ITR साठी अवघे 9 दिवस; टॅक्स स्लॅब ते नवीन अपडेट, जाणून घ्या एका क्लिकवर

सर्वसाधारणपणे ITR दाखल करण्याच्या 2 व्यवस्था उपलब्ध आहेत. पूर्वीची आणि नवी. अर्थसंकल्प 2020 मध्ये कलम 115BAC नुसार नवीन आयकर संरचना अंमलात आणली गेली. आर्थिक वर्ष 2020-21 पासून व्यक्तिगत आणि हिंदू अविभाजित परिवार (HUF) द्वारे निवड केली जाऊ शकते. दोन्ही संरचनेसाठी टॅक्स स्लॅब खालीलप्रमाणे असतील.

ITR साठी अवघे 9 दिवस; टॅक्स स्लॅब ते नवीन अपडेट, जाणून घ्या एका क्लिकवर
आयकर परतावा
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Dec 23, 2021 | 4:59 PM

नवी दिल्ली : प्राप्तिकर विवरण (Income Tax Return) दाखल करण्यासाठी अवघ्या आठ दिवसांचा अवधी शिल्लक आहे. कोविड प्रकोपामुळे (Covid Outbreak) आर्थिक वर्ष 2020-21 (मूल्यांकन वर्ष-2021-22) साठी ITR दाखल करण्याच्या मुदतीत दोन वेळेस वाढ करण्यात आली. करपात्र दात्यांना ITR दाखल करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर असणार आहे. बिनचूक आणि सुयोग्य विवरण पत्र दाखल करणे अत्यंत महत्वाचे ठरते. महत्वाच्या तारखा, टॅक्स संरचना, नवी आणि जुनी पद्धती याविषयी सविस्तर माहिती जाणून घ्या एका क्लिकवर-

‘या’ तारखा चुकाल तर मुकाल

• 31 डिसेंबर: सर्वसामान्य करदात्यासाठी अंतिम मुदत
• 15 फेब्रुवारी: उत्पन्नाचे लेखापरीक्षण करणाऱ्यांसाठी अंतिम मुदत
• 31 मार्च: विलंबाने किंवा संशोधित ITR दाखल करण्यासाठी अंतिम मुदत

ITR दाखल करण्याच्या 2 व्यवस्था

सर्वसाधारणपणे ITR दाखल करण्याच्या 2 व्यवस्था उपलब्ध आहेत. पूर्वीची आणि नवी. अर्थसंकल्प 2020 मध्ये कलम 115BAC नुसार नवीन आयकर संरचना अंमलात आणली गेली. आर्थिक वर्ष 2020-21 पासून व्यक्तिगत आणि हिंदू अविभाजित परिवार (HUF) द्वारे निवड केली जाऊ शकते. दोन्ही संरचनेसाठी टॅक्स स्लॅब खालीलप्रमाणे असतील-

1. पूर्वीची (जुनी) व्यवस्था (60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या पुरुष-महिलांसाठी)

करपात्र उत्पन्न (रुपयांत) कर दर

• 2,50,000 पर्यंत शून्य
• 2,50,001 ते 5,00,000 5%
• 5,00,001 ते 10,00,000 20%
• 10 लाखांहून अधिक 30%

नोंद: 60 ते 80 वर्षांपर्यंतच्या नागरिकांना 3 लाखांपर्यंत आणि 80 वर्षाहून अधिक वयाच्या नागरिकांना 5 लाखांपर्यंतचे उत्पन्न आयकर मुक्त आहे.

2. दुसरी (नवी) व्यवस्था (प्रत्येक वयोगटाच्या स्त्री-पुरुषांसाठी)

करपात्र उत्पन्न (रुपयांत) कराचे दर

• 2,50,000 पर्यंत करमुक्त
• 2,50,001 ते 5,00,000 5%
• 5,00,001 ते 7,50,000 10%
• 7,50,001 ते 10,00,000 15%
• 10,00,001 ते 12,50,000 20%
• 12,50,001 ते 15,00,000 25%
• 15 लाखांहून अधिक 30%

नोंद: निव्वळ वेतन किंवा अन्य स्त्रोतांमधून प्राप्त उत्पन्नातून बचत, विम्याचे हफ्ते आणि प्रमाणित कपात वजा केल्यानंतर शिल्लक रक्कम करपात्र उत्पन्नात गणली जाते. या उत्पन्नावर कर देय करावा लागतो.

जुनी व्यवस्था कुणाला लाभदायी

>> विमा योजना, आरोग्य विमा किंवा अन्य कर बचत योजनांत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्ती
>> मुलीचे आई तसेच वडील किंवा सुकन्या समृद्धी योजना, आयुर्विमा महामंडळाच्या कन्यदान योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्ती
>> घरासाठी कर्ज आणि त्यासाठी EMI देय करणाऱ्या व्यक्ती
>> 80-G अंतर्गत देणगी रक्कम

नवी व्यवस्था कुणासाठी हितकारक

– नवी नोकरी. पगार तुलनेने कमी आणि पैशांची गुंतवणूक नाही
– अन्यत्र गुंतवणूक न करणारे तसेच कोणत्याही प्रकारचे कर्ज नसणारे जुने कर्मचारी

नव्या व्यवस्थेच्या अटी

– 50 हजार रुपयांच्या प्रमाणित कपातीचा लाभ नाही. एलटीए सवलत देखील मिळणार नाही.
– 80C, 80CCC, 80D, 80DDB, 80E, 80EEA, 80EEB, 80G, 80GG अंतर्गत कर सवलतींचा लाभ मिळणार नाही.
– 80C अंतर्गत एलआयसी, एनएससी, होम लोन, यूलिप, मुलांची शिकवणी फी, पेन्शन फंड, पीपीएफ, म्यूचुअल फंड ईएलएसएस, बँकांतील मुदत ठेवी, सुकन्या समृद्धी योजनांमधील गुंतवणूक द्वारे कर कपातीचा लाभ घेतला जातो. तर 80 D अंतर्गत आरोग्य विम्यावर देखील कर कपात प्राप्त होते. मात्र, नव्या व्यवस्थेनुसार अशाप्रकारचा लाभ प्राप्त होणार नाही.

इतर बातम्या :

‘शक्ती कायदा’ विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर, महिला अत्याचाराला आळा बसणार? काय आहे शक्ती कायदा?

Grape growers| वाढलेल्या निर्यात खर्चाचा द्राक्ष बागायतदारांना तडाखा; केंद्रीय मंत्री तोमर, गडकरींना साकडे

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें