AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारने 63.23 लाख करदात्यांच्या खात्यात 92,961 कोटी रुपये केले परत, परताव्याची स्थिती काय?

प्राप्तिकर विभागाचे म्हणणे आहे की, विभाग करदात्यांशी संवाद साधण्याच्या प्रक्रियेत आहे, ज्यांना अद्याप मूल्यांकन वर्ष 2020-21 साठी परतावा मिळाला नाही. यासाठी करदात्यांचा प्रतिसाद आवश्यक असेल. विभागाच्या म्हणण्यानुसार, बहुतेक प्रकरणांमध्ये कलम 245 अंतर्गत समायोजन आणि बँक खात्यांचे चुकीचे जुळण्यामुळे परतावा अयशस्वी होऊ शकतो.

सरकारने 63.23 लाख करदात्यांच्या खात्यात 92,961 कोटी रुपये केले परत, परताव्याची स्थिती काय?
| Edited By: | Updated on: Oct 21, 2021 | 3:22 PM
Share

नवी दिल्लीः आयकर विभागाने (Income Tax Department) 63.23 लाखांहून अधिक करदात्यांच्या खात्यात आयटीआर परताव्याचे 92,961 कोटी रुपये जारी केलेत. प्राप्तिकर विभागाने चालू आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 1 एप्रिल 2021 ते 18 ऑक्टोबर 2021 दरम्यान परतावा जारी केला. आयकर विभागाने 61,53,231 व्यक्तींच्या संदर्भात 23,026 कोटी रुपयांचा परतावा जारी केला. त्याचबरोबर 1,69,355 प्रकरणांमध्ये 69,934 कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर परतावा जारी करण्यात आलाय. आयटी विभागाने ट्विट करून ही माहिती दिली. सरकारने मूल्यांकन वर्ष 2021-22 साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवली. यापूर्वी मे महिन्यात सीबीडीटीने आयटीआर दाखल करण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली होती, परंतु ती पुन्हा एकदा वाढवण्यात आली.

परतावा न मिळण्याची कारणे काय असू शकतात?

प्राप्तिकर विभागाचे म्हणणे आहे की, विभाग करदात्यांशी संवाद साधण्याच्या प्रक्रियेत आहे, ज्यांना अद्याप मूल्यांकन वर्ष 2020-21 साठी परतावा मिळाला नाही. यासाठी करदात्यांचा प्रतिसाद आवश्यक असेल. विभागाच्या म्हणण्यानुसार, बहुतेक प्रकरणांमध्ये कलम 245 अंतर्गत समायोजन आणि बँक खात्यांचे चुकीचे जुळण्यामुळे परतावा अयशस्वी होऊ शकतो.

तुमची परतावा स्थिती तपासा

आयकर विभागाने पाठवलेल्या परताव्याची स्थिती तपासण्यासाठी तुम्ही विभागाच्या नवीन ई-फायलिंग वेबसाईटला भेट देऊ शकता. येथे लॉगिन केल्यानंतर आयकर परताव्याचा पर्याय दिसेल, जिथे आपण स्थिती तपासू शकता. ज्यांना आतापर्यंत परतावा मिळाला नाही, त्यांच्यासाठी विभागाने एक सल्लाही जारी केलाय.

नवीन आयकर पोर्टल कसे तपासायचे?

>> सर्वप्रथम आयकर वेबसाईट www.incometax.gov.in वर जा आणि तुमचा पॅन यूजर आयडी आणि पासवर्ड टाकून खात्यात लॉगिन करा. >> लॉगिन केल्यानंतर ई-फाईल पर्यायावर क्लिक करा. ई-फाईल पर्यायाखाली प्राप्तिकर परतावा निवडा आणि नंतर दाखल केलेल्या रिटर्न पर्यायावर क्लिक करा. >> यानंतर तुम्ही दाखल केलेले नवे ITR तपासा. तपशील पाहा आणि पर्याय निवडा. एकदा निवडल्यानंतर तुम्हाला आयटीआर दाखल केल्याची स्थिती दिसेल. यामध्ये तुम्हाला कर परतावा जारी करण्याची तारीख, परत केलेली रक्कम आणि या वर्षाची थकबाकी असलेल्या कोणत्याही परताव्याच्या मंजुरीची तारीख देखील दिसेल.

संबंधित बातम्या

Alert : 31 ऑक्टोबरपूर्वी ITR फाईलसह ही चार कामे आटपा, अन्यथा मोठं नुकसान

RD खातं उघडल्यानंतर बँकांच्या तुलनेत मिळणार जास्त व्याज, पैसेसुद्धा राहणार सुरक्षित

Government returns Rs 92,961 crore to 63.23 lakh taxpayers’ accounts, what is the status of refunds?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.