नोकरी बदलल्यावर असा करा PF Transfer, इतकी सोपी आहे प्रक्रिया
PF Transfer : तुम्ही दुसऱ्या कंपनीत स्वीच झाला असाल. नोकरी बदलली असेल तर पीएफ खाते नवीन कंपनीत हस्तांतरीत करावे लागेल. त्यासाठीची प्रक्रिया सोपी आहे. तुमच्याकडे UAN क्रमांकाची आवश्यकता आहे.

How to Transfer PF Account : खासगी सेवा क्षेत्रातील नोकरदार अनेकदा नोकरी बदलतात. तेव्हा त्यांना त्यांचे पीएफ खाते नवीन कंपनीत हस्तांतरीत करावे लागते. काही कंपन्या तुमच्याकडून UAN क्रमांक घेऊन थेट खाते हस्तांतरीत करतात. तर काही कंपन्या कर्मचाऱ्यांना PF खाते हस्तांतरीत करण्यास सांगतात. ही प्रक्रिया किचकट नाही. पण अनेकांना त्याची माहिती नसल्याने ते खाते हस्तांतरीत करू शकत नाहीत, कसं करावं खाते हस्तांतरीत जाणून घ्या.
PF खाते ट्रान्सफर करण्यासाठी काय करावे?
- UAN हा प्रत्येकाचा पीएफ खाते क्रमांक असतो. ती कर्मचाऱ्यांची पीएफ ओळख असते.
- आधार कार्ड, पॅन कार्ड वा बँक खात्याची माहिती तुमच्या UAN सोबत लिकं असावे
- जुन्या आणि नवीन कंपनीचा इस्टॅब्लिशमेंट क्रमांक आणि पीएफ खाते क्रमांक
- फॉर्म 13 ची गरज असेल. हा ट्रान्सफर क्लेम अर्ज आहे. तो भरावा लागेल.
PF ऑनलाईन ट्रान्सफरसाठी या अटी गरजेच्या
- तुमचे UAN सक्रिय हवे. त्याला सध्या सुरू असलेला मोबाईल क्रमांक लिंक हवा
- आधार, बँक डिटेल्स आणि जुनी नोकरी सोडण्याची तारीख UAN मध्ये अपडेट हवी
- तुमच्या कंपनीने ई-केवायसीला मंजूरी देणे गरजेचे आहे
- एका मेंबर आयडीवरून केवळ एक ट्रान्सफर रिक्वेस्टला मंजूरी
PF Account कसं हस्तांतरीत करणार?
- सर्वात आधी EPFO च्या अधिकृत साईटला भेट द्या
- तुमचा UAN आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा
- Online Services वर क्लिक करा.
- ‘वन मेंबर-वन EPF अकाऊंट (Transfer Request)’ निवडा
- आता व्हेरिफाय करा. जुन्या आणि नवीन कंपनीची माहिती द्या
- Get Details वर क्लिक करा. जुन्या पीएफ खात्याची माहिती द्या
- डिजिटल सिग्नेचर (DSC) निवडा, क्लेम फॉर्म व्हेरिफाई करा.
- मेंबर आयडी वा UAN क्रमांक टाकून प्रक्रिया पूर्ण करा
- Get OTP वर क्लिक करा. UAN शी जोडलेल्या मोबाईलवर OTP येईल. तो आता सबमिट करा
ऑटोमॅटिक पीएफ ट्रान्सफरची सुविधा
ऑटोमॅटिक पीएफ ट्रान्सफरची सुविधा पण लवकरच सुरू होणार आहे. त्यामुले कर्मचाऱ्यांना अनेक फायदे मिळतील. सर्वात मोठा फायदा म्हणजे सदस्यांचा वेळ आणि खर्च वाचेल. त्यांचा दिवस मोडणार तर नाहीच पण त्यांना पीएफची रक्कम मिळण्यासाठी 15 दिवस आणि महिनाभर वाट पहावी लागणार नाही. याशिवाय त्यांना कागदपत्रे आणि अर्ज फाटे करावे लागणार नाही.
