Fixed Deposit मध्ये गुंतवणूक करायची? मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

बाजारात एफडी योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी आपण काही घटकांचा विचार करणे गरजेचे असते. (best fixed deposit plan with high interest rate)

Fixed Deposit मध्ये गुंतवणूक करायची? मग 'या' गोष्टी लक्षात ठेवा
अल्प कालावधीसाठीही ग्राहकांना एफडीमध्ये गुंतवणूक करता येते. विशेष म्हणजे मॅच्युरिटीनंतर तुम्हाला गुंतवलेल्या रक्कमेसह योग्य परतावाही मिळतो. सध्या अशा अनेक बँका आहेत, ज्या तुम्हाला सहा महिन्यांच्या एफडीवर चांगला व्याज देतात.

मुंबई : बँक फिक्स्ड डिपॉझिट (Fixed Deposit) भारतातील सर्वाधिक पसंतीची आणि लोकप्रिय ठेव योजना आहे. यात बँक 1 ते 10 वर्षांच्या कालावधीत 5.50 टक्के ते 6.50 टक्क्यांपर्यंतचे व्याज दर देतात. एफडी (FD) वर मिळणारा व्याज दर या ठेव योजनेची लोकप्रियता ही सुरक्षित स्वरुपाची असते. यामध्ये गुंतवणुकीवर निश्चित वेळेत व्याज मिळतो. तसेच गुंतवणूकदारांचे पैसे वाढतच जातात. (best fixed deposit plan with high interest rate)

एफडीची गुंतवणूक किमान 7 दिवस ते 10 वर्षांपर्यंत केली जाते. बँकेच्या एफडीची काही मर्यादा असते. तसेच यात मुदतीपूर्वी पैसे काढण्याची परवानगी नसते. मात्र यासाठी दंड भरावा लागतो. अतिरिक्त निधी साधारणपणे कमी व्याज दराने निधीची पुन्हा गुंतवणूक केली जाते. म्हणूनच, बाजारात एफडी योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी आपण काही घटकांचा विचार करणे गरजेचे असते.

🛑FD करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा🛑

💠बँकेची विश्वासार्हता – एखादी निश्चित ठेव करण्यापूर्वी बँकेची विश्वासार्हता तपासा. DICGC  च्या डिपॉझिटरी विमा कार्यक्रमांतर्गत एफडी ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. याअंतर्गत 5 लाख रुपयांचा विमा उतरविला जातो. मात्र गुंतवणूक करण्यापूर्वी कोणत्याही बँकेचे क्रेडिट रेटिंग तपासा. तज्ज्ञांचे माहितीनुसार, एफडीमध्ये सर्व पैसे गुंतवण्याऐवजी गुंतवणूकदारांनी वेगवेगळ्या बँकांमध्ये गुंतवणूक करावी.

💠व्याज – बँकेचा व्याज हा कालावधीच्या आधारावर आधारित असतो. बँकाचा व्याज दर हा बँक ते बँकवर अवलंबून असतात. हे ठेवीदाराच्या कालावधीवर आधारेदेखील अवलंबून असते. तुम्हाला मोठ्या प्रमाणात किंवा एकरकमी ठेवींवर जास्त व्याज मिळते. ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारे व्याज दर हा बहुतेक बँकांकडून दिल्या जाणाऱ्या नियमित दरापेक्षा 0.5 टक्क्यांनी जास्त असते. गुंतवणूकीचा संपूर्ण कालावधीसाठी एफडीचा व्याज दर समान आहे.

💠मुदतीपूर्वी पैसे काढणे : एफडीमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी मुदतीपूर्वी पैसे काढण्याबद्दलची माहिती घ्या. तसेच मुदतीपूर्वी पैसे काढण्यापूर्वी तुम्हाला दंड भरावा लागतो. बँकांनी लागू केलले्या व्याजदराच्या दंड 0.5 टक्क्यांवरून 1 टक्के करण्यात आली आहे. तर काही बँका या दंड न आकारता गुंतवणूकदारांना अकाली वेळेस एफडी तोडण्याची परवानगी देतात. तर अतिरिक्त निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, फिक्सड डिपॉझिटसाठी बँक निवडताना जर तुम्ही मुदतीपूर्वी पैसे काढलात तर त्यात तुम्हाला कमी दंड भरावा लागेल, अशा बँकाचा शोध घ्या.

💠कर्ज- फिक्स्ड डिपॉडिटद्वारे काही गुंतवणूकदारांना कर्जाची सुविधा दिली जाते. त्यामुळे याचा फायदा कर्ज घेतेवेळी मिळतो. एखाद्या आर्थिक परिस्थितीत एखादी व्यक्ती त्याच्या ठेवीच्या 90 टक्के पर्यंत एफडीवर कर्ज घेऊ शकते. कर्जाची मुदत एफडी योजनेच्या जास्तीत जास्त कालावधीपर्यंत असू शकते. कारण जास्तीत जास्त कालावधीचा एफडी जास्तीत जास्त कालावधीपुरता मर्यादित असेल.

(best fixed deposit plan with high interest rate)

संबंधित बातम्या : 

पॅनकार्ड मोफत मिळतेय अवघ्या 10 मिनिटांमध्ये, इन्कम टॅक्स विभागाच्या सेवेबद्दल जाणून घ्या

PMSBY Scheme : 31 मेपूर्वी बँक तुमच्या खात्यातून 12 रुपये कापणार, ग्राहकांना 2 लाखांचा फायदा

‘गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यास 6 लाखांचा मोफत विमा, इतर खर्चासाठी 4 लाख’, तुम्हाला ‘हे’ माहितीय?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI