तुमचे PPF अकाऊंट बंद झालंय का? पुन्हा सुरु करण्यासाठी जाणून घ्या टिप्स

सध्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यावर 7.10 टक्के व्याजदर देत आहे. दरवर्षी 31 मार्चला व्याजदर निश्चित केला जातो. (How to Activate Inactive PPF account)

तुमचे PPF अकाऊंट बंद झालंय का? पुन्हा सुरु करण्यासाठी जाणून घ्या टिप्स
PPF
Follow us
| Updated on: Jun 11, 2021 | 11:22 AM

नवी दिल्ली : पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) हा एक दीर्घकालीन गुंतवणूकीचा पर्याय आहे. सध्या प्रत्येक नोकरदार आपल्या भविष्यातील तरतुदीसाठी PPF गुंतवणूकीचा विचार करत असतो. ही योजना सर्वात लोकप्रिय आणि विश्वासार्ह मानली जाते. पीपीएफची मॅच्युरिटी 15 वर्षे आहे. PPF ही योजना केंद्र सरकारची असल्याने ती योग्य हमी परतावा देते. यातून कोणत्याही जोखमेशिवाय निश्चित असा परतावा मिळत असल्याने लोकांमधून याला प्राधान्यक्रम दिला जातो.  (How to Activate Inactive PPF account)

PPF खाते बंद का होते?  

जर तुम्ही पीपीएफमध्येही गुंतवणूक केली असेल तर तुम्ही थोडी खबरदारी घेणं गरजेचे आहे. अन्यथा तुमचे पीपीएफ खातेही बंद होऊ शकेल. पीपीएफ खात्यात दर वर्षाला किमान 500 रुपये गुंतवणूक करणे अनिवार्य आहे. प्रत्येक आर्थिक वर्षात या खात्यात गुंतवणूक करण्याची कमाल मर्यादा 1.5 लाख रुपये आहे. जर एखाद्या व्यक्तीने आर्थिक वर्षात किमान 500 रुपये भरले नाही, तर त्याचे अकाऊंट निष्क्रीय होते. त्यानंतर या पीपीएफ अकाऊंटवर कर्ज घेण्याची सुविधा मिळत नाही. तसेच हे अकाऊंट मॅच्युरिटी डेटपूर्वी बंदही करता येत नाही.

Inactive PPF अकाऊंट कसं सुरु कराल?

सरकार प्रत्येक तिमाहीच्या सुरूवातीला पीपीएफवरील व्याज दर निश्चित करते. सध्या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खात्यावर 7.10 टक्के व्याजदर देत आहे. दरवर्षी 31 मार्चला व्याजदर निश्चित केला जातो.

या अंतर्गत आर्थिक वर्षात किमान 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. पीपीएफ खात्यात दर वर्षाला किमान 500 रुपये गुंतवणूक करणे अनिवार्य आहे. जर एखाद्या व्यक्तीने आर्थिक वर्षात किमान 500 रुपये भरले नाही, तर त्याचे अकाऊंट बंद होते. पण जर तुमचे खाते बंद झाले तरी तुम्ही ते पुन्हा सुरु करु शकता.

 वार्षिक 50 रुपये दंडाची आकारणी

पीपीएफ खाते पुन्हा सुरू करण्यासाठी बँक किंवा टपाल कार्यालयात लेखी अर्ज द्यावा लागतो. त्यासाठी खातेधारकाला अकाऊंट पुन्हा सुरु करण्यासाठी बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये आणखी एक अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला किमान वार्षिक योगदान 500 रुपये आणि 50 रुपये दंड भरावा लागतो. हे खाते सुरु करण्यासाठी तुम्हाला 15 वर्षांच्या कालावधीत अर्ज करता येतो.

हा अर्ज केल्यानंतर तुमची बँक किंवा पोस्ट ऑफिस त्या अर्जाची तपासणी करेल. मात्र जर तुमचा 15 वर्षांचा कालावधी संपला असेल तर ते खाते पुन्हा चालू केले जाऊ शकत नाही.

जर आपण यात गुंतवणूक केल्यास कलम 80 सी अंतर्गत तुम्हाला लाभ मिळेल. परिपक्वतावरील व्याज उत्पन्न देखील पूर्णपणे करमुक्त असेल. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांना गुंतवणुकीचा अधिक आकर्षक पर्याय मिळेल. त्याचा परिपक्वता कालावधी 15 वर्षे आहे आणि त्यानंतर ती 5 वर्षांच्या कालावधीत तो वाढविला जाऊ शकतो. (How to Activate Inactive PPF account)

संबंधित बातम्या : 

Personal Loan घेताय, मग ‘या’ गोष्टींची घ्या काळजी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

PPF आणि NPS कशात सर्वाधिक फायदा? जाणून घ्या निवृत्तीनंतरची सर्वोत्तम योजना

Yes बँकेच्या FD च्या व्याजदरात बदल, गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या नवीन दर

Non Stop LIVE Update
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.