AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका रात्रीत दोघांचं नशीब पालटलं, एकाच्या खात्यात थेट 900 कोटी, तर दुसऱ्याच्या 60 कोटींहून अधिक पैसे जमा

बिहारमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दोन विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये जमा झाल्याची घटना समोर आलीय. पाटण्यातील दोन शालेय विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये 960 कोटी रुपये आलेत.

एका रात्रीत दोघांचं नशीब पालटलं, एकाच्या खात्यात थेट 900 कोटी, तर दुसऱ्याच्या 60 कोटींहून अधिक पैसे जमा
Bank Interest Rate
| Edited By: | Updated on: Sep 16, 2021 | 1:19 PM
Share

पाटणा : बँकेच्या भोंगळ कारभाराचे प्रत्यंतर आपण वेळोवेळी घेत असतो. बँक अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. बिहारमध्येही असाच एक प्रकार उघडकीस आलाय. बिहारमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दोन विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये जमा झाल्याची घटना समोर आलीय. पाटण्यातील दोन शालेय विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये 960 कोटी रुपये आलेत.

आणखी एक नवीन प्रकार समोर

दोन बँक खात्यांमध्ये 900 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झालेली पाहिल्यानंतर बँक अधिकारीसुद्धा बुचकळ्यात पडलेत. खगरियामध्ये एका तरुणाच्या बँक खात्यात साडेपाच लाख रुपये जमा झाल्याचे प्रकरण अजून संपलेले नाही, तोपर्यंत आणखी एक नवीन प्रकार समोर आला. ज्या दोन शालेय विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा झाले. ती दोन्ही मुले आजमनगर पोलीस ठाण्याच्या बाघोरा पंचायतीमध्ये असलेल्या पस्टिया गावातील रहिवासी आहेत. दरम्यान, बिहारमधील शालेय विद्यार्थ्यांना युनिफॉर्मसाठी राज्य सरकारकडून पैसे दिले जातात. हे पैसे थेट मुलांच्या बँक खात्यात जमा होतात. गुरुचंद्र विश्वास आणि असित कुमार हे बँक खात्यातील युनिफॉर्मच्या पैशांची चौकशी करण्यासाठी सीएसपी सेंटरमध्ये गेले होते.

मोदींनी 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती

बँक अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे खात्यातील पैसे तपासण्यासाठी ग्राहक बँक किंवा सीएसपी सेंटर गाठत आहेत. बँका आणि सीएसपी सेंटरबाहेर लांबच लांब रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतायत. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. यावरून काही लोक मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. बँक खात्यात करोडो रुपये जमा झालेले ऐकून मुलांना धक्का बसला. विद्यार्थी असित कुमारच्या 1008151030208001 या बँक खात्यात 900 कोटींपेक्षा जास्त रक्कम जमा झाले. तर गुरुचंद्र विश्वास याच्या 1008151030208081 या बँक खात्यामध्ये 60 कोटींपेक्षा रक्कम जमा झाली. दोन्ही खाती उत्तर बिहार ग्रामीण बँक भेलागंज शाखेची आहेत.

संबंधित बातम्या

चांगली बातमी! 15 दिवसांनंतर तुम्हाला आठवड्यात फक्त 4 दिवस काम अन् 3 दिवस आराम, नेमका नियम काय?

पोस्ट ऑफिसमध्ये खाते असेल तर तुम्हाला 2 लाखांचा लाभ विनामूल्य मिळणार, जाणून घ्या फायदा

In one night, the fortunes of the two changed, with 900 crores directly in one account and more than 60 crores in the other.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.