Home Loan : गृहकर्जावर आता किती वाढेल EMI? एवढी रक्कम द्यावी लागणार आता जास्त

Home Loan : आरबीआयच्या निर्णयानंतर गृहकर्जावर आता ईएमआय किती वाढेल?

Home Loan : गृहकर्जावर आता किती वाढेल EMI? एवढी रक्कम द्यावी लागणार आता जास्त
ईएमआयचा दणकाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 07, 2022 | 7:50 PM

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) पुन्हा एकदा रेपो दरात (Repo Rate) 35 बेसिस पाईंटची वाढ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे रेपो दरात 5.9 टक्क्यांवरुन 6.25 टक्के झाला आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम गृहकर्जावर (Home Loan) होणार आहे. आरबीआयच्या धोरणामुळे बँका तात्काळ ईएमआय (EMI) वाढवतील. गृहकर्जावरील व्याजदरात आता वाढ होईल. त्यामुळे पुढील महिन्यापासून तुमच्या खिशावर बोजा पडणार आहे.

RBI ने सलग पाचव्यांदा व्याज दर वाढविला आहे. आठ महिन्यांच्या आता रेपो दरात 4 टक्क्यांहून 6.25 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे रेपो दरात आतापर्यंत 2.25 टक्क्यांची वृद्धी होत आहे. परिणामी गृहकर्जधारकांवर EMI चा बोजा पडत आहे.

तुम्ही घरासाठी 30 लाखांचे गृहकर्ज घेतले असे गृहीत धरुयात. एप्रिल 2022 पर्यंत रेपो दर 4 टक्के होता. त्यावेळी गृहकर्जासाठी सरासरी दर 6.75 टक्क्यांचा जवळपास होता. ईएमआय गणनेनुसार, 20 वर्षांसाठी त्याआधारे ईएमआय प्रति महिना 22811 रुपये येत होता.

हे सुद्धा वाचा

आता रेपो दरात 2.25 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर गृहकर्जातही सरासरी वाढ झाल्याचे दिसून येते. गृहकर्ज 6.75 टक्क्यांहून थेट 9 टक्क्यांपर्यंत पोहचले आहे. आता 20 वर्षांसाठी घेतलेल्या गृहकर्जावर तुम्हाला 26992 रुपयांचा ईएमआय द्यावा लागेल .

गेल्या आठ महिन्यात नागरीक वाढत्या महागाईने बेजार झालेले आहेत. कर्जदारांना तर मोठा फटका सहन करावा लागला आहे. आठ महिन्यांत 30 लाखांच्या गृहकर्जासाठी आता जवळपास 4200 रुपये अधिक मोजावे लागत आहेत.

एप्रिल 2022 च्या तुलनेत जानेवारी 2023 मध्ये गृहकर्जाच्या ईएमआयमध्ये जवळपास 18 टक्क्यांची वृद्धी दिसून येत आहे. जर होम लोन तुम्ही 30 वर्षांसाठी घेतले असेल तर त्यासाठी कर्जदारांचा ईएमआय जवळपास 24 टक्क्यांनी वाढला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.