AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमा कंपनीने तुमचाही क्लेम फेटाळलाय? तक्रार करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

यानंतर आता अनेकांनी विविध विमा कंपन्यांकडे क्लेमसाठी विनंती केली आहे. मात्र यातील बहुतांश कंपन्या या बऱ्याच कारणांमुळे लोकांचे दावे नाकारत आहेत.

विमा कंपनीने तुमचाही क्लेम फेटाळलाय? तक्रार करण्याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या
आपल्या विमा पॉलिसीवर करु शकता बंपर कमाई
| Edited By: | Updated on: Jul 09, 2021 | 8:34 AM
Share

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका अनेकांना बसला आहे. यादरम्यान अनेकांना आरोग्य संबंधित समस्येमुळे रुग्णालयात उपचार घ्यावे लागले आहेत. यानंतर आता अनेकांनी विविध विमा कंपन्यांकडे क्लेमसाठी विनंती केली आहे. मात्र यातील बहुतांश कंपन्या या बऱ्याच कारणांमुळे लोकांचे दावे नाकारत आहेत. जर विमा कंपनीने तुमचाही क्लेम नाकारला असेल आणि जर तुमची संपूर्ण प्रक्रिया रितसर केली असेल तर तुम्ही याविरोधात विमा कंपनीकडे तक्रार करु शकता. (Insurance Company reject your claim know how to file complaint  To IRDA Check All details)

जर तुम्हीही एखाद्या विमा कंपनीवर नाराज असाल किंवा तुम्हाला विमा कंपनीची तक्रार करायची असेल, तर तुम्हीही हे करु शकता. यासाठी तुम्ही IRDA कडे विमा कंपन्यांची तक्रार करु शकता. या तक्रारीनंतर जर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर तुम्ही थेट विमा लोकपालकडे देखील तक्रार करू शकता. मात्र ही संपूर्ण प्रक्रिया नेमकी काय आणि तक्रारी संदर्भात कोणते नियम आहेत? याची माहिती असणे गरजेचे आहे.

प्रक्रिया काय?

  • यासाठी तुम्हाला सर्वप्रथम विमा कंपनीच्या तक्रार निवारण कक्षात तक्रार नोंदवावी लागेल. या तक्रारीवर तुम्हाला 15 दिवसात योग्य उत्तर न मिळाल्या तुम्ही याविरोधात IRDA कडे धाव घेऊ शकता.
  • IRDA कडे तक्रार नोंदवण्यासाठी complaints@irdai.gov.in या ईमेल आयडीवर तक्रार दाखल करु शकता.
  • तसेच तुम्ही IRDA च्या टोल फ्री क्रमांकावर 155255 किंवा 1800 4254 732 वर देखील तक्रार करू शकता.
  • जर तुम्ही ही तक्रार केल्यानंतर त्यावर काहीही तोडगा निघाला नाही, तर तुम्ही विमा लोकपालकडे तक्रार करू शकता.

विमा लोकपाल म्हणजे काय?

विमा लोकपाल हा विमाधारक आणि विमा कंपनी यांच्यात समन्वय साधतो. तसेच हा व्यक्ती कागदाच्या आधारे क्लेमची रक्कम देखील निश्चित करू शकतो. जर इन्‍शुअर व्यक्ती क्लेम रकमेस सहमत असेल तर ऑर्डर पास केली जाते. यानंतर कंपनीला 15 दिवसांच्या आत त्याचे पालन करावे लागते. यानंतर मग लोकपाल निर्णय सुनावतो, जो विमा कंपनीला स्विकारावा लागतो.

या व्यतिरिक्त तुम्ही ग्राहक आयोगात कंपनीविरोधात तक्रार दाखल करु शकता. यासाठी तुम्हाला ऑनलाईन तक्रार करण्याची सुविधा मिळते. मात्र त्यानंतर तुम्हाला ग्राहक न्यायालयात हजर व्हावे लागेल. तसेच यानंतर तुम्हाला न्याय मिळविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. मात्र यात दावा करणार्‍या लोकांनी विमा कंपनीच्या सर्व अटी पूर्ण करणे गरजेचे आहे. कारण जर यानंतर कंपनीने तुमचा दावा फेटाळला तरी तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल.

(Insurance Company reject your claim know how to file complaint  To IRDA Check All details)

संबंधित बातम्या : 

ज्येष्ठ नागरिकांसाठी खूशखबर, बँकेच्या FD व्याजदरात बदल, कोणत्या बँकेत सर्वाधिक व्याज?

LIC ची भन्नाट पॉलिसी, दर दिवसाला 60 रुपयांची बचत करा, 6 लाख रुपये मिळवा

पोस्ट ऑफिसच्या या योजनांमध्ये करा गुंतवणूक, दुप्पट मिळेल फायदा, जाणून घ्या कसा मिळेल लाभ

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.