सदस्यांच्या हिताचा विचार करूनच योग्य प्रमाणात विमा कवचचा लाभ देण्यासाठी अनुकूल भूमिका घेतली आहे, असे ईपीएफओचे विभागीय आयुक्त जय कुमार यांनी सांगितले. (Good news from EPFO in the Corona crisis; Corona insurance cover of Rs 7 lakh to members)

इतर बातम्या

कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी किती घातक? जाणून घ्या एम्सच्या तज्ज्ञ डॉक्टरांची मते

Royal Enfield घेऊन लेह लडाखला जाण्याचा प्लॅन करताय, 3-4 महिने वाट पाहावी लागणार

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.