AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाप म्हणून एवढं तरी करावंच लागतं; मुकेश अंबानी यांनी मुलांना किती दिली हिस्सेदारी?

गुजरातच्या जामनगरमध्ये अनंत अंबानी यांच्या प्री-वेडिंग इव्हेंटचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी जगभरातील बड्या हस्ती उपस्थित होत्या. बॉलिवूडचे अनेक बडे कलाकारही या सोहळ्याला आले होते. या सोहळ्याच्या निमित्ताने अंबानी कुटुंबीयांविषयची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अंबानी कुटुंबाला किती शेअर मिळाले. कुटुंबातील कुणाकडे किती हिस्सेदारी आहे, याविषयीची माहिती देत आहोत.

बाप म्हणून एवढं तरी करावंच लागतं; मुकेश अंबानी यांनी मुलांना किती दिली हिस्सेदारी?
Mukesh Ambani Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 04, 2024 | 9:13 PM
Share

नवी दिल्ली | 4 मार्च 2024 : अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंग इव्हेंटचा सोहळा अत्यंत थाटात पार पडला. तब्बल तीन दिवस गुजरातचं जामनगर देशीविदेशी पाहुण्यांनी गजबजून गेलं होतं. जगभरातून जवळपास एक हजाराहून अधिक पाहुणे या सोहळ्याला आले होते. अमेरिकेची प्रसिद्ध गायिका रिहाना हिने सुद्धा आपला धमाकेदार परफॉर्मन्स सादर करून सोहळ्याला चार चांद लावले. तर मार्क झुकरबर्ग यांनी या सोहळ्यात हजेरी लावून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

हा सोहळा एवढा खास आणि नेत्रदीपक होता की अंबानी कुटुंबाशी संबंधित बातम्या खंगाळण्यास लोकांनी सुरुवात केली आहे. अंबानी यांचं साम्राज्य किती मोठं आहे? त्यांच्या कुटुंबात कोण कोण असतं? त्यांची लाइफस्टाईल कशी आहे? त्यांना कोणते पदार्थ आवडतात? इथपासून ते अंबानी कुटुंबीयांचे आवडते पर्यटनस्थळ कोणते? इथपर्यंतची माहिती या निमित्ताने घेतली जात आहे. आम्ही तुम्हाला अंबानी यांच्या व्यवसायाबाबतची माहिती देणार आहोत.

ती चूक टाळली

मुकेश अंबानी यांना दोन मुलं आणि एक मुलगी आहे. त्यांनी आपल्या तिन्ही मुलांमध्ये समसमान शेअर वाटले आहेत. धीरूभाई अंबानीसारखी चूक त्यांना करायची नव्हती. धीरूभाई यांच्या मृत्यूनंतर रिलायन्स ग्रुपमध्ये दोन गट पडले. रिलायन्स इंडस्ट्रीज मुकेश अंबानींकडे आली तर रिलायन्स कॅपिटल अनिल अंबानी यांच्याकडे आलं.

रिलायन्सच्या प्रमोटर्सकडे 50:30 टक्के भागीदारी आहे. तर बाकी 49.70 टक्के शेअर पब्लिककडे आहे. विशेष म्हणजे या 50.30 टक्के शेअरमधील हिस्सा अंबानी कुटुंबाकडे नाही. रिलायन्स इंडस्ट्रीत मुकेश अंबानी यांच्या वाट्याला फार थोडा हिस्सा आला आहे. त्यातील काही भागांचं त्यांनी आपल्या कुटुंबात बरोबरीने वाटप केलं आहे.

कोकिलाबेनकडे अधिकार

या कंपनीत अंबानी कुटुंबातील 6 लोकांकडे शेअर आहेत. मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश, अनंत आणि ईशा अंबानी. तर मुकेश अंबानी यांची आई कोकिलाबेन धीरूभाई अंबानी यांच्याकडे सर्वाधिक शेअर आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, अंबानी यांनी आपल्या तिन्ही मुलांमध्ये एक समान 80,52,021 शेअरचं वाटप केलं आहे. तर कोकिलाबेन यांच्याकडे 1,57,41,322 शेअर आहेत म्हणजेच कोकिलाबेन यांचा कंपनीत 0.24% हिस्सा आहे.

सर्वात मोठी कंपनी

यावेळी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या एका शेअरची किंमत 3,010 रुपये आहे. हा भाव 4 मार्च रोजीचा आहे. या कंपनीने गेल्या सहा महिन्यात 23 टक्के रिटर्न दिलं आहे. पाच वर्षाचा आकडा पाहिला तर या कंपनीचा आकडा 137 टक्क्याच्या पुढे गेला आहे. रिलायन्सचा टोटल मार्केट कॅप 20 लाख कोटी रुपयाहून अधिक आहे. भारतातील सर्वाधिक मोठी मार्केट कॅप असलेली ही कंपनी आहे. मुकेश अंबानी या कंपनीचे चेअरमन आहेत.

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.