AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराटच काय तुमचाही मुलगा ठोकू शकतो शतकावर शतक; फक्त ‘या’ गोष्टी करा

भारतात क्रिकेट हा खेळ सर्वात लोकप्रिय क्रीडा प्रकार आहे. परंतू इतर क्रीडा प्रकारातही नवनवीन नीरज चोप्रासारखे स्टार घडत आहेत. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात जर करियर करायचे असेल तर पालकांना आपल्या मुलांच्या भविष्यासाठी फायनान्सियल प्लानिंग करावे लागेल. त्यासाठी काय करावे लागेल ते पाहूयात...

विराटच काय तुमचाही मुलगा ठोकू शकतो शतकावर शतक; फक्त 'या' गोष्टी करा
VIRAT KOHLIImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Nov 15, 2023 | 9:57 PM
Share

मुंबई | 15 नोव्हेंबर 2023 : क्रिकेट स्टार विराट कोहली यंदाच्या क्रिकेट विश्वचषकात जबरदस्त परफॉर्मन्स दाखविला आहे. विक्रमामागून विक्रम तो करीत आहे. तसेच हजारो तरूणांना क्रिकेटकडे वळविण्यासाठी तो प्रेरणास्थान ठरला आहे. दुसरीकडे ऑलंम्पिकमध्ये नीरज चोप्रा मैदान गाजवित आहे. भारतीय खेळाडूंना अशा प्रकारे सुवर्ण कामगिरी करताना पाहून अनेक खेळाडू तसेच एथलिट बनण्यासाठी प्रेरणा मिळत आहे. जर तुमच्या मुलाचे करीयर क्रीडा क्षेत्रात करायचे असेल तर केवळ त्याच्या मेहनतीने काम होणार नाही तर तुम्हाला त्याचं फायनान्सियल प्लानिंग करावे लागेल, चला पाहूया कशी करायची प्लानिंग ?

क्रिकेटचा खेळ हा करियर म्हणून एक उत्तम पर्याय आहे, भारतात हा सर्वात यशस्वी क्रीडा प्रकार आहे. परंतू कॉमनवेल्थ, एशियन गेम्स, वर्ल्ड चैंपियनशिप्स आणि ओलंम्पिक गेम्समध्ये भारताला लागोपाठ पदके मिळत आहेत. त्यामुळे देशात आता क्रीडा क्षेत्रात करीयर करण्यासाठी पालक आपल्या मुलांना प्रेरित करीत आहेत. जर मुलांचे करियर क्रीडा क्षेत्रात करायचे असेल तर पालकांची जबाबदारी अधिक आहे.

लॉंग टर्म गोल्सवर ध्यान ठेवावे

स्पोर्ट्समध्ये करीयर करण्याचा मार्ग झटपट किंवा सोपा नाही. कॉलेजच्या डीग्री मिळविल्यानंतर जशी जॉब मिळण्याचा मार्ग मोकळा होतो तसे या क्षेत्रात होत नाही. या क्षेत्रात जर तुमच्या मुलाला स्पोर्ट्समन बनण्याचे ध्यैय ठरविले आहे. तर पालकांनी हे लक्षात घ्यावे की त्याचे शंभर टक्के लक्ष दोन्ही कडे राहू शकत नाही..त्याचा अभ्यास आणि खेळावर सारखा फोकस रहात नाही. आपल्याला लॉंग टर्मवर फोकस करावा लागेल. भलेही स्पोर्ट पर्सनचे करीयर खूप छोटे असले तरी ते त्यांना इतका पैसा मिळवून देते की संपूर्ण जीवन आरामात जाऊ शकते. त्यांना खेळाशिवाय स्पॉन्सर शिप, मेंटरशिप आदी मार्फत अन्य इन्कम सोर्सचा फायदा होतो.

फायनान्शियल प्लानिंग लॉंग टर्म हवी

मुलांचे करीयर क्रीडा क्षेत्रात करण्यासाठी मोठा फंड जमा करावा लागेल. जो पर्यंत तुमचा मुलं टुर्नामेंट जिंकत नाहीत. किंवा त्यांना मोठे प्राईज मनी मिळत नाही तोपर्यंत त्यांना आर्थिक आधाराची गरज असते. त्यासाठी तुम्हाला म्युच्युअल फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरेस. तुम्हाला तुमच्या मुलांच्या खेळाचे साहित्य, त्याचे आरोग्य, तंदुरुस्ती प्रशिक्षण यासाठी लक्ष ठेवावे लागेल. यासाठी मोठा पैसा खर्च करावा लागतो.

मेडिकल इंश्युरन्स कामाला येईल

तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी प्रिव्हेंटिव्ह हेल्थ विमा किंवा स्पेशली मुलांसाठी हेल्थ विमा घेऊ शकता. एक चांगला स्पोर्ट्स पर्सन बनण्यासाठी तुमच्या मुलाला रुटीन चेकअप आणि मेडिकल खर्चा करावा लागेल. यावेळी मेडिकल विमा तुमच्या मुलाच्या मेडीकलचा खर्च भागविण्यास मदत करु शकतो.

पालकांना पर्यायी करीयर निवडावे लागेल

आपल्या मुलांना स्पोर्ट पर्सन बनविण्यासाठी पालकांना देखील आई- वडीलांपैकी एकाला पर्यायी करीयर निवडावे लागेल. म्हणजे तुमच्या मुलांना वेळ देण्यासाठी त्यांना विविध दौऱ्यांना नेण्यासाठी तुम्हाला अशी नोकरी निवडावी लागेल ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मुलांनी नीट वेळ देता येईल.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.