Home Loan : गृहकर्जावरील व्याज होईल वसूल, कमाई होईल जादा, पण स्वतःशीच करावा लागेल हा वादा..

Home Loan : गृहकर्ज आणि त्याचे व्याज फेडता फेडता नाके नऊ येऊ देऊ नका..अशी तजवीज करा..

Home Loan : गृहकर्जावरील व्याज होईल वसूल, कमाई होईल जादा, पण स्वतःशीच करावा लागेल हा वादा..
गृहकर्ज असे मिळवा परतImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 30, 2022 | 7:54 PM

नवी दिल्ली : सणासुदीत (Festival Season) तुम्हाला घर खरेदी (Home) करताना अनेक चांगल्या ऑफर्स मिळतील. मालमत्तेसंदर्भात बिल्डर, फर्म तुम्हाला चांगली ऑफर तर देतीलच पण बँकाही (Bank) त्यांच्यावतीने सवलतींचा पाऊस पाडतात. तेव्हा घर घेण्याचा उत्साह द्विगुणित होतो. पण  गृहकर्जाची (Loan) रक्कम आणि त्यावरील व्याज (Interest) पाहता, हिरमुसले होऊ नका. हा खर्च वसूल करण्याचा एक चांगला पर्याय आहे.

गृहकर्जावर बँका सध्या सरासरी 8 टक्के व्याजदर आकारत आहेत. जर तुम्ही या व्याजदराने पुढील 20 वर्षांकरीता कर्ज घेत असाल तर मूळ रक्कमे इतकेच व्याज द्यावे लागते. म्हणजे घरासाठी तुम्हाला दुप्पट रक्कम अदा करावी लागते.

याच कारणामुळे अनेक जण घर वा मालमत्ता खरेदीसाठी गृहकर्ज घेण्यास कचरतात. पण तरुणांमध्ये बदल होत आहे. ते आर्थिक व्यवहार करताना सजग आहेत. व्याजाची रक्कम दुसऱ्या पर्यांयानी वसूल करण्याची ट्रिक ते शोधतात.

हे सुद्धा वाचा

अर्थात त्यासाठी म्युच्युअल फंडात केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. घर खरेदीवेळीच काही जण योग्य म्युच्युअल फंड निवडतात आणि त्यात SIP द्वारे गुंतवणूक करतात. त्यामुळे एकाचवेळी खर्च आणि गुंतवणुकीचा कुठलाही ताण येत नाही.

समजा तुम्ही 50 लाख रुपयांचे गृहकर्ज घेतले आहे आणि 20 वर्षांसाठी त्यावर व्याजदर लक्षात घेता, तुम्हाला बँकेला 1 कोटी रुपये चुकवावे लागतील. हा खर्च काढण्यासाठी तुम्हाला एसआयपीत गुंतवणूक करावी लागेल.

50 लाख रुपयांवर 8 टक्के वार्षिक व्याज दराने तुम्ही कर्ज घेतले आहे. तुमचा मासिक हप्ता 41822 रुपये होईल. 20 वर्षांसाठी तुम्ही एकूण 50.37 लाख रुपये व्याज चुकते केले. घराची किंमत 50 लाख रुपये आणि त्यावर व्याजाची रक्कम 50.37 लाख रुपये आहे.

घरासाठी तुम्हाला एकूण 1 कोटी 37 हजार रुपये खर्च द्यावा लागणार आहे. आता म्युच्युअल फंडात जर तुम्ही मासिक हप्त्याच्या 25% टक्के गुंतवणूक कराल. म्हणजे 10912 रुपयांची एसआयपी सुरु कराल.तर फायदा होईल.

10912 रुपयांच्या एसआयपीवर तुम्हाला वार्षिक केवळ 12 टक्के परतावा गृहित धरुयात. यापेक्षा अधिकच परतावा मिळेल. पण 12 टक्के परतावा गृहित धरला तर, 20 वर्षानंतर तुमच्याकडे 1.1 कोटी रुपये असतील.

आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.