Cheque Clearance : आता कशाला पाहता दोन दिवसांची वाट; धनादेशाची रक्कम खात्यात, अवघ्या काही तासात

Cheque Clearance Time : आता चेक जमा होण्यासाठी दोन दिवस वाट पाहण्याची गरज उरली नाही. रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आज संपली. त्यात एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार धनादेश तातडीने त्याच दिवशी जमा होणार आहेत.

Cheque Clearance : आता कशाला पाहता दोन दिवसांची वाट; धनादेशाची रक्कम खात्यात, अवघ्या काही तासात
धनादेशाविषयी मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Aug 08, 2024 | 12:11 PM

Cheque Clearance Time Reduced : आज रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची बैठक संपली. 6 ते 8 ऑगस्ट दरम्यान ही बैठक झाली. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरची ही पहिली बैठक होती. त्यात रेपो दरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय झाला. पण आरबीआयने एक महत्वाचा निर्णय घेतला. त्यानुसार, धनादेशाने होणाऱ्या व्यवहारांना आता गती मिळाली आहे. व्यावसायिक, व्यापारी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता झटपट चेक क्लिअर होईल. धनादेशाची रक्कम जमा होण्यासाठी दोन दिवसांची वाट पाहण्याची गरज उरली नाही. त्याच दिवशी अवघ्या काही तासात धनादेश जमा होतील.

धनादेश जमा होण्याचा कालावधी झाला कमी

धनादेश जमा होण्याचा कालावधी आता एकदम कमी झाला आहे. यापूर्वी धनादेशाची रक्कम खात्यात जमा होण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागत होता. आता हा कालावधी अवघ्या काही तासांवर आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी हा निर्णय जाहीर केला. पतधोरण समितीची बैठक आज संपली. त्यानंतर त्यांनी याविषयीची माहिती दिली. धनादेश देणारा आणि धनादेश स्वीकारणारा या दोघांना याचा फायदा होईल. अनेक व्यवहारांना यामुळे गती मिळेल. शैक्षणिक संस्था, जमीन, मालमत्ता खरेदीचे व्यवहार आणि इतर अनेक व्यवहारांमध्ये धनादेशचा उपयोग होतो.

हे सुद्धा वाचा

यापूर्वी दोन दिवसांचा कालावधी

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी यापूर्वी धनादेश व्यवहार पद्धतीसाठी (CTS) दोन दिवसांचा कालावधी लागत असल्याचे स्पष्ट केले. पण आता या बदलामुळे त्याच दिवशी अवघ्या काही तासात धनादेश वटतील आणि रक्कम संबंधित खात्यात जमा होणार आहे.

रेपो रेट जैसे थे

देशात महागाईचा कहर आहे. सर्वसामान्यांची महागाईपासून सूटका झालेला नाही. रेपो दर कमी झाला तर निदान कर्जाचा हप्ता तरी कमी होईल, अशी ग्राहकांची अपेक्षा होती, ती फोल ठरली. 9 व्यांदा आरबीआयच्या पतधोरण समितीने रेपो दरात कोणताच बदल केला नाही. फेब्रुवारी 2023 पासून रेपो रेटमध्ये कोणताच बदल झालेला नाही. गेल्या 25 वर्षांत असे दुसऱ्यांदा घडले, ज्यावेळी आरबीआयने दीर्घकाळांपर्यंत रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही.

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.