AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रेडिट कार्डातील पैसे वापरण्याची लिमिट कशी वाढवाल? जाणून घ्या सर्व काही

तसेच क्रेडीट कार्डच्या मर्यादेचा नेमका अर्थ काय? हा निर्णय कोणत्या आधारे घेतला जातो? याचीही माहिती सांगणार आहे. (Credit Card Limit Increase)

क्रेडिट कार्डातील पैसे वापरण्याची लिमिट कशी वाढवाल? जाणून घ्या सर्व काही
credit card
| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 2:51 PM
Share

मुंबई : नोकरी करणाऱ्या अनेकांकडे हमखास क्रेडीट कार्ड पाहायला मिळतात. मात्र बरेच जण त्यांच्या क्रेडीट कार्डच्या लिमिटवर नाखूष असतात. आपल्या क्रेडीट कार्डची मर्यादा जास्त असावी, असे अनेकांवा वाटत असते. या मर्यादेद्वारे संबंधित व्यक्तीला विविध सेवांसाठी पैसे उधार घेता येतात. याव्यतिरिक्त क्रेडिट कार्ड रिवार्ड, कॅशबेक, व्याजमुक्त वेळेवर लोन मिळते असे अनेक फायदे आहेत. (How to Increase My Credit Card Limit)

क्रेडिट कार्डावर मर्यादा असणे याचा अर्थ म्हणजे तुम्ही बँकेकडून निश्चित करण्यात आलेली ठराविक रक्कम खर्च करता येते. ही रक्कम तुम्ही क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खर्च करू शकता. जर तुमच्याही क्रेडीट कार्य कमी असेल तर ती कशी वाढवता येऊ शकते, याची आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. तसेच क्रेडीट कार्डच्या मर्यादेचा नेमका अर्थ काय? हा निर्णय कोणत्या आधारे घेतला जातो? याचीही माहिती सांगणार आहे.

क्रेडिट कार्ड म्हणजे काय?

क्रेडिट कार्ड म्हणजे एखाद्या ठराविक बँक किंवा वित्तीय संस्था जारी करण्यात आलेले प्लास्टिक किंवा मेटलचे कार्ड. या कार्डद्वारे तुम्हाला Pre-Approve लिमिटमधून काही ठराविक रक्कम उधार घेण्याची सुविधा दिली जाते. त्यानंतर तुमच्या सोयीनुसार तुम्हाला ती बँकेला परत करावी लागते.

क्रेडीट कार्डची मर्यादा कशी निश्चित होते?

क्रेडीट कार्डचे लिमिट ही आपल्या बँकेवर आधारित असते. तसेच तुमच्या व्यवहाराच्या इतिहासाच्या आधारावर कार्डचे लिमिट अवलंबून आहे. बँकने जारी केलेल्या वेगळे-वेगळे कार्डवर लिमिट वेगळ्या असतात. यासाठी कोणतेही निश्चित मानक ठरवण्यात आलेले नाही. प्रत्येक बँक ही बर्‍याच गोष्टी लक्षात ठेवून क्रेडिट कार्डची मर्यादा ठरवते. कोणतीही बँक ही क्रेडीट कार्डची मर्यादा निश्चित करताना खर्च, मासिक कमाई आणि आर्थिक जबाबदाऱ्यांची माहिती गोळा करते. यासाठी बँक स्टेटमेंट, पगाराची स्लिप, टॅक्सची कागदपत्रे आणि क्रेडीट अहवाल तपासला जातो. या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर बँकेचा अधिकारी दर महिन्याची मिळकत ही 2 किंवा 3 ने गुणाकार करतो.

या प्रक्रियेमध्ये, बँक निश्चित खर्च वजा करते. त्यानंतर बँक आपल्या कर्जाची उत्पन्नाच्या प्रमाणाचा आलेख काढते. यांसह इतर काही गोष्टींचा अभ्यास केल्यानतंर तुमच्या क्रेडीट कार्डची मर्यादा निश्चित केली जाते.

क्रेडीट कार्डची मर्यादा कशी वाढवाल?

इतर लोकांप्रमाणे जर तुम्हीही तुमच्या क्रेडीट कार्डच्या मर्यादेवर खूश नसाल तर आपण ते वाढवू शकता. पण यासाठी तुम्हाला थोडी प्रतिक्षा करावी लागेल. तुमच्या बँकेच्या अकाऊंटचा अभ्यास केल्यानतंर ही मर्यादा वाढवली जाते. जर तुम्ही नियमितपणे तुमचे क्रेडीट कार्ड वापरत असाल आणि त्याचे बिल वेळेवर भरत असाल, तर काही बँक आपोआपच तुमच्या कार्डची क्रेडिट मर्यादा वाढवते.

या व्यतिरिक्त जो ग्राहक क्रेडीट कार्डचे बिल वेळेवर भरतो त्याचा क्रेडीट स्कोर चांगला असतो. त्यामुळे बँक त्याच्या कार्डची मर्यादा वाढवते. अनेकदा बँक आपल्याला मर्यादा वाढवण्याची ऑफर देते. पण तुम्ही स्वत: त्यासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्ही नेटबँकिंगद्वारे किंवा बँक शाखेत भेट देऊन याबाबतची प्रक्रिया करु शकता. यानंतर, जर बँकेला योग्य वाटत असेल, तर बँक स्वत:हून क्रेडीट कार्डची मर्यादा वाढवते. (How to Increase My Credit Card Limit)

संबंधित बातम्या : 

Business Idea | केवळ 15 हजारात बिझनेस सुरु करा, वर्षभरात लाखो कमवा, सरकारकडून 90 टक्के कर्ज

Petrol Diesel Price | इंधन दरवाढीचा भडका, महाराष्ट्रात पेट्रोल शंभरी पार, नवे दर काय?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.