AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पेट्रोल-डिझेलमुळे सरकार मालामाल! या राज्यांना मिळतो सर्वाधिक महसूल, महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर?

Tax on Fuel : भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेल केवळ वाहन चालवण्यासाठीचे इंधन नसून ते सरकारासाठी उत्पन्नाचा मोठा स्रोत आहेत. इंधन विकून सरकारला किती महसूल मिळतो याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

पेट्रोल-डिझेलमुळे सरकार मालामाल! या राज्यांना मिळतो सर्वाधिक महसूल,  महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर?
Petrol DieselImage Credit source: Google
| Updated on: Apr 06, 2026 | 3:55 PM
Share

युद्धामुळे आखाती देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे, त्यामुळे भारतासह अनेक देशांना आगामी काळात इंधन संकटाचा सामना करावा लागू शकतो. भारतामध्ये पेट्रोल आणि डिझेल केवळ वाहन चालवण्यासाठीचे इंधन नसून ते सरकारासाठी उत्पन्नाचा मोठा स्रोत आहेत. कारण आपण जेव्हा पेट्रोल किंवा डिझेल खरेदी करतो तेव्हा त्या किमतीत तेलाच्या किमतीसह वेगवेगळे कर लावलेले असतात. केंद्र सरकार यावर एक्साइज ड्युटी आकारते, तर राज्य सरकारे इंधनावर VAT लावते. याद्वारे दोन्ही सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. त्यामुळे वेगवेगळ्या राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती वेगळ्या दिसतात. आज आपण पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीतून कोणत्या राज्याला सर्वाधिक महसूल मिळतो ते जाणून घेऊयात.

जागतिक पातळीवर युद्धाची स्थिती निर्माण झाल्याने गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होताना पहायला मिळत आहेत. यामुळे सर्वसामान्यांवरील आर्थिक भार वाढण्याची शक्यता होती. मात्र हा भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारने एक्साइज ड्युटीत मोठी कपात केली होती. पेट्रोलवरील ड्युटी मोठ्या प्रमाणात कमी करण्यात आली, तर डिझेलवरील कर जवळपास संपवण्यात आला. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारला किती महसूल मिळतो?

पेट्रोलियम पदार्थांमधून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. आर्थिक वर्ष 2022 च्या पहिल्या 9 महिन्यांतच या क्षेत्रातून सुमारे 5.45 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. यापैकी जवळपास 3.08 लाख कोटी रुपये केंद्र सरकारला मिळाले होते. याचाच अर्थ इंधन हे केंद्र सरकारच्या कमाईचा एक प्रमुख स्त्रोत आहे. हा पैसा सरकार वेगवेगळ्या विकासकांसाठी वापरते.

राज्य सरकाराची कमाई

भारतातील सर्व राज्यांच्या सरकारला इंधनातून मोठी रक्कम मिळते. राज्य सरकारे देखील पेट्रोल आणि डिझेलवर VAT लावतात. 2024-25 मध्ये राज्यांनी मिळून सुमारे 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल जमा केला. तर 2025-26 च्या पहिल्या सहामाहीतच सुमारे 1.47 लाख कोटी रुपयांची कमाई झाली आहे. समोर आलेल्या आकडेवारीनुसार, 2024-25 मध्ये सर्व राज्यांनी मिळून सुमारे 3,02,058 कोटी रुपयांचा महसूल गोळा केला होता. तर 2025-26 च्या पहिल्या सहामाहीत (H1) हा आकडा सुमारे 1,46,892 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

कोणत्या राज्याला सर्वाधिक महसूल मिळतो?

देशातील महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक आणि गुजरात ही मोठी राज्ये महसूल मिळवण्याच्या बाबतीत आघाडीवर आहेत. 2024-25 मध्ये महाराष्ट्राने सुमारे 36,992 कोटी रुपये, उत्तर प्रदेशने 31,214 कोटी रुपये आणि तमिळनाडूने 24,861 कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता. तसेच 2025-26 च्या पहिल्या सहामाहीतही हीच राज्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या राज्यांमध्ये अग्रस्थानी आहेत. राज्य सरकारला मिळालेला हा पैसा वेगवेगळ्या विकास कामांसाठी वापरला जातो.

Follow Us
राजकारणात मोठे भूकंप होण्याची सुरूवात, पटोलेंच्या सूचक विधानाचा....
राजकारणात मोठे भूकंप होण्याची सुरूवात, पटोलेंच्या सूचक विधानाचा.....
सर्वच मर्यादा ओलांडल्या! खरातचा नवा प्रताप उघड, 13वा गुन्हा दाखल
सर्वच मर्यादा ओलांडल्या! खरातचा नवा प्रताप उघड, 13वा गुन्हा दाखल.
आजची निवडणूक दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी
आजची निवडणूक दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी.
महायुतीतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शरद पवारांचा फोटो, पोटनिवडणुकीतील
महायुतीतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात शरद पवारांचा फोटो, पोटनिवडणुकीतील.
मुंबईच्या मालाड दिंडोशीत राडा; आरोपींच्या अवैध घरांवर पालिकेने....
मुंबईच्या मालाड दिंडोशीत राडा; आरोपींच्या अवैध घरांवर पालिकेने.....
मोठा खुलासा! अजित दादांच्या अपघातानंतर भोंदू खरातच्या संस्थेतून...
मोठा खुलासा! अजित दादांच्या अपघातानंतर भोंदू खरातच्या संस्थेतून....
सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच मोठ्या घडामोडी?
सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच मोठ्या घडामोडी?.
सुनेत्रा पवारांसाठी ठाकरे गट काय भूमिका घेणार? संजय राऊत काय म्हणाले?
सुनेत्रा पवारांसाठी ठाकरे गट काय भूमिका घेणार? संजय राऊत काय म्हणाले?.
पोटनिवडणूक बिनविरोधच होणार छगन भुजबळ यांचा ठाम विश्वास
पोटनिवडणूक बिनविरोधच होणार छगन भुजबळ यांचा ठाम विश्वास.
बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार.