AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज आला, क्लिक करताच बँक अकाऊंट रिकामी, नवी मुंबईतील काय घडलं?

नवी मुंबईत शेअर बाजारात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून एका गुंतवणूकदाराची १.०९ कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे. बनावट SEBI प्रमाणपत्र आणि व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे हा फसवणुकीचा जाळा रचण्यात आला होता.

व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज आला, क्लिक करताच बँक अकाऊंट रिकामी, नवी मुंबईतील काय घडलं?
Cyber Fraud
| Updated on: Jun 07, 2026 | 12:11 PM
Share

शेअर बाजारात गुंतवणूक करून अल्पावधीत प्रचंड नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. नवी मुंबईतील एका गुंतवणूकदाराचे तब्बल १ कोटी ९ लाख ३१ हजार रुपये लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांनी अज्ञात व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन, मोबाईल धारक आणि बँक खातेधारकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

कसे अडकले जाळ्यात?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ मार्च २०२६ ते ३ जून २०२६ या कालावधीत हा फसवणुकीचा प्रकार घडला. तक्रारदार घरी असताना त्यांना IIFL Invesco VII 2026 10x Growth Strategy Y113 नावाच्या एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये परस्पर अॅड करण्यात आले. या ग्रुपचे अॅडमिन आर. वेंकट रमण (R. Venkat Raman), टिना मल्होत्रा (Tina Malhotra) आणि त्यांच्या इतर साथीदारांनी तक्रारदाराशी संपर्क साधून त्यांचा विश्वास संपादन केला.

यानंतर गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्यासाठी आणि आपली स्कीम कशी कायदेशीर आहे हे भासवण्यासाठी आरोपींनी IIFL Capital कंपनीच्या नावाने भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाचे (SEBI) बनावट नोंदणी प्रमाणपत्र तक्रारदाराला पाठवले. गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असल्याचे वाटल्याने तक्रारदाराने आरोपींनी सांगितलेल्या विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम जमा केली. तक्रारदाराने पैसे गुंतवल्यानंतर आरोपींनी त्यांना IFLVIP नावाचे एक मोबाईल अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. या अॅपवर तक्रारदाराला त्यांच्या गुंतवणुकीवर मोठा नफा झाल्याचे दाखवले जात होते.

मात्र, जेव्हा तक्रारदाराने आपली मूळ रक्कम आणि मिळालेला नफा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना पैसे देण्यास नकार देण्यात आला. यानंतर मग तक्रारदाराला त्याची १ कोटी ९ लाख ३१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पोलिसात धाव घेतली. या प्रकरणात व्हॉट्सअॅप ग्रुप अॅडमिन, बनावट अॅपचे निर्माते आणि ज्या बँक खात्यांवर पैसे वर्ग करण्यात आले त्या खातेधारकांनी संगनमताने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणीन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत. यानंतर पोलिसांनी सोशल मीडियावरील गुंतवणुकीचे सल्ले, अनोळखी व्हॉट्सअॅप ग्रुप, अवास्तव परताव्याची आमिषे आणि बनावट SEBI प्रमाणपत्रांना बळी पडू नका. कोणत्याही अनोळखी अॅपवर पैसे गुंतवण्यापूर्वी त्याची अधिकृतता तपासून पहा, असा इशारा दिला आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला