AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासगीकरण झालेल्या ‘या’ बँकेत 100 रुपयात खातं उघडा, पाच लाख रुपयांपर्यंत मिळणार सुविधा

ही योजना नेमकी काय? याचा फायदा काय? चला जाणून घेऊया...(IDBI Bank SSP Plus scheme)

खासगीकरण झालेल्या 'या' बँकेत 100 रुपयात खातं उघडा, पाच लाख रुपयांपर्यंत मिळणार सुविधा
rupee
| Updated on: Apr 22, 2021 | 2:05 PM
Share

मुंबई : सरकारी बँकेतून खासगी बँकेत रुपांतर झालेल्या आयडीबीआय बँक (IDBI Bank) ग्राहकांना अनेक सुविधा पुरवते. आयडीबीआय बँक ग्राहकांना त्यांची कष्टाची कमाई मासिक हप्त्यांच्या माध्यमातून वाढवण्याची संधी देते आहे. यासाठी आयडीबीआय बँकेने एक विशेष एसएसपी प्लस (SSP+) योजना आणली आहे. या विशेष योजनेद्वारे ग्राहकांना नियमित बचतीचा लाभ मिळतो. त्यासोबतच पाच लाख रुपयांची खास सुविधादेखील मिळते. नुकतंच आयडीबीआय बँकेने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. ही योजना नेमकी काय? याचा फायदा काय? चला जाणून घेऊया…(IDBI Bank SSP Plus scheme)

IDBI ची सिस्टमॅटिक सेविंग्स प्लॅन (SSP) तुम्हाला तुमच्या सोयीनुसार बचतीची सुविधा देते. तुम्ही तुमच्या नियमित उत्पन्नासह दर महिना एक निश्चित रक्कम जमा करु शकता. तुम्ही निश्चित केलेली रक्कम दर महिना तुमच्या अकाऊंटमध्ये वजा केली जाते.

IDBI बँकेच्या सिस्टमॅटिक सेविंग्स प्लॅन (SSP) चे ठळक वैशिष्ट्ये

  • भविष्यातील गरजेसाठी पूर्व नियोजित बचत
  • एका निश्चित कालावधीसाठी रेग्यूलर सेविंग
  • ठेवीची सुविधा 1 वर्षापासून 10 वर्षांपर्यंत
  • 100 रुपयांपासून योजनेची सुरुवात

‘या’ सुविधा मिळणार

SSP प्लस प्रिंसिपल + इंट्रेस्ट प्रोटेक्शनसोबत कॉम्प्लिमेंट्री विमा संरक्षण आणि Reward Points सोबत नियमित बचत सुविधा करते.

  • वैयक्तिक अपघाताचा विमा – 5 लाख रुपयांपर्यंत
  • किमान हप्त्याची रक्कम – 100 रुपयांपासून 5 हजारपर्यंत
  • योजनेसाठी गुंतवणुकीचा किमान – 3 वर्षे ते 10 वर्ष
  • वैयक्तिक किंवा HUF हे खाते उघडू शकतात.

सिस्टमॅटिक सेविंग्स प्लॅन (SSP) अर्ज करणे अगदी सोपे आहे. यासाठी नेट बँकिंग/ Go Mobile + अॅपद्वारे आपण ऑनलाईन अर्ज करु शकता. आपण बँकेच्या जवळच्या शाखेत भेट देऊ शकता. (IDBI Bank SSP Plus scheme)

संबंधित बातम्या : 

कर्ज देताना तपासला जाणारा CIBIL स्कोअर काय असतो? Credit आणि CIBIL मध्ये फरक काय?

RBI आणखी एका बँकेचा परवाना रद्द करण्याच्या तयारीत, ग्राहकांचं काय होणार?

अमेरिकेचा मोठा झटका, भारताला ‘करन्सी मॅनिप्युलेटर्स’च्या यादीत टाकलं, नेमका काय परिणाम होणार?

कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.