AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-China : भारतीय कंपनीच चीनमध्ये दमदार पाऊल, थेट 7 हजार कोटींची डील

India-China : भारत आणि चीनमध्ये व्यापाराच्या बाबतीत चीनची आपल्याकडे निर्यात जास्त आहे. म्हणजे आपण चीनकडून जास्त आयात करतो. आता एक भारतीय कंपनीने चिनी बाजारपेठेत दमदार पाऊल टाकलं आहे. डायरेक्ट 7 हजार कोटींची डील केली आहे.

India-China : भारतीय कंपनीच चीनमध्ये दमदार पाऊल, थेट 7 हजार कोटींची डील
India-China
| Updated on: Oct 24, 2025 | 3:24 PM
Share

भारताच्या अपारंपारिक ऊर्जा क्षेत्राला एक नवीन गती देणारा मोठा करार झाला आहे. INOXGFL Group ची कंपनी Inox Solar ने चीनची प्रमुख सोलार ऊर्जा कंपनी Longi Green Energy Technology सोबत जवळपास 7,000 कोटीचा कॉन्ट्रॅक्ट केला आहे. या करारातंर्गत पुढच्या तीन वर्षात Inox Solar, Longi कंपनीला 5 गीगावॅटच्या सोलर मॉड्यूलचा पुरवठा करणार आहे. फक्त भारताच्या सोलार इंडस्ट्रीसाठी ही मोठी डील नाहीय, तर जग, भारताच्या सोलार ऊर्जा क्षमतेवर विश्वास ठेवतय. यात चीन सारखा देश सुद्धा आहे.

इकोनॉमिक टाइम्सच्या सुत्रांनुसार, चीनची लॉन्गी ग्रीन एनर्जी भारतीय बाजारासाठी मॉड्यूल Inox Solar कडून विकत घेणार आहे. या डील अंतर्गत लॉन्गी, Inox ला आपली अत्याधुनिक टेक्नोलॉजी आणि जागतिक गुणवत्ता निकष त्या अनुभवाच्या आधारे मदत करेल. आंतरराष्ट्रीय स्तरावर गुणवत्तेच्या बाबतीत Inox च्या उत्पादनांना पसंती मिळावी, हा त्यामागे उद्देश आहे. भारत सोलर मॉड्यूलची देशांतर्गत उत्पादने वेगाने वाढवत असताना ही डील होत आहे. जेणेकरुन आयातीवरील अवलंबित्व कमी होईल.

एक मोठा बदल

Inox Solar ने अलीकडेच अहमदाबाद जवळ बावला येथे नवीन सोलार मॉड्यूल प्लान्ट सुरु केलाय. पहिल्या टप्प्यात ही क्षमता 1.2 गीगावॅट ठेवली आहे. पुढच्या टप्प्यात ही क्षमता 3 गीगावॅट पर्यंत वाढवण्यात येईल. कंपनी एवढ्यावरच थांबलेली नाही. ओदिशाच्या ढेंकनाल येथे अजून एक सोलर सेल आणि मॉड्यूल प्लांट बनवत आहे. त्याची क्षमता 4.8 गीगावॅट असेल. भारतात सोलार निर्मितीच्या दिशेने एक मोठा बदल म्हणून याकडे पाहिलं जातय.

आपली उपस्थिती अजून मजबूत बनवणं हा त्यामागे उद्देश

Inox Solar ची मूळ कंपनी Inox Clean Energy सुद्धा आता सार्वजनिक होण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा IPO या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत येण्याची शक्यता आहे. भारतात वेगाने वाढणाऱ्या क्लीन एनर्जी आणि मॅन्यूफॅक्चरिंग सेक्टरमध्ये आपली उपस्थिती अजून मजबूत बनवणं हा त्यामागे उद्देश आहे. भारतात वर्तमानात सोलर मॉड्यूल उत्पादन क्षमता 100 गीगावॅटपेक्षा जास्त आहे. सोलर सेल निर्माण क्षमता 27 गीगावॅट आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत ही क्षमता वाढून 40 गीगावॅट होण्याची अपेक्षा आहे.

राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.