AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SBI मध्ये घर बसल्या 500 रुपयांनी स्वस्त खरेदी करा सोनं, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया

1 मार्चपासून सॉवरिन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond- SGB) पुन्हा एकदा वर्गणीसाठी खुला करण्यात आला आहे.

SBI मध्ये घर बसल्या 500 रुपयांनी स्वस्त खरेदी करा सोनं, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट स्कीम काय आहे: एसबीआय प्लॅटिनम डिपॉझिट स्कीम अंतर्गत लोकांना 75 दिवस, 75 आठवडे आणि 75 महिन्यांच्या एफडीसाठी 0.15 टक्क्यांपर्यंत अतिरिक्त व्याज दिले जाईल. या योजनेंतर्गत हा लाभ 2 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर उपलब्ध होईल.
| Edited By: | Updated on: Mar 01, 2021 | 11:50 AM
Share

मुंबई : जर तुम्हीही स्वस्त (Gold Price) सोनं खरेदी करण्याची योजना आखत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम चांगली संधी आहे. 1 मार्चपासून सॉवरिन गोल्ड बाँड (Sovereign Gold Bond- SGB) पुन्हा एकदा वर्गणीसाठी खुला करण्यात आला आहे. म्हणजेच तुम्ही आजपासून 1 मार्च ते 5 मार्च या कालावधीत या योजनेत गुंतवणूक करू शकता. सॉवरेन गोल्ड बाँड योजनेत बाँडची नवीन इश्यू किंमत प्रति ग्रॅम 4,662 रुपये (दहा ग्रॅम 46620 रुपये) निश्चित करण्यात आली आहे. देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ऑनलाईन SGB खरेदी करण्याची संधी देत ​​आहे. (how you can buy sovereign gold bond online from sbi here is details)

गुंतवणूकदार व्यावसायिक बँक, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), आरबीआय नियुक्त पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त एक्सचेंजकडून देखील सोन्याचे बॉन्ड खरेदी करू शकतात. या योजनेंतर्गत वैयक्तिक गुंतवणूकदार आर्थिक वर्षात किमान 1 ग्रॅम आणि जास्तीत जास्त 4 किलो सोन्याची खरेदी करू शकतात. ट्रस्ट आणि इतर अशा युनिट्स दरवर्षी 20 किलो सोन्याची खरेदी करू शकतात.

10 ग्रॅम सोन्यावर 500 रुपयांची सूट

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आणि डिजिटल माध्यमातून पैसे भरण्यासाठी गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट मिळेल. अशा परिस्थितीत जर तुम्ही ऑनलाईन सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला प्रति 10 ग्रॅम 500 रुपयांची सूट मिळेल.

SBI कडून SGB मध्ये करा गुंतवणूक

– तुम्ही SBI नेट बँकिंग अकाऊंटमध्ये लॉग इन करा.

– eServices वर क्लिक करा आणि Sovereign Gold Bond वर जा.

– ‘नियम आणि शर्तें’ निवडा आणि ‘proceed’ वर क्लिक करा.

– रजिस्ट्रेशन फॉर्म भरा. यानंतर वन-टाईम रजिस्ट्रेशन करा.

– सबमिटवर क्लिक करा.

– खरेदी फॉर्ममध्ये सोन्याची रक्कम आणि नाममात्र तपशील प्रविष्ट करा.

– यानंतर सबमिटवर क्लिक करा. (how you can buy sovereign gold bond online from sbi here is details)

संबंधित बातम्या – 

SBI ची धमाकेदार ऑफर, free मध्ये मिळणार सगळ्यात महत्त्वाच्या सुविधा

LPG Gas latest price : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री, घरगुती गॅसच्या किंमती वाढल्या; वाचा ताजे दर

सरकार वाटणार 1 कोटी मोफत LPG Connection, लवकरच सिलेंडरही होणार स्वस्त

Petrol Diesel Rate Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी काय आहेत इंधनाचे दर, वाचा तुमच्या शहरातील ताजे भाव

(how you can buy sovereign gold bond online from sbi here is details)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.