टॅक्स नियोजनातून संपत्ती वाढ कशी करता येईल?

अनेक लोकांसाठी करांसाठी बचत करणे हे त्यांच्याकडे असलेले गुंतवणूक किंवा बचतीचे एकमेव माध्यम आहे. विशेषतः अशा परिस्थितीत या प्रक्रियेचा सर्वाधिक फायदा उचलणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

टॅक्स नियोजनातून संपत्ती वाढ कशी करता येईल?

मुंबई : अनेक नोकरदारांना कर नियोजन प्रक्रिया अत्यंत त्रासदायक गोष्ट वाटते यात काहीही शंका नाही. दरवर्षी ही डोकेदुखी उपलब्ध पर्यायांबाबत माहिती नसणे, प्रक्रियांबाबत गोंधळ आणि करनियोजनाबाबत शेवटच्या क्षणाचा अस्ताव्यस्त प्रयत्न यांच्यामुळे उद्भवते.

कर नियोजन करताना सामान्यत: लोक कोणता विचार करतात?

  • नोकरदार हे कर नियोजनाबाबत तात्पुरते नियोजन करतात. जिथे गुंतवणुका आर्थिक वर्षाच्या मुख्यत्वे शेवटच्या वर्षात म्हणजे जानेवारी ते मार्चदरम्यान केल्या जातात.
  • अनेक लोकांचे आपल्या करांचे नियोजन करण्याचे मुख्य उद्दिष्ट हे करात बचत करणे आणि आपल्या कंपनीला जास्तीची कर वजावट करण्यापासून रोखण्याची असते. त्यामुळे आपल्या सध्याच्या परिस्थितीला जबाबदार ठरवून लोक फक्त त्यांच्या लगेचच्या उद्दिष्टावर भर देतात आणि भविष्याच्या नियोजनासाठी काहीही विचार करत नाहीत.
  • एक घाईघाईचा दृष्टीकोण अंगीकारून लोक जीवनविमा योजना किंवा पीपीएफसारख्या करबचत पर्यायांकडे जाण्याचा प्रयत्न करतात. ईपीएफ आणि इतर निवृत्ती फायदे नक्कीच एक आरामदायी निवृत्त जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरतात. परंतु ते उत्पन्नाचे पुरेसे साधन ठरतीलच असे नाही.

कराचे परिणामकारक नियोजन करण्याची अधिक चांगली पद्धत कोणती?

अनेक लोकांसाठी करांसाठी बचत करणे हे त्यांच्याकडे असलेले गुंतवणूक किंवा बचतीचे एकमेव माध्यम आहे. विशेषतः अशा परिस्थितीत या प्रक्रियेचा सर्वाधिक फायदा उचलणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

एकट्या कर नियोजनाचा विचार करणे ही योग्य कल्पना नाही. सर्वोत्तम शक्य परिणामांसाठी कर नियोजनाकडे आर्थिक नियोजनाच्या व्यापक दृष्टीकोणातून पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण सर्वजण आपल्या कामाच्या ठिकाणी एचआर विभाग जानेवारीमध्ये टॅक्स रिटर्न भरण्यासाठी दबाव आणत असल्याचे पाहत आलो आहोत. या काळात या धावपळीमध्ये सहभागी होण्यापेक्षा वर्षाच्या सुरुवातीलाच नियोजन प्रक्रिया सुरू करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

कर नियोजन हे मनात दुहेरी उद्दिष्ट ठेवून केले गेले पाहिजे. वर्तमानकाळात करबचत करण्याबरोबरच भविष्यासाठी करबचतीला एक संपत्तीनिर्मितीचे साधन म्हणून पाहावे. मनात दीर्घकालीन ध्येये समोर ठेवून वर्तमानकाळात नियोजन कऱणे हे चांगल्या आर्थिक नियोजनाचे मूलतत्व आहे.

निवृत्तीचे उदाहरण घेऊया. आर्थिकदृष्टया सुरक्षित आणि आरामदायी निवृत्ती हे अनेक लोकांसाठी दीर्घकालीन उद्दिष्ट आहे आणि त्याला करबचतीशी जोडले गेले पाहिजे. कसे ते समजून घेण्यासाठी अर्जुनचे (35 वर्षे) उदाहरण घेऊया. त्याला वयाच्या 60 वर्षी निवृत्त व्हायचे आहे आणि त्याने असे ठरवले आहे की, एक चांगले निवृत्त जीवन जगण्यासाठी त्याला मासिक 50,00 रूपयांची (आजच्या काळात) गरज आहे. भाववाढीमुळे अर्जुनला वयाच्या 85 व्या वर्षापर्यंत एक आरामदायी आयुष्य जगण्यासाठी 5.63 कोटी रूपयांची गरज भासेल.

हीच गोष्ट लक्षात घेऊन तो करबचतीसाठी वार्षिक 60,000 रूपयांची गुंतवणूक करतो. त्याच्या करबचतीच्या गुंतवणुकींद्वारे त्याला 1.03 कोटी रूपये (गरजेच्या 18 टक्के) रक्कम मिळवणे शक्य होईल.

गुंतवणुकीचा प्रकार धोका करपूर्व परतावा

वार्षिक

करोत्तर परतावा

वार्षिक

लॉक इन कालावधी (वर्षे) वार्षिक गुंतवणूक रक्कम (रूपये) करयोग्यता गोळा केलेली रक्कम (रूपये)
मुदत ठेवी बाजार धोका नाही 7.50% 5.25% 5 60,000 करयोग्य 31 लाख
पीपीएफ बाजार धोका नाही 7.60% 7.60% 15 60,000 करमुक्त 44 लाख
युलिप्स* बाजार धोका 10.00% 10.00% 5 60,000 करमुक्त 65 लाख
ईएलएसएस बाजार धोका 14.00% 12.90% 3 60,000 करयोग्य 1.03 कोटी

युलिप पॉलिसीमधून करपूर्व मिळणारा सरासरी परतावा वार्षिक 14 टक्के आहे आणि आयआरडीए मार्गदर्शक तत्वांनुसार कमाल 4 टक्के खर्च आहे. त्यामुळे आम्ही वार्षिक 10 टक्के परतावा विचारात घेतला आहे.

बाजार धोका गुंतवणूक मूल्यात चढ-उतार होते.

पीपीएफ, ईपीएफ, जीवनविमा योजना इत्यादी करबचतीची परिणामकारक माध्यमे असताना ते संपत्ती निर्मितीचे साधन नाही. दीर्घकालीन उद्दिष्टासाठी संपत्ती निर्माण करण्यासाठी अधिक फायदेशीर योजना म्हणजे इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम्स (ईएलएसएस) आहे.

नियोजन प्रक्रियेत वर्तमानकाळात भविष्यातील गरजांबाबत निर्णय घेण्याचा समावेश आहे. लोक असे गृहित धरतात की, ही प्रक्रिया गुंतागुंतीची असेल. परंतु खरेतर त्यांना या विषयावर जास्तीत जास्त ज्ञान मिळवणे, योग्य निर्णय घेणे आणि अंदाज बांधणे टाळणे या गोष्टी करणे गरजेचे आहे. ही पावले उचलण्यात आल्यास करबचत करणे आणि त्याचवेळी दीर्घकाळात संपत्ती निर्माण करणे शक्य आहे.

लेखक : अमर पंडित, CFA, संस्थापकHappynessFactory.in

(कोणतीही गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *