AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्ज देताना तपासला जाणारा CIBIL स्कोअर काय असतो? Credit आणि CIBIL मध्ये फरक काय?

वित्तीय कंपनीला कर्ज देताना संबंधित व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) किंवा सिबिल रिपोर्ट (CIBIL Score) नक्की तपासते. (Difference between Credit Score and CIBIL Score)

कर्ज देताना तपासला जाणारा CIBIL स्कोअर काय असतो? Credit आणि CIBIL मध्ये फरक काय?
बँका देतात कुठल्याही गॅरंटीशिवाय कर्ज, जाणून घ्या प्री-अँप्रुव्हड कर्ज नेमके काय आहे?
| Updated on: Apr 22, 2021 | 12:46 PM
Share

मुंबई : घर, मालमत्ता किंवा कार खरेदी करताना बरेचजण बँकेतून कर्ज घेतात. कारण एकाच वेळी एवढी मोठी रक्कम देणे बऱ्याच जणांना अवघड असते. यासाठी अनेकजण बँकेतून होम लोन किंवा कार लोन घेतात. पण अनेक बँका किंवा वित्तीय कंपनीला कर्ज देताना संबंधित व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर (Credit Score) किंवा सिबिल रिपोर्ट (CIBIL Score) नक्की तपासते. याद्वारे कोणत्याही अर्जदाराची संपूर्ण आर्थिक स्थिती निश्चित केली जाते.

पण तुम्हाला क्रेडिट स्कोअर (Credit Score) किंवा सिबिल रिपोर्ट (CIBIL Score) याचा अर्थ माहिती का? कर्ज देतेवेळी बँका ते का बघतात, याची आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. (Difference between Credit Score and CIBIL Score)

क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल रिपोर्टमधील अंतर

क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल रिपोर्ट एक अशी टर्म आहे जी कर्ज घेतेवेळी महत्त्वाची मानली जाते. क्रेडीट स्कोअरचा उपयोग संबंधित व्यक्तीच्या आर्थिक स्थितीची माहिती घेण्यासाठी केला जातो. जर एखादी व्यक्ती आधी घेतलेल्या कर्जाचा हप्ता वेळच्या वेळी भरत असेल तर त्याचा क्रेडिट स्कोअर चांगला मानला जातो.

तर सिबिल रिपोर्ट (CIBIL Score) हा तीन अंकांचा असतो. यात क्रेडीट स्कोअरच्या आधारे पाईंट निश्चित केले जातात. हे पाईंट 300 ते 900 च्या दरम्यान असतात. जर तुमचा क्रेडिट स्कोअर 900 च्या आसपास असेल तर तुम्हाला सहज कर्ज मिळू शकते. तसेच 750 पेक्षा जास्त सिबिल स्कोअर हा चांगला मानला जातो. तर 300 च्या आसपासचा सिबिल स्कोअर हा वाईट मानला जातो. त्यामुळे तुमचा अर्ज बँकेकडून नाकारला जाऊ शकतो.

कसा चेक कराल क्रेडीट स्कोअर

क्रेडीट स्कोअर तपासण्यासाठी तुम्ही सिबिलची वेबसाईट किंवा अन्य बँकिंग सर्व्हिस अॅग्रीगेटर्सच्या वेबसाईटची मदत घेऊ शकता. त्यात दिलेल्या पर्यायांमध्ये तुमचा तपशील भरुन तुम्ही स्कोअर चेक करु शकता. तसेच तुम्हाला हवे असल्यास तुम्ही सिबिलच्या वेबसाईटची सदस्यता घेऊनही तुम्ही ते चेक करु शकता. तसेच हे तुम्ही विनामूल्यही तपासू शकता. मात्र विनामूल्य सिबिल रिपोर्ट हा वर्षातून एकदाच पाहता येतो.  (Difference between Credit Score and CIBIL Score)

संबंधित बातम्या : 

RBI आणखी एका बँकेचा परवाना रद्द करण्याच्या तयारीत, ग्राहकांचं काय होणार?

कोरोना काळात बँकेत जाणे टाळा, घरबसल्या करु शकता बँकेची सर्व काम

Gold Silver Price Today : आठवड्याभरात सोनं 1000 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरातही तेजी, झटपट वाचा ताजे दर

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.