AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवसाला 30 रुपयांची बचत करा आणि करोडपती व्हा

जगात गुंतवणूक गुरु अशी ख्याती असलेल्या वॉरेन बफे यांना अवघ्या 11व्या वर्षी भांडवली बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतरचा वॉरेन बफे यांचा प्रवास सगळ्या जगाला माहिती आहे. | How to become crorepati

दिवसाला 30 रुपयांची बचत करा आणि करोडपती व्हा
| Updated on: Jan 02, 2021 | 9:31 AM
Share

मुंबई: आपल्यापैकी प्रत्येकालाच आपल्याकडे खूप पैसे असावेत, आपण करोडपती व्हावे, असे वाटत असते. मात्र, मोजकेच लोक हे स्वप्न पूर्ण करु शकतात. तरीही अनेकजण आयुष्यात या स्वप्नाचा पाठलाग करत असतात. योग्यवेळी योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास हे स्वप्न काही प्रमाणात पूर्ण होण्याचीही शक्यता आहे. (How to become crorepati by the retirement age)

जगात गुंतवणूक गुरु अशी ख्याती असलेल्या वॉरेन बफे यांना अवघ्या 11व्या वर्षी भांडवली बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतरचा वॉरेन बफे यांचा प्रवास सगळ्या जगाला माहिती आहे. मात्र, तुम्हीदेखील रोज 30 रुपयांची बचत करून करोडपती बनू शकता.

रोज 30 रुपये वाचवून कसे व्हाल करोडपती?

अर्थतज्ज्ञांच्या मते तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षापासून रोज 30 रुपयांची बचत केली तर तुम्ही 60 वर्षांचे होईपर्यंत करोडपती व्हाल. एका दिवसाचे 30 रुपये या हिशेबाने महिन्याचे 900 रूपये होतात. हे पैसे SIP मध्ये (Systematic Investment Plan) गुंतवायचे. त्यामुळे 40 वर्षात प्रत्येक महिन्याला अवघ्या 900 रुपयांची गुंतवणूक करुन तुम्हाला करोडपती होता येईल.

समजा तुम्ही 20 व्या वर्षी SIP मध्ये गुंतवणूक सुरु केली तर तुम्हाला साधारण 12.5 टक्क्यांचा परतावा मिळेल. या हिशेबाने तुम्ही 60 व्या वर्षापर्यंत कोट्यधीश व्हाल.

तुमचे वय 20 पेक्षा जास्त असेल तर काय कराल?

तुमचे वय 20 पेक्षा जास्त असेल तरी तुम्ही करोडपती होऊ शकता. समजा तुम्ही 30 वर्षाचे असाल तर एक कोटीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी तुम्हाला रोज 30 रुपयांऐवजी 95 रुपयांची बचत करावी लागेल.

तुम्ही 35 वर्षांचे असाल तर तुम्हाला डिव्हिडंट रिइन्वेस्टमेंट प्लानमध्ये (DRIP) गुंतवणूक करुन 15 टक्क्यांच्या परतव्यासह 60 व्या वर्षी करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करु शकता.

30व्या वर्षी गुंतवणूक करुन 2 कोटी कमवायेच असतील तर काय कराल?

तुम्ही 30 वर्षांचे आहात आणि निवृत्त होईपर्यंत तुम्हाला 2 कोटी रुपये कमवायचे असतील तर तुम्हाला प्रत्येक महिन्याला 8 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तुमच्या गुंतवणुकीवर अगदी 10 टक्के परतावा मिळत राहिला तरी तुम्ही तुम्ही 60व्या वर्षापर्यंत करोडपती होऊ शकता.

संबंधित बातम्या:

म्यूच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; चार नियम बदलले

नव्या वर्षात Amul ची फ्रँचायझी घ्या, बिझनेस सुरु करा, 2 लाखांच्या गुंतवणुकीवर 10 लाखापर्यंत कमवा

(How to become crorepati by the retirement age)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.