पहिल्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांच्या व्याज दरात कोणताही बदल नाही, जाणून घ्या काय आहेत सध्याचे दर

वाढती महागाई लक्षात घेता, सरकारने नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांच्या (Small Saving Scheme) व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. यात एनएससी, पीपीएफ आदींचा समावेश आहे, अशी माहिती सरकारतर्फे गुरुवारी देण्यात आली.

पहिल्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांच्या व्याज दरात कोणताही बदल नाही, जाणून घ्या काय आहेत सध्याचे दर
Follow us
| Updated on: Apr 01, 2022 | 8:13 AM

वाढती महागाई लक्षात घेता, सरकारने नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी अल्पबचत योजनांच्या (Small Saving Scheme) व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. यात एनएससी, पीपीएफ आदींचा समावेश आहे, अशी माहिती सरकारतर्फे गुरुवारी देण्यात आली. सरकारच्या म्हणण्यानुसार, महागाईत झालेली वाढ लक्षात घेता व्याजदर स्थिर ठेवण्यात आले आहेत. 2020-21 च्या पहिल्या तिमाहीपासून व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सरकारच्या या निर्णयानंतर शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या तिमाहीत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीवरील (PPF) व्याजदर 7.1 टक्के आणि राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर 6.8 टक्के कायम राहणार आहेत. गेल्या वर्षी कोविडमुळे लोकांच्या उत्पन्नात घट झाल्याने दरांमध्ये कोणताही बदल झाला नव्हता. त्याचबरोबर या तिमाहीत महागाईमुळे दरांमध्ये बदल करण्यात आलेला नाही.महागाईमुळे मुदत ठेवीवरील (FD) प्रत्यक्ष परतावा कमी झाला आहे, त्यामुळेच सरकारने अल्पबचत योजनांच्या दरात कपात केलेली नाही.

बचतीवरील परतावा कायम

आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या तिमाहीतील विविध अल्पबचत योजनांवरील व्याज दर 1 एप्रिल 2022 ते 30 जून 2022 या कालावधीत कायम राहील, असे अर्थमंत्रालयाने आज एका अधिसूचनेत म्हटले आहे. याचा अर्थ नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी पण ३१ मार्चअखेर संपलेल्या तिमाहीसाठी जाहीर करण्यात आलेले व्याजदर लागू राहतील. अल्पबचत योजनांवरील व्याजदर तिमाही आधारावर जाहीर केला जातो. सामान्य भारतीय अल्पबचत योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात. त्याचबरोबर वृद्धांसाठी निश्चित उत्पन्नाचा मोठा स्रोत आहे. त्यामुळे त्याचे दर निश्चित करण्यासाठी सरकार अनेक गोष्टींचा विचार करते. गेल्या वर्षी कोविडमुळे लोकांच्या उत्पन्नात घट झाल्याने दरांमध्ये कोणताही बदल झाला नव्हता. त्याचबरोबर या तिमाहीत महागाईमुळे दरांमध्ये बदल करण्यात आलेला नाही.

व्याज किती मिळेल

आजच्या निर्णयानंतर पहिल्या तिमाहीत एक वर्षाच्या मुदतठेवींवर 5.5 टक्के व्याज मिळेल. त्याचबरोबर मुलींच्या भविष्यासाठी बचत योजना सुकन्या समृद्धी योजनेवर 7.6 टक्के व्याज मिळेल. 5 वर्षांची ज्येष्ठ नागरिक बचत योजना 7.4 टक्के कायम राहणार आहे. ज्येष्ठ नागरिक योजनेवरील व्याज हे त्रैमासिक देय आहे. बचत ठेवींवर वार्षिक 4 टक्के व्याज मिळत राहील. एक ते पाच वर्षांच्या मुदतठेवींवरील व्याजदर 5.5 ते 6.7 टक्के राहील. त्यावरील व्याज तिमाही आधारावर देय आहे. आवर्ती ठेवीवर (Recurring) 5.8 टक्के व्याज मिळेल.

एफडीमधून चांगला परतावा

अल्पबचत योजनांवरील व्याजदर तिमाही आधारावर निश्चित केला जातो. व्याजात कोणताही बदल न करता, अल्पबचत योजना बँकेच्या मुदत ठेवीपेक्षा चांगला परतावा देत आहेत. एसबीआयच्या बँक एफडीचा व्याजदर 2.9 ते 5.4 टक्क्यांदरम्यान आहे. बँक ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 3.4 ते 6.2 टक्के व्याज देत आहे. महागाईमुळे एफडीवरील प्रत्यक्ष परतावा कमी झाला आहे, त्यामुळेच सरकारने अल्पबचत योजनांच्या व्याज दरात कपात केलेली नाही.

संबंधित बातम्या

Petrol, Diesel Price : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

Top Multibagger Stock: गेल्या आर्थिक वर्षात ‘या’ कंपनीच्या शेअर्सने दिला सर्वाधिक 3, 381.71 टक्क्यांचा परतावा

सौदी अरेबिया कच्च्या तेलाचे दर वाढवणार; सर्वाधिक फटका आशियाई देशांना बसणार

Non Stop LIVE Update
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.