AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Income Tax Saving : टॅक्स वाचवायचा आहे? तर हा आहे मार्ग

Income Tax : दरवर्षी अनेकांच्या पगारातून इनकम टॅक्स कापला जातो. अनेकांना माहितच नसते की, एकूण उत्पन्नावर कर कसा वाचवू शकतो. अनेक सरकारी योजना आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही कर वाचवू शकता. सरकारने दिलेल्या नियमांमध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो.

Income Tax Saving : टॅक्स वाचवायचा आहे? तर हा आहे मार्ग
| Updated on: Jan 25, 2024 | 8:52 PM
Share

Tax saving Tips : नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यासाठी आता फक्त 2 महिने बाकी आहेत. त्यामुळे ज्यांना त्यांच्या एकूण उत्पन्नावर कर भरावा लागतो त्यांची खटोटोप सुरु होते. तुमच्या उत्पन्नावर जर तुम्हाला कर वाचवायचा असेल तर तुम्ही कोणत्या योजनांमध्ये गुंतवणूक करु शकता. या शिवाय आयकर कायदा, 1962 अंतर्गत, तुम्ही जीवन विमा योजनेच्या प्रीमियमवरील कर कसा वाचवू शकता जाणून घ्या.

लोकांचे उत्पन्न वाढले की कर देखील वाढतो. सरकार सामान्य लोकांना कर वाचवण्यासाठी काही मार्ग देखील देते. या अंतर्गत तुम्ही काही योजना आणि जीवन विम्यामध्ये गुंतवणूक करून कर वाचवू शकता. आयकर कायदा, 1962 अंतर्गत येणाऱ्या अशा काही योजनांबद्दल आम्हाला तुम्हाला सांगणार आहोत.

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी किंवा पीपीएफ

PPF योजनेतून तुम्हाला करात सूट मिळते. आयकर कलम 1962 च्या कलम 80C अंतर्गत, तुम्ही वार्षिक 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकता. या योजनेत ७.१ टक्के व्याज दिले जाते. 500 रुपयांत तुम्ही यामध्ये खाते उघडू शकता. तर जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये गुंतवू शकता. या योजनेची मॅच्युरिटी 15 वर्षे आहे. या योजनेची मॅच्युरिटी 5-5 वर्षांनी वाढवता येऊ शकते.

ईपीएफ किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी

कर वाचवण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी किंवा EPF हा देखील एक चांगला पर्याय आहे. पीएफ खात्यांतर्गत पगारदार कर्मचाऱ्यांना परतावा, गुंतवणूक आणि कर सवलतीचे फायदे मिळतात. हा निधी निवृत्तीनंतर काढता येतो.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत कर सूट

तुम्ही तुमच्या मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करू शकता. ही बचत योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जाते, ज्यामध्ये पालक 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवू शकतात. यामध्ये तुम्ही किमान 250 रुपये गुंतवू शकता. सध्या यावर ८.२ टक्के व्याज आहे. ही योजना आयकर कलम 80C अंतर्गत येते. ज्यामध्ये 1.5 लाख रुपयांपर्यंत कर वाचवता येते.

राष्ट्रीय पेन्शन योजना

सेवानिवृत्ती बचत योजना म्हणजेच NPS अंतर्गत तुम्हाला आयकराच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत सवलत मिळते. कलम 80CCD (1B) अंतर्गत तुम्ही यामध्ये अतिरिक्त आणखी 50 हजार रुपये वाचवू शकता. या योजनेतून तुम्हाला निवृत्तीनंतर चांगला निधी मिळतो.

जीवन विम्यावर कर सूट

तुम्ही लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) किंवा इतर कोणत्याही कंपनीकडून कोणत्याही प्रकारची जीवन विमा पॉलिसी घेतली असेल आणि त्याचा प्रीमियम नियमितपणे भरला असेल, तर तुम्हाला कर सूट मिळू शकते. जीवन विम्यातून तुम्ही वर्षाला 1.5 लाखापर्यंत बचत करु शकतात.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.