AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील 69 टक्के कुटुंबं आर्थिकदृष्या असुरक्षित, फक्त 19 टक्के कुटुंबांकडे विमा, 6 टक्केच कुटुंबांची शेअर, म्युच्युअल फंडात गुंतवणूक

या सर्वेक्षणातून मिळालेल्या मौल्यवान आकडेवारीचा उपयोग भविष्यात धोरणकर्त्यांना धोरण ठरवताना होऊ शकतो,असा विश्वास मनी9 चे संपादक अंशुमन तिवारी यांनी व्यक्त केला आहे.

भारतातील 69 टक्के कुटुंबं आर्थिकदृष्या असुरक्षित, फक्त 19 टक्के कुटुंबांकडे विमा, 6 टक्केच कुटुंबांची शेअर, म्युच्युअल फंडात गुंतवणूक
भारतातील 69 टक्के कुटुंबं आर्थिकदृष्या असुरक्षितImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 07, 2022 | 6:00 PM
Share

मुंबई: आर्थिक सर्वमावेशकतेत वाढ होत असल्याचा डंका आपण वाजवत कितीही वाजवत असलो तरीही भारतातील जवळपास 69 टक्के कुटुंबांकडे कोणतीही आर्थिक सुरक्षा नसल्याचे उघड झाले आहे. हे धक्कादायक वास्तव मनी9 केलेल्या भारतातील सर्वात मोठ्या पर्सनल फायनान्स सर्वेक्षणातून समोर आले आहे. मनी9 आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील रिसर्च ट्रॅंगल संस्था (RTI) यांनी संयुक्तपणे भारतातील नागरिकांच्या पर्सनल फायनान्सचे सर्वेक्षण केले आहे.

या सर्वेक्षणातून भारतीय नागरिकांचे उत्पन्न, खर्च, बचत आणि गुंतवणुकीच्या पद्धतीबद्दल सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.  या सर्वेक्षणातून फायनाशियल सिक्युरिटी इंडेक्सचा वापर करून भारतातील विविध राज्यांची क्रमवारी देखील काढण्यात आली आहे.

2022 मधील मे ते सप्टेंबर महिन्यात केलेल्या या मेगा सर्वेक्षणात 20 राज्यांमधील 100 जिल्ह्यांतील 1150 शहरं आणि गावांमध्ये जाऊन 31,510 कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया(आरबीआय) आणि नॅशनल कॉन्सिल ऑफ अप्लाईड इकोनॉमिक रिसर्च( एनसीएईआर) या संस्था ज्या प्रमाणे सर्वेक्षण करतात तेवढ्याच व्यापक स्तरावर सर्वेक्षण करण्यात आले आहे.

सर्वेक्षणात संपूर्ण भारतातील राज्ये आणि जिल्ह्यांमध्ये भारतीय कुटुंबांमधील आर्थिक सुरक्षिततेचे स्तर मोजण्यासाठी शास्त्रीय पद्धतींचा वापर करण्यात आला आहे.

सर्वेक्षणातील ठळक निष्कर्ष

  1. भारतीय कुटुंबाचे सरासरी उत्पन्न दरमहा 23 हजार रुपये एवढे आहे. जवळपास 46 टक्के भारतीय कुटुंबाचे उत्पन्न 15 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.
  2. भारतातील तीन टक्के कुटुंब म्हणजेच उच्च-मध्यम वर्गीय आणि श्रीमंतांचेच राहणीमान लक्झरी आहे.
  3. सर्वेक्षणानुसार 70 टक्के भारतीय कुटुंब काही बचत बँकेत मुदत ठेवीच्या स्वरुपात, विम्यात अथवा पोस्टातील बचत योजनेत आणि सोन्यात करतात.
  4. सर्वाधिक गुंतवणूक ही बँकेच्या मुदत ठेव आणि पोस्टातील बचत योजनेत करण्यात येते,त्यानंतर विमा आणि सोन्यात गुंतवणूक करण्यास कुटुंबं प्राधान्य देतात. जवळपास 64 टक्क्यांपेक्षा जास्त बचत बँकेच्या खात्यात ठेवली जाते तर फक्त 19 टक्के कुटुंबांकडे विम्याचे कवच आहे.
  5. अल्प उत्पन्न गटातील बचत खूप कमी आहे. तसेच अल्प उत्पन्न गटातील दोन पंचमांश कुटुंबं कोणतीही बचत करू शकत नाही.या वर्गाकडे धोरणकर्त्यांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.
  6. सर्वेक्षणानुसार जवळपास 22 टक्के कुटुंब शेअर बाजार, म्युच्युअल फंड ,युलिप आणि स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करतात. यात सर्वाधिक 18 टक्के गुंतवूक ही जमीनजुमला, त्यानंतर सहा टक्के गुंतवणूक ही म्युच्युअल फंड, तर शेअर बाजारात आणि युलिपमध्ये प्रत्येकी तीन टक्के गुंतवणूक कुटुंबं करतात.
  7. सर्वेक्षणानुसार जवळपास 11 टक्के भारतीय कुटुंबांनी बँक किंवा गैर वित्तीय बँकिंग संस्था(NBFC)कडून कर्ज घेतले आहे. रिटेल कर्जाच्या प्रकारात सर्वाधिक पर्सनल कर्ज घेण्यात आली आहेत त्यानंतर गृह कर्ज कुटुंबांनी घेतली आहेत.
  8. सर्वेक्षणातील फायनाशियल सिक्युरिटी इंडेक्सनुसार जवळपास 42 टक्के कुटुंबं आर्थिकदृष्या असुरक्षित आहेत. यात अल्प उत्पन्न गटातील कुटुंबाचा समावेश केल्यानंतर जवळपास 69 टक्के कुटुंबं ही आर्थिकदृष्या असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. .

भारतीय कुटुंबाच्या पर्सनल फायनान्सच्या गरजांबद्दल अतिशय चांगली आकडेवारी या सर्वेक्षणातून मिळाली आहे. या सर्वेक्षणामुळे देशातील 130 नागरिक भारतीय आर्थिक सेवेच्या परिसंस्थेचा फायदा घेऊ शकतील ,असे मत टीव्ही9 नेटवर्कचे एमडी आणि सीईओ बरूण दास यांनी व्यक्त केले आहे.

या सर्वेक्षणातून मिळालेल्या मौल्यवान आकडेवारीचा उपयोग भविष्यात धोरणकर्त्यांना धोरण ठरवताना होऊ शकतो,असा विश्वास मनी9 चे संपादक अंशुमन तिवारी यांनी व्यक्त केला आहे.

राष्ट्रीय स्तरावरील या आकडेवारीमुळे सर्वसामान्य कुटुंब आर्थिकदृष्या कशाप्रकारे सुरक्षित होऊ शकतील यावर उपाययोजना करताना हे सर्वेक्षण उपयोगी ठरू शकते,असेही तिवारी यांनी म्हटले आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.