AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Home Loan Rate: SBI ते HDFC पर्यंत, कुठे मिळेल स्वस्त होम लोन, सरकारी बँक की खासगी बँक? झटपट चेक करा

Home Loan Rate: काल आरबीआयने रेपो दरात कुठलाही बदल केला नाही. रेपो दर जैसे थे ठेवले. Repo Rate मध्ये कोणताही बदल न झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. नवीन घर घेत असाल तर सर्वात स्वस्त होम लोन कुठे मिळेल ते एकदा तपासून घ्या.

Home Loan Rate: SBI ते HDFC पर्यंत, कुठे मिळेल स्वस्त होम लोन, सरकारी बँक की खासगी बँक? झटपट चेक करा
गृहकर्ज कुठे स्वस्त?Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 07, 2026 | 12:25 PM
Share

Home Loan Rate: स्वतःचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. देशात मालमत्ता, फ्लॅट आणि घरांच्या किंमती महागल्या आहेत. तर केंद्रीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कुठलाही बदल केलेला नाही. रेपो दर जैसे थे ठेवले आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पतधोरण समितीच्या बैठकीनंतर आरबीआयच्या गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी रेपो दर जाहीर केले. रेपो दर 5.25 टक्के (Repo Rate) इतका आहे. नवीन घर घेत असाल तर सर्वात स्वस्त गृह कर्ज कुठे मिळेल हे जाणून घ्या.

सरकारी बँकांमध्ये काय आहे व्याजदर?

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) गृहकर्ज दर 7.25 टक्के ते 9.05 टक्के

बँक ऑफ बडोदा 7.20 टक्के ते 9.25 टक्के व्याजदर

सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया दोन्ही बँकांचा सुरुवातीचा व्याज दर 7.10 टक्के

यूनियन बँक ऑफ इंडिया 7.15 टक्के गृहकर्ज व्याजदर

कॅनरा बँकमध्ये गृहकर्जाचा व्याजदर हा 7.25 टक्के इतका आहे

इंडियन ओव्हरसीज बँक ग्राहकांना 7.10 टक्के व्याजदर गृहकर्ज देते

खासगी बँकांचा गृहकर्ज व्याजदर किती?

आयसीआयसीआय बँकेचा गृहकर्जाचा सुरुवातीचा व्याजदर 7.50 टक्के इतका आहे

कोटक महिंद्रा बँक 7.60 टक्के गृहकर्ज व्याजदर

एचडीएफसी बँक गृहकर्जाचे सुरुवातीचे व्याजदर 7.75 टक्के इतके आहे

ॲक्सिस बँकेच्या गृहकर्जाची सुरुवात 8 टक्के व्याजदराने होते.

गृहकर्ज घेण्यासाठी विविध पर्याय

बँका आणि हाऊसिंग फायनान्स कंपन्या ग्राहकांच्या सुविधेसाठी गृहकर्ज देताना विविध पर्याय समोर ठेवतात. त्यातील एक पर्याय ग्राहकाने निवडणे आवश्यक असते. मोरेटोरियम करह्ज, नो-ईएमआय टिल पझेशन आणि बलून पेमेंट असे हे प्रकार असतात. तर फ्लोटिंग ईएमआय आणि फिक्स्ड ईएमआयचा पर्याय सुद्धा ग्राहकांना मिळतो. ग्राहक त्याच्या गरजेनुसार आणि बाजारातील परिस्थितीचे अवलोकन केल्यानंतर त्याचा निर्णय घेऊ शकतो. गृहकर्ज घेताना बँकांचे व्याजदर, हिडन चार्जेस, इतर प्रक्रिया शुल्क या सर्वांचा विचार करणे आवश्यक आहे. तसेच परतफेडीला उशीरा झाला. हप्ता जमा होण्यास उशीर झाला तर किती दंड लागेल, कोणती कारवाई होईल याची माहिती घेणे आवश्यक आहे.

(डिस्क्लेमर: ही उपलब्ध स्त्रोतावरून दिलेली माहिती आहे. गृहकर्जाचे व्याजदर कमी-जास्त होत असतात. प्रत्यक्ष बँकेत जाऊन त्याची खातरजमा करा. टीव्ही ९ मराठी याविषयीचा कोणताही दावा करत नाही.)

Follow Us
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... संजय
रवींद्र चव्हाण गुंडासारखे पंचतारांकित हॉटेलमध्ये घुसले अन्... बापरे! संजय राऊत हे काय बोलून गेले? थेट सोने तस्करीशी कनेक्शन!
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण अन् तरुणी
मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?