IPL मध्ये पाण्यासारखा वाहतो पैसा! BCCI असे आहे कमाईचे मॉडेल

IPL BCCI Revenue | इंडियन प्रीमियम लिगमध्ये पाण्यासारखा पैसा वाहतो. त्यामुळे बीसीसीआय छप्परफाड कमाई करते. अडीच महिने चालणाऱ्या या टूर्नामेंटमध्ये खर्चाला कोणताच अटकाव नसतो. या डोळे दिपवणाऱ्या क्रिकेटच्या कुंभमेळ्यात इतका पैसा येतो तरी कुठून? असा अनेकांन प्रश्न पडतो.

IPL मध्ये पाण्यासारखा वाहतो पैसा! BCCI असे आहे कमाईचे मॉडेल
अशी होते बक्कळ कमाई
Follow us
| Updated on: Mar 21, 2024 | 9:16 AM

नवी दिल्ली | 21 March 2024 : जगातील सर्वात महागडी क्रिकेट लीग आयपीएलची 22 मार्च 2024 पासून धमाक्यात सुरुवात होत आहे. क्रिकेटच नाही तर या सोहळ्यात डान्स, रोमांच, ॲक्शन, ग्लॅमर असतो. चिक्कार पैसा ओतल्या जातो. हा फुल्ल पैसा वसूल सोहळा अनेकांसाठी लॉटरी असतो. इंडियन प्रीमियम लीगल अनेकजण इंडियन परिवार लीग अथवा इंडियन पैसा लीग पण म्हणतात. अडीच महिने चालणाऱ्या या डोळ्याचे पारणे फेडणाऱ्या टूर्नामेंटमध्ये पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात येतो. आयपीएलचे खेळाडू, मालक आणि BCCI जमके कमाई करते. पण हा पैसा येतो तरी कुठून? कशी होते कमाई? काय आहे बिझनेस मॉडेल, समजून घेऊयात..

  1. मीडिया अँड डिजिटल अधिकार – मीडिया आणि डिजिटल अधिकारातून IPL आणि BCCI बक्कळ कमाई करते. चॅनलवर सामने याची देहि याची डोळा पाहण्याचे तुमचे सूख, हीच या दोन संघटनांची कमाईचे साधन असते. सॅटेलाईट टीव्ही चॅनल्स मोठी रक्कम अदा करुन या सामन्यांचे मीडिया राईट्स खरेदी करतात. यातून होणाऱ्या कमाईचा अर्धा हिस्सा बीसीसीआयकडे तर इतर वाटा त्या त्या टीमकडे जातो. 2008 मध्ये पहिल्या आयपीएल सीझनपासून सोनीने पुढील 10 वर्षांसाठी या टूर्नामेंटचे टीव्ही राईट्स खरेदी केलेले होते. सोनीने त्यावेळी 8,200 कोटी रुपये त्यासाठी खर्च केले होते. त्यानंतर 2023 पर्यंत स्टार आणि आता जिओने हे अधिकार मिळवले आहेत.
  2. टायटल स्पॉन्सरशिप – DLF आयपीएल, विवो आयपीएल, टाटा आयपीएल हे सर्व टायटल स्पॉन्सरशीप आहेत. पैसे देऊन आयपीएलसोबत त्यांनी नाव जोडले आहे. जी कंपनी सर्वाधिक बोली लावले, त्याला हे टायटल देण्यात येते. म्हणजे एक प्रकारचे ब्रँड प्रमोशन. आयपीएलच्या कमाईचा हा मोठा स्त्रोत आहे. टाटा समूहाने दोन सीझनमध्ये 670 कोटी रुपयांचे राईट्स खरेदी केली होते. तर करार तोडण्यासाठी पण काही ब्रँड्सने पैसे मोजले आहे. यातील काही रक्कम बीसीसीआय स्वतःकडे ठेवते. उर्वरीत रक्कम टीमला देते.
  3. जाहिरात आणि किट स्पॉन्सरशिप – जाहिराती आणि प्रमोशन्सच्या माध्यमातून घसघशीत कमाई होते. सामन्यांच्या दरम्यान छोट्या जाहिराती दाखविण्यात येतात. 10 सेंकदाच्या जाहिरातीसाठी 15 लाखांच्या आसपास मोजावे लागतात. चिप्स तयार करणाऱ्या कंपनीपासून ते कोल्ड्रिंक, साबण, सौंदर्य प्रसाधनं सारख्या कंपन्यापर्यंत जाहिरातींचा महापूर येतो. बीसीसीआयच्या एकूण कमाईत जाहिरातीतून 20 टक्के कमाई होते. टीमची जर्शी, हेलमेट, अंपायरची जर्शी, विकेट, बाऊंड्री लाईन याठिकाणच्या जाहिराती आणि कंपनीच्या लोगोतून कोट्यवधींची उलाढाल होते.
  4. स्थानिक महसूल – सर्वात अखेरीस स्थानिक महसूलातून पण कमाई होते. लोकल स्पॉन्सरशिप आणि इतर साहित्य विक्रीतून कमाई करता येते. एका अंदाजानुसार, क्रिकेट सामन्यांच्या तिकीट विक्रीतून दरवर्षी जवळपास 5 कोटी रुपयांची कमाई होते. आयपीएलच्या सर्व टीम त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा उठवतात. त्यांच्या टीमचे लोगो असलेले टीशर्ट, ग्लब्स, हेलमेट, झेंडे आणि इतर साहित्याची ऑनलाईन, खेळाच्या मैदानाजवळ विक्री करण्यात येते. चाहते त्याची खरेदी करतात. त्यातूनही या टीम आणि मालकांना कमाई होते.
  5. हे सुद्धा वाचा
Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.